शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: एमसीएतील ‘खेळ’खंडोबा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:51 IST

महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) ही मुंबई आणि विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमधील क्रिकेटपटूंसाठी आशेचे केंद्र मानली जाते. राज्यातील लाखो पालक आपल्या मुलांनी क्रिकेटच्या मैदानावर नाव कमवावे, ही स्वप्ने उराशी बाळगून आहेत. मात्र, याच स्वप्नांवर राजकीय स्वार्थाचा घाला घालण्याचे काम एमसीएने केले आहे.

महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) ही मुंबई आणि विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमधील क्रिकेटपटूंसाठी आशेचे केंद्र मानली जाते. राज्यातील लाखो पालक आपल्या मुलांनी क्रिकेटच्या मैदानावर नाव कमवावे, ही स्वप्ने उराशी बाळगून आहेत. मात्र, याच स्वप्नांवर राजकीय स्वार्थाचा घाला घालण्याचे काम एमसीएने केले आहे. आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेत जे घडले, ते केवळ क्रिकेटपुरते मर्यादित न राहता क्रीडाक्षेत्रातील गंभीर अधःपतनाचे द्योतक आहे. एमसीएची निवडणूक ६ जानेवारीला होणार होती. मात्र, निवडणुकीच्या काही दिवस आधीच सदस्यसंख्या १५४ वरून थेट ५७१ इतकी वाढवण्यात आली. इतक्या अल्पकाळात एवढी मोठी सदस्यवाढ यापूर्वी कधीच झालेली नव्हती. 

विशेष म्हणजे, या नव्या सदस्यांमध्ये क्रिकेटशी संबंधित व्यक्तींचा नव्हे, तर थेट राजकीय नातेसंबंध असलेल्या व्यक्तींचा भरणा करण्यात आला. अध्यक्ष रोहित पवार यांची पत्नी कुंती पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती, कुटुंबीय, अन्य नेत्यांचे नातेवाईक, मंत्री, आमदारांचे पुत्र असे ज्यांचा क्रिकेटशी काडीमात्र संबंध नाही, त्यांना संघटनेत एंट्री मिळाली. तसेच, संघटनेने मर्जीतील क्लबला सदस्यत्व दिले आणि वर्षानुवर्षे क्रिकेटच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या क्लबला सदस्यत्वापासून दूर ठेवले. क्रिकेटचे भवितव्य ठरवण्याची जबाबदारी अशा लोकांच्या हाती देण्याचा हा प्रकार गंभीर आणि धक्कादायक आहे. सदस्यवाढ करताना धर्मदाय आयुक्तांचे नियम, बैठकीतील ठराव, सदस्ययादीस मान्यता यांसारख्या मूलभूत प्रक्रियांनाही डावलण्यात आले.

या मनमानीविरोधात अनेक सदस्यांनी आक्षेप नोंदवले; मात्र ते दुर्लक्षित करून २५ डिसेंबरला प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहीत तीव्र आक्षेप घेतला होता, पण निवडणूक अधिकाऱ्यांनी तो फेटाळला. त्यानंतर केदार जाधव यांच्यासह काही संस्थांनी न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करत एमसीएच्या कारभारावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आणि निवडणुकीला स्थगिती दिली. नियमबाह्य सदस्यभरती ही केवळ प्रक्रियात्मक चूक नसून, निष्पक्षता आणि पारदर्शकतेवर घाला असल्याचे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही एमसीएने आत्मपरीक्षण करण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र, तेथेही संघटनेला नामुष्कीला सामोरे जावे लागले. ‘इतकी बेकायदा कामे करण्याची हिंमत होतेच कशी?’ अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने रोहित पवार यांची कानउघाडणी केली. 

देशात असंख्य माजी क्रिकेटपटू उपलब्ध असताना ४०० सदस्यपदे त्यांच्यासाठी खुली न करता क्रिकेटची प्राथमिक माहितीही नसलेल्यांना सदस्य बनवणे, हे न्यायालयाने तीव्र शब्दांत अधोरेखित केले. ही घटना केवळ एका निवडणुकीपुरती मर्यादित नाही. गेल्या काही वर्षांत एमसीएमध्ये राजकीय घुसखोरी वाढत चालली आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांची तिकिटे, कार्यकर्त्यांचे व्यवस्थापन आणि निवडणुकीची गणिते जुळवण्यासाठी संघटना वापरली जात आहे. क्रिकेटमधील पैसा, प्रसिद्धी पाहून खासदार, आमदार संघटनेत घुसत आहेत आणि माजी क्रिकेटपटूंना डावलले जात आहे. महाराष्ट्राच्या संघात बाहेरच्या राज्यातील खेळाडू खेळविले जात आहेत. दी. ब. देवधर, चंदू बोर्डे, बापू नाडकर्णी असा गौरवशाली वारसा लाभलेल्या एमसीएला लोढा समितीच्या शिफारशींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे आज बीसीसीआयमध्ये स्थानही उरलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने २०१७मध्ये देशातील सर्व क्रिकेट संघटनांना लोढा समितीचा अहवाल स्वीकारण्यास सांगितले होते. 

देशभरातील संघटनांनी हा अहवाल स्वीकारला; पण एमसीएने त्याकडे दुर्लक्ष केले. बीसीसीआयमधील अनेक महत्त्वाची पदे त्यामुळे महाराष्ट्रातील क्रिकेट तज्ज्ञांना मिळवता येत नाहीत. परिणामी महाराष्ट्रातील क्रिकेटचा विकास रखडला आहे. लाभाच्या तरतुदी स्वीकारायच्या आणि बंधनकारक सुधारणा टाळायच्या.. एमसीएची ही भूमिका क्रिकेटसाठी घातक आहे. खेळाचा विकास खेळाडू घडवून होतो; राजकीय समीकरणे जुळवून नाही. क्रिकेटच्या मैदानावर भ्रष्टाचाराचे दुकान थाटणाऱ्यांना जर वेळेत रोखले नाही, तर खेळाचे भवितव्य अंधारात जाण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी खेळाच्या कारभारातून राजकारण हद्दपार करणे हाच एकमेव मार्ग आहे. जोपर्यंत खेळातून राजकारण बाद होत नाही, तोपर्यंत खेळाडूंचे भवितव्य अधांतरीच असणार आहे. त्यामुळे ख्यातनाम खेळाडूंची थेट निवड करून त्यांच्या हाती कोणत्याही संघटनेची सूत्रे दिली तर ते चांगले खेळाडू घडवू शकतील.

English
हिंदी सारांश
Web Title : MCA's 'Khel'khandoba': Political Interference Stalls Cricket Progress

Web Summary : MCA faces scrutiny for alleged political interference, favoring relatives over deserving players. Court intervention halted elections due to rule violations. Focus shifts to removing politics from sports.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र