शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

पाच कोटींच्या फुसक्या बाराच्या जखमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:27 IST

चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेच्या आमदारासाठी पाच कोटींचा रेट लावला हा आरोप केल्यानंतर उद्धवजींनी हर्षवर्धनांची पाठ थोपटली

- सुधीर महाजनचंद्रकांत पाटलांनी शिवसेनेच्या आमदारासाठी पाच कोटींचा रेट लावला हा आरोप केल्यानंतर उद्धवजींनी हर्षवर्धनांची पाठ थोपटली तेव्हा त्यांना हर्षवायू व्हायचा बाकी राहिला. खरे म्हणजे पार्टी विथ डिफरन्सचे बिरुद मिरवणाºया भाजपने बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, असाच पवित्रा घ्यायला पाहिजे होता; पण तेथेही तेरी भी चूप, मेरी भी चूप, असे वागत थंड राहिले आणि सेनेनेही मूग गिळले.भाजप आणि शिवसेनेच्या ‘लव्ह-हेट स्टोरीज’ची प्रकरणे रोज लिहिली जातात आणि तेवढ्यापुरता धुराळा उडतो. आरोप फार गंभीर होतात. जिव्हारी लागणारे असतात. हल्ला, प्रतिहल्ला, असा हा प्रकार आता नेहमीचा झाला असला तरी परवा कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महसूल आणि बांधकाममंत्री आणि मंत्रिमंडळातील दुसºया क्रमांकाचे सदस्य चंद्रकांत पाटील यांच्यावर घोडेबाजाराचा आरोप केला. शिवसेनेच्या २५ आमदारांची प्रत्येकी पाच कोटींच्या भावाने त्यांनी बोली लावली. एवढे आमदार एकगठ्ठा खरेदीचा त्यांचा प्रयत्न होता. आता समजा हा व्यवहार (की तोडी-पाणी) झाला असता तर तब्बल सव्वा अब्ज रुपयांची ही उलाढाल होती, म्हणजे महाराष्ट्र गरीब नाही (तरीही इथला शेतकरी आत्महत्या करतो), श्रीमंत आहे. तर हर्षवर्धन जाधवांचा हा आरोप भाजपचा तीळपापड करणारा होता. त्यातून जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे जावई. म्हणजे एका अर्थाने जावयाने सासºयाला केलेला अहेरच समजायचा.हर्षवर्धन बोलले, पण त्यावर वादळ उठले नाही. भाजपनेसुद्धा हा वार दुर्लक्ष करीत झेलला. जखमा उरातल्या किती उघड्या करायच्या हासुद्धा एक प्रश्नच आहे. जणू काही घडलेच नाही अशा आविर्भावात हे दोन्ही पक्ष वावरताना दिसतात. एक तर हर्षवर्धनांचा आरोप गंभीरपणे घेतला तर त्याला उत्तर द्यावे लागेल आणि आरोपांच्या वायबारात एकमेकांचे वस्त्रहरण होईल असा पोक्त विचार भाजपच्या धुरिणांनी केला असावा. समजा शिमगा रंगलाच तर आपल्यावर जास्त चिखल उडेल अशी काळजी असावी; पण सव्वा अब्ज रुपयांच्या आरोपांचे उत्तर द्यावे वाटले नाही. हेही एक गूढ म्हणावे लागेल. आता हे दोन्ही पक्ष जणू काही घडलेच नाही, असे वावरताना दिसतात.हर्षवर्धनांनी असा उपटसुंभासारखा आरोप का केला, हा आणखी एक पडलेला प्रश्न आहे. तसे जाधव हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. पोलिसांनी त्यांना मारहाण केली होती. तो वाद पेटला होता. पुढे मनसेमधून शिवसेनेत आल्यानंतर त्यांचे खासदार चंद्रकांत खैरेंशी फाटले. ते इतके की शिवसेनेच्या आमदाराने त्यांच्याच खासदारांच्या गैरकृत्याचे वाभाडे काढून प्रसारमाध्यमांच्या हाती दिले. मतदारसंघाबाहेरच्या गावात खैरेंनी खासदार निधी खर्च केल्याचे त्यांनी उघड केले, तर खैरेंनी जिल्हा परिषद निवडणुकीत जाधवांच्या पत्नीला पराभूत करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली. ही साठमारी औरंगाबाद जिल्ह्याने पाहिली. पुढे दोघांमध्ये समझोता झाला आणि जाधवांनी पाच कोटींचा बॉम्ब टाकला. आज याबाबत सर्वांनीच मूग गिळले. जाधवांना सेनेतून बाहेर पडायचे होते, पण आम्ही त्यांना घ्यायला तयार नाही असे भाजपची मंडळी म्हणतात, असा जावई पक्षात घेऊन सासºयांनाही डोकेदुखी वाढवायची नसावी आणि शिवसेनेसाठी तर सध्या एकेक आमदार महत्त्वाचा आहे. सरकार आरोपांचे निराकरण करत नाही. शिवसेना या मुद्यावर रान उठवत नाही आणि हर्षवर्धन तर निवांत आहेत. प्रश्न हाच आहे की, नेमके सत्य काय?

टॅग्स :Harshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवUddhav Thackerayउद्धव ठाकरे