शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

लेख: रोज आकाशात उडणाऱ्यांना हवी साथ... आणि सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 06:32 IST

पायलट, हवाई परिचारिका यांच्यावरील अतिरिक्त ताणाची कल्पनाही येणे कठीण! त्यांच्या मानसिक आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

अभिलाष खांडेकर,रोव्हिंग एडिटर, लोकमत

अहमदाबादमधील हृदयद्रावक विमान अपघाताचे दुःख इतके खोल आहे की तो विसरायला अनेक दिवस, कदाचित आठवडेही लागतील. विशेषतः त्या छोट्या मुलाला, आर्यन असारीला, ज्याने केवळ कुतूहलापोटी अपघाताचे चित्रीकरण केले. त्याने काढलेला व्हिडिओ खूपच प्रसिद्ध झाला आहे. परंतु सर्वांत मोठे दुःस्वप्न त्यांच्यासाठी ठरले ज्यांचे आप्तजन काही सेकंदांत मृत्युमुखी पडले.

ही गोष्ट केवळ त्या भारतीय किंवा परदेशी प्रवाशांची नाही, जे एअर इंडियाच्या ड्रीमलायनर अपघातात मरण पावले, तर ती त्यांचीही आहे जे जगभर सतत प्रवास करत असतात. आपले व्यावसायिक वा कौटुंबिक कर्तव्य निभावत यापुढेही ते प्रवास करतच राहतील; पण एक खोल भीती त्यांच्या मनात घर करून बसेल. या अपघाताच्या निमित्ताने हेही लक्षात ठेवायला हवे की आपण वर्षानुवर्षे सुखरूप प्रवास करत आलो आहोत, कारण प्रशिक्षित वैमानिक, कर्मचारी आपली काळजी घेत आपल्याला सुरक्षित घरी पोहोचवत आले आहेत.

अहमदाबाद विमान दुर्घटनेत २४१ प्रवासी आणि इतर अनेक जण मृत्युमुखी पडले. विमान अपघात तपास संस्था (एएआयबी), एअर इंडिया, बोइंग कंपनी आणि इतर विमानतज्ज्ञ या अपघाताचे कारण शोधत आहेत. अपघातानंतर ‘ब्लॅक बॉक्स’ आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर मिळाले असून, लवकरच त्यामधून १२ जूनच्या अपघाताचे कारण स्पष्ट होईल. विमान अपघात इतर अपघातांपेक्षा अधिक तीव्र भावनिक प्रतिक्रिया निर्माण करतात. अहमदाबादनंतर संपूर्ण देशात उठलेली सहवेदना आणि दुःखाची लाट २०२३ मध्ये ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या २९६ जणांचा बळी घेणाऱ्या रेल्वे अपघातानंतर मात्र दिसून आली नव्हती. हा भारतातील सर्वात प्राणघातक रेल्वे अपघातांपैकी एक होता. त्यावेळी रेल्वे मंत्रालयावर निष्काळजीपणा आणि देखभालीसंदर्भात गंभीर आरोप झाले होते. पण विमान वाहतूक क्षेत्रात भारताची कामगिरी उल्लेखनीय आहे. 

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (आयसीएओ) आणि अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (एफएए) या दोन्ही संस्थांनी भारत ज्या हवाई मानकांचे पालन करतो त्याला जागतिक सरासरीपेक्षा जास्त रेटिंग दिले आहे. २०१८ मध्ये भारताची सुरक्षा रेटिंग ६९.९५ टक्के होती, ती २०२२ मध्ये ८५.६५ टक्क्यांवर गेली, जेव्हा ‘आयसीएओ’ने ‘डीजीसीए’चे (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) परीक्षण केले. ‘आयसीएओ’च्या निकषांचे भारत १०० टक्के अनुपालन करत आहे.भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा विमान वाहतूक बाजार आहे. ‘उडान’ योजनेमुळे २०१७ पासून भारतात देशांतर्गत ६००हून अधिक मार्ग आणि ९०हून अधिक विमानतळ जोडले गेले आहेत. अमेरिका आणि चीननंतर भारत हा तिसरा सर्वांत मोठा देशांतर्गत विमान बाजार आहे. अशा मोठ्या दुर्घटनांनंतर भारताने अधिक सावध आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्याधुनिक व्हावे, ही काळाची गरज आहे.

‘एफएए’ने भारताला २०२१ मध्ये प्रथम श्रेणीमध्ये ठेवले असले तरी अहमदाबाद अपघाताने आपल्याला स्मरण करून दिले आहे की विमान उड्डाणासंदर्भात सर्व मानके, कार्यपद्धती काटेकोरपणे पाळल्या गेल्या पाहिजेत. त्यात कोणत्याही यांत्रिक वा मानवी चुकांना थारा नसावा. या सगळ्याबरोबरच, आता गरज आहे ती आपल्या वैमानिक, सहवैमानिक, कर्मचारी, ग्राउंड स्टाफ, एरोनॉटिकल इंजिनिअर्स आणि एअर ट्राफिक कंट्रोलमध्ये कार्यरत असणाऱ्यांचे मनोबल वाढवण्याची. शेवटी वैमानिकही माणूस आहे. वैमानिकांप्रमाणेच हसतमुख विमान परिचारिका रोज आपले प्राण धोक्यात घालतात. जेव्हा प्रवाशांना अपघाताची भीती वाटते, तेव्हा वैमानिक आणि कर्मचारी अधिक तणावाखाली असतात. ‘मे डे’ कॉलनंतर कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या मनात काय सुरू होते, याची आपण कल्पना करू शकतो का? 

अहमदाबादची दुर्घटना वैमानिकांवर आणि कर्मचाऱ्यांवर मानसिक दडपण आणणारी ठरू नये. विमानतळे तांत्रिकदृष्ट्या पूर्ण सुरक्षित असावीत यासाठी सरकारी आणि खासगी विमान कंपन्यांनी अधिक प्रयत्न करायला हवेत. कर्मचारी आणि वैमानिकांचा ताण कमी व्हावा. त्यांचे मानसिक आरोग्य, आत्मविश्वास, प्रशिक्षण आणि सुरक्षितता याकडे विशेष लक्ष देण्याची आज गरज आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडिया