तृणमूल काँग्रेसचे जिहादी प्रेम
By Admin | Updated: October 29, 2014 01:23 IST2014-10-29T01:23:56+5:302014-10-29T01:23:56+5:30
बरद्वान येथे झालेल्या स्फोटामुळे या घटनेतील तृणमूल काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेसने तपास यंत्रणोच्या तपासाला का रोखले, हा प्रश्न विचारला जात आहे.

तृणमूल काँग्रेसचे जिहादी प्रेम
बरद्वान येथे झालेल्या स्फोटामुळे या घटनेतील तृणमूल काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेसने तपास यंत्रणोच्या तपासाला का रोखले, हा प्रश्न विचारला जात आहे.
रद्वान येथील स्फोटाच्या शोधजाळ्यात तृणमूल काँग्रेस गुरफटत चालल्याचे दिसू लागले आहे. पश्चिम बंगालमधील सत्तारूढ पक्षाच्या नेत्याच्या घरी बॉम्ब तयार करीत असताना अचानक स्फोट झाल्यामुळे खळबळ माजली आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्या ठिकाणची पोलिसांनी पाहणी केली असता, त्यांना बॉम्ब तयार करण्याच्या साहित्याशिवाय इतर ब:याच गोष्टी सापडल्या. हे घर भाडय़ाने घेणारी व्यक्ती बांगलादेशातून आली होती. आणि ते त्या घरात काय करीत होते याचा शोध घेण्याचे काम मीडियानेदेखील सुरू केले आहे. त्यातून ब:याच संशयास्पद गोष्टी समोर आल्या आहेत. सत्तारूढ पक्षाकडून या विषयाला फारसे महत्त्व दिले जात नाही. या घटनेच्या चौकशीचे काम थांबवण्याचा त्यांचा प्रय} आहे. पण मीडियाने ज्या गोष्टी उजेडात आणल्या त्यामुळे दहशतवादाशी लढा देणा:या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेला या घटनेत लक्ष घालणो भाग पडले आहे. पण त्यांच्या मार्गात राज्याच्या मुख्यमंत्री अनेक अडचणी आणत आहेत. अशा घटनांनावर प्रतिबंध घालण्याचे काम घटनेने राज्य सरकारला दिले आहे असा मुख्यमंत्र्यांचा युक्तिवाद आहे. केंद्रीय संस्थेला तपास करायचाच असेल तर त्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणो आहे. गरज असेल तरच केंद्रीय संस्थेने हस्तक्षेप करावा या पर्यायाचा वापर करून राष्ट्रीय सुरक्षा संस्था घटनेचा तपास करीत आहे.
या संस्थेचे अधिकारी घटनास्थळी पोचले तेव्हा तृणमूल सरकार राज्यातील दहशतवादी कृत्यांकडे कसे दुर्लक्ष करीत आहे हे त्यांना बघायला मिळाले. तृणमूल काँग्रेस हा पक्ष उदारपणो दहशतवाद्यांना बॉम्बचा कारखाना चालवू देत आहे. त्या ठिकाणी निर्माण केलेल्या ग्रेनेडसारख्या वस्तू या पूर्वीच बांगलादेशला पाठवण्यात आल्या. तपास यंत्रणोला राज्यातील दहशतवादी गटांचा संबंध शेजारी राष्ट्रातील दहशतवादी गटाशी असल्याचे दिसून आले आहे. ही बाब केंद्र सरकारने बांगलादेश सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे. बांगलादेशमधील जमाते-इस्लामीचे नेते पंतप्रधान शेख हसिना यांना पदच्युत करून त्यांच्याजागी जिहादी राजवट आणण्याच्या प्रय}ात आहेत. त्यांच्या कटाचे धागेदोरे भारतातही आढळून आले आहेत. देशभर बॉम्बस्फोट घडवून एखाद्या महत्त्वाच्या नेत्याला ओलीस ठेवण्याचा दहशतवाद्यांचा डाव आहे. 197क् साली बांगलादेशी नेत्यांना दडपून टाकण्यासाठी पाकिस्तानी सैन्याशी ज्या जमायती नेत्यांनी हातमिळवणी केली होती त्या सर्वाना सरकारने अटकेत टाकले असून, काहींना न्यायालयाने फाशीच्या शिक्षाही सुनावल्या होत्या. पण अपिलामध्ये त्यांच्या शिक्षा कमी करण्यात आल्या. बांगलादेशमधील उदारमतवादी लोक हसिना सरकारला पाठिंबा देत आहेत. घटनेने सर्व धर्माना समान मानले आहे, या गोष्टीकडे ते सरकारचे लक्ष वेधत आहेत. तसेच जिहादी तत्त्ववाद्यांच्या शिक्षा कमी केल्याच्या विरोधात उदारमतवादी जमाव निदर्शने करू लागला आहे.
बरद्वान येथे झालेल्या स्फोटामुळे या घटनेतील तृणमूल काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेसने तपास यंत्रणोच्या तपासाला का रोखले, हा प्रश्न विचारला जात आहे. राज्य पोलिसांनी तपास केलेल्या घरात त्यांना काही आढळले नव्हते. पण दुस:याच दिवशी केंद्रीय तपास यंत्रणोला त्या घरामध्ये मोठय़ा प्रमाणात बॉम्ब व ग्रेनेडचा साठा आढळून आला. त्यामुळे राज्य सरकारच्या तपासावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
एकाच ठिकाणी तपास करताना दोन तपास यंत्रणांच्या तपासात त्रुटी आढळणो ही गोष्ट राज्य पोलिसांची अकार्यक्षमता दर्शवणारी आहे. पण तेथील सरकारने केंद्रीय तपास यंत्रणोच्या कामात व्यत्यय आणल्यामुळे तृणमूल काँग्रेसचा त्यात हात तर नसावा, असा संशय येऊ लागला आहे. राज्य पोलिसांनी हे प्रकरण दडपून टाकण्याचा जो प्रय} केला त्यामागे कोणाचा हात होता? घटनेसंबंधी आणखी तथ्ये समोर आली आहेत. बीरभूम जिल्ह्याच्या मुख्यालयाला लागून असलेल्या सरकारी जागेत केंद्रीय तपास यंत्रणोला जिहादींचे प्रशिक्षण केंद्र आढळून आले. स्फोटानंतर त्या घरातील रहिवासी आश्चर्यकारकरीत्या नाहीसे झाल्याचे दिसून आले. त्या घरातून कॉम्प्युटर आणि जिहादी प्रशिक्षणासंबंधीची कागदपत्रे तपास यंत्रणोला मिळाली. जिल्हा मुख्यालयाजवळची जागा सरकारने आदिवासींना दिली होती. आदिवासींनी ती जागा जिहादी प्रशिक्षकांना विकल्याचे आढळून आले. त्यापैकी एक प्रशिक्षक तपास यंत्रणोच्या ताब्यात असून, अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. जमिनीचा हा बेकायदा व्यवहार करण्यामागे तृणमूल काँग्रेसच्या एका व्यावसायिकाचा हात आहे असे दिसून आले. तसेच बॉम्ब निर्माण करणा:यांचे संबंध तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व गोष्टी तृणमूलच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यार्पयत पोचल्या नसल्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते दहशतवादी नेत्यांना मदत करीत असावेत असे दिसते.
ममता बॅनर्जी यांनी डाव्या आघाडीच्या सरकारविरुद्ध जोरदार मोहीम चालवली होती. पण डावी आघाडी मुस्लिम नेत्यांबाबत उदार भूमिका बाळगत होती. अशा स्थितीत ममता बॅनज्रीनी तपासाचे काम स्वत:हून केंद्रीय तपास यंत्रणोकडे सोपवायला हवे होते. पण प्रत्यक्षात तृणमूलचेच कार्यकर्ते दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे दिसून येते. बरद्वानसारखी केंद्रे राज्यात अन्य ठिकाणीसुद्धा असण्याची शक्यता आहे. कारण इस्लामी गटांनी तृणमूल काँग्रेसशी चांगले संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे. या गटाच्या दबावाखालीच सलमान रश्दींना कोलकता विमानतळावरून परत पाठवण्यात आले होते. या सर्व घटनांवरून पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये जिहादी तत्त्वांचा शिरकाव झाल्याचे दिसते.
बलबीर पुंज
भाजपाचे उपाध्यक्ष