थायरॉइडचे आजार हायपोथायरॉइडिअम
By Admin | Updated: April 10, 2016 02:24 IST2016-04-10T02:24:25+5:302016-04-10T02:24:25+5:30
सर्वसाधारणत: थायरॉइडच्या आजारात वजन वाढते हा एक समज समाजात प्रचलित आहे. म्हणून हल्ली कित्येक स्त्री-पुरुष वजन वाढत असल्याने थायरॉइडची तपासणी करून घेतात.

थायरॉइडचे आजार हायपोथायरॉइडिअम
- डॉ. व्यंकटेश शिवणे
सर्वसाधारणत: थायरॉइडच्या आजारात वजन वाढते हा एक समज समाजात प्रचलित आहे. म्हणून हल्ली कित्येक स्त्री-पुरुष वजन वाढत असल्याने थायरॉइडची तपासणी करून घेतात.
वजन ज्या थायरॉइडच्या आजारात वाढते तो आजार म्हणजे हायपोथारॉइडिअम. या आजारात आपल्या थायरॉइडच्या ग्रंथीमधून पुरेशा मात्रेमध्ये थायरॉइडचा हार्मोन तयार होत नाही. हा हार्मोन शरीराच्या सर्वांगीण चयापचयासाठी अत्यंत आवश्यक आहे. शरीराच्या एकंदरीत चयापचयाचा वेग हा थायरॉइडवर अवलंबून असतो.
हायपोथायरॉइडमध्ये शरीराच्या ऊर्जेचा क्षय कमी प्रमाणात किंवा कमी गतीने होते. थायरॉइडच्या एकंदरी रुग्णांपैकी साधारणत: ६० - ७० टक्के रुग्णांना हायपोथायरॉइडचा आजार असतो. पूर्वी सांगितल्याप्रमाणे स्त्रियांमध्ये हा आजार पुरुषापेक्षा ४ ते ५ पटीने अधिक असतो.
हायपोथायरॉइडिअम व गरोदरपणा
गरोदरपणात हायपोथायरॉइडिअमच्या रुग्णांनी स्त्रीरोग तज्ज्ञांकडे किंवा थायरॉइड स्पेशालिस्टकडे जाऊन तपासणी करावी. कारण मातेच्या थायरॉइड पातळीवर जन्माला येणाऱ्या बाळाचा बुद्ध्यांक (आयक्यू) अवलंबून असतो. गरोदरपणात थायरॉइडच्या गोळ्यांचा डोस अधिक मात्रेमध्ये घ्यावा लागतो व दर ४ ते ६ आठवड्यांनी याची तपासणी आवश्यक असते. हायपोथायरॉइड असलेल्या स्त्रियांना गरोदरपणात रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
निदान
हायपोथायरॉइडचे निदान रक्तातील थायरॉइडच्या तपासणीने होते. यात टी३, टी४, एफटी३, एफटी४ या हार्मोनची पातळी नॉर्मल वा कमी होते. टीएसएच या हार्मोनची पातळी प्रमाणापेक्षा वाढलेली असते. सोबतच डॉक्टर थायरॉइडच्या एन्टीबॉडीची तपासणी करतात. जी वाढलेली किंवा नॉर्मल असू शकते.
उपचार
हायपोथारॉइडचा उपचार अत्यंत सोपा आहे. डॉक्टर या आजाराचे निदान झाल्यावर तुम्हाला थायरॉक्झीनची गोळी देतात. ही गोळी पुरेशा मात्रेमध्ये दररोज सकाळी उपाशीपोटी घ्यावी व गोळी घेतल्यावर कमीत कमी एक तास काही खाऊ किंवा पिऊ नये.
हायपोथायरॉइडची इतर कारणे
थायरॉइडची शस्त्रक्रिया केल्यामुळे, रेडिओ अॅक्टिव आयोडिनचा डोस घेतल्यामुळे, हायपोथायरॉइडच्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे, अॅमिओडासेनसारख्या गोळ्यांमुळे.
हायपोथायरॉइडची लक्षणे
१. सुस्ती येणे, डोळ्यावर नेहमी झापड येणे
२. वजन वाढणे.
३. बद्धकोष्ठता
४. पायांना व चेहऱ्याला सूज येणे
५. थायरॉइडच्या ग्रंथीवर सूज येणे
६. मासिक पाळी अनियमित येणे
७. वंशत्व (स्त्रियांमध्ये)
८. थंडी सहन न होणे
९. त्वचा कोरडी व थंड होणे
१०. केस गळणे इत्यादी.
बहुतांशरीत्या हायपोथायरॉइडचा आजार हा ं४३ङ्म्रे४ल्ली गटात मोडतो. कित्येक वेळा तो तपासणीमध्ये थायरॉइड आहे हे निष्पन्न होते किंवा रुग्णांमध्ये कोणतेही लक्षण आढळत नाही.
हायपोथायरॉइडची
इतर कारणे
थायरॉइडची शस्त्रक्रिया केल्यामुळे, रेडिओ अॅक्टिव आयोडिनचा डोस घेतल्यामुळे, हायपरथायरॉइडच्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे, अॅमिओडासेनसारख्या गोळ्यामुळे
हायपोथायरॉइडचे दुष्परिणाम
जर आपली थायरॉइडची पातळी पुरेशा मात्रेमध्ये नियंत्रणात नसेल तर रक्तातील कोलेस्टोरॉलचे प्रमाण, रक्तदाबाचे प्रमाण वाढू शकते. यासाठी स्वत:च्या मनाने निर्णय न घेता तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व योग्य त्या मात्रेमध्ये थॉयरॉक्झीनच्या गोळ्या घ्याव्यात.
समज व गैरसमज
बहुतांशरीत्या या आजारामध्ये थायरॉक्झीनची गोळी आयुष्यभर घ्यावी लागते. यामुळेच हायपोथायरॉइडचे रुग्ण जास्त घाबरून जातात. पण हा आजार अगदी सोपा आहे. एकदा टीएसएचची पातळी नॉर्मल आली तरी गोळी चालू ठेवावी लागते आणि सहा महिन्यांनी किंवा किमान वर्षातून एक वेळा थायरॉइडची तपासणी करावी.
कित्येक लोकांच्या मनात या हायपोथायरॉइडविषयी यामुळेच गैरसमज निर्माण होतात. आयुष्यभर गोळी घ्यावी लागेल. म्हणजे खूप गंभीर आजार आहे की काय ही भावना पण मनात रुजते. विशेषकरून स्त्रियांमध्ये किंवा लग्न न झालेल्या मुलीमध्ये ही धास्ती जास्त प्रमाणात दिसून येते.
वरील कारणातदेखील इलाज करणे आवश्यक असते व तुमचे तज्ज्ञ डॉक्टर याबाबतीत तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. एकंदरीत समाजामध्ये आजही थायरॉइडच्या आजाराविषयी खूप साऱ्या गैरसमुजती व अज्ञान आहे. लोकांमध्ये इतर आजारांसारखी थायरॉइडची जनजागृती करणे आवश्यक आहे.