शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

‘गॉडफादर’अभावी ए.टी.नानांची हॅटट्रिक हुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 2:23 PM

जळगाव जिल्ह्यात एकनाथराव खडसे, गिरीश महाजन आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील असे तीन गट भाजपामध्ये कार्यरत आहेत. पाटील हे तिन्ही गटांशी समान अंतर ठेवून असत. सहा महिन्यांपूर्वी अमळनेरात खडसे यांनी पाटील हेच पुढील उमेदवार असल्याचे भाकीत केले आणि त्यांच्याविरोधात अंतर्गत कारवाया सुरु झाल्या.

मिलिंद कुलकर्णीजळगाव : राजकारणातील अंतरंग आणि बाह्यरंग सामान्यांना काय भल्याभल्यांना लक्षात येत नाही. लोकसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपावरुन महाराष्टÑात सध्या जे काही सुरु आहे, त्यावरुन हा निष्कर्ष सहज काढू शकतो. जळगाव मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान खासदार ए.टी.पाटील हे त्या अनुभवातून जात आहेत. सलग दोन वेळा भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेल्या पाटील यांना तिसऱ्यांदा तिकीट न मिळण्याला कारणीभूत ठरले एक निमित्त. कथित छायाचित्रांवरुन पाटील यांना लक्ष्य करण्यात आले आणि दहा वर्षांची त्यांची खासदारकी आणि २५ वर्षांचे राजकीय आयुष्य पणाला लागले. कोणतीही पोलीस तक्रार नाही, आरोप नाही, परंतु, समाजमाध्यमांद्वारे वाऱ्यासारखा विषय पोहोचला आणि पाटील यांना उमेदवारीसाठी टाचा झिजवाव्या लागल्या. तिसऱ्यांदा निवडून आल्यास मंत्रिपद मिळेल, अशी धास्ती वाटणाºया मंडळींनी षडयंत्र रचल्याची खंत त्यांनी चाळीसगावात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केली. ‘गॉडफादर’ नसल्याने त्यांची बाजू पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचलीच नाही आणि एकतर्फी निर्णय घेत त्यांची उमेदवारी कापण्यात आली.पाटील यांच्या विरोधी वातावरण तापवण्यासाठी केवळ हेच एक कारण नव्हते, तर अशी अनेक कारणे उभी करण्यात आली. या विषयांची चर्चा एरवी झाली नसती. पाटील यांचे मूळ उकरुन काढण्यात आले. ते मूळचे राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. पारोळा पालिका निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ते राष्टÑवादी काँग्रेसतर्फे विजयी झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांनी राष्टÑवादी काँग्रेसतर्फे विधान परिषद निवडणूक लढवली. भाजपाचे डॉ.गुरुमुख जगवाणी यांच्याकडून ते पराभूत झाले. जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या हातून निसटलेला असताना प्रबळ उमेदवार म्हणून एकनाथराव खडसे यांनी ए.टी.पाटील यांना २००९ मध्ये भाजपामध्ये आणले. २०१४ मध्ये त्यांनी राज्यात दुसºया क्रमांकाचे विक्रमी मताधिक्य मिळविले.कोणत्याही गटबाजीत सामील झाले नाही, हा त्यांचा दुर्गुण ठरला. जळगाव जिल्ह्यात एकनाथराव खडसे, गिरीश महाजन आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील असे तीन गट भाजपामध्ये कार्यरत आहेत. पाटील हे तिन्ही गटांशी समान अंतर ठेवून असत. सहा महिन्यांपूर्वी अमळनेरात खडसे यांनी पाटील हेच पुढील उमेदवार असल्याचे भाकीत केले आणि त्यांच्याविरोधात अंतर्गत कारवाया सुरु झाल्या. त्यांचे काही व्यवहार, वाद शोधून काढून प्रयत्नपूर्वक वातावरण पेटविण्यात आले. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धरणगाव येथे आले असताना पाटील यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही, तेव्हाच पाटील यांच्या तिकिटाविषयी साशंकता व्यक्त झाली.परंतु, पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पारोळ्यासारख्या राजकीय राजधानीतील रहिवासी असल्याने राजकीय करामती त्यांना अवगत आहेत. या संकटातून ते बाहेर पडतील, असा कयास व्यक्त होत होता. परंतु, तो फोल ठरला. पक्ष आणि पक्षश्रेष्ठींच्या मनातून एकदा सहकारी उतरला की, तो दूर फेकला जातो. याचा अनुभव पुन्हा एकदा आला. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप असलेले एम.के.पाटील, स्व.वाय.जी.महाजन हे तत्कालीन खासदार, लाच प्रकरणात अटक झालेले जळगावचे तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.के.डी.पाटील, गैरव्यवहाराचा कथित आरोप झालेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यापाठोपाठ ए.टी.पाटील यांनाही पक्षाने दूर लोटले.

टॅग्स :Jalgaonजळगाव