शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

यांना उलट्या, त्यांना मळमळ, लोकांना काय होत असेल..?

By अतुल कुलकर्णी | Updated: September 1, 2024 14:00 IST

Tanaji Sawant News: आपण स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध आहात. त्याची प्रचीती उभ्या महाराष्ट्राला गेल्या आठवड्यात अनेक वेळा आली. अजित पवार गटाच्या नेत्यांसोबत मंत्रिमंडळ बैठकीत बसले की बाहेर आल्यानंतर उलट्या होतात हे आपण सांगितले. इतके स्पष्टपणे बोलणारा नेता या राज्यात दुसरा नाही.

- अतुल कुलकर्णी (संपादक, मुंबई) 

प्रिय तानाजी सावंत,आपण स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध आहात. त्याची प्रचीती उभ्या महाराष्ट्राला गेल्या आठवड्यात अनेक वेळा आली. अजित पवार गटाच्या नेत्यांसोबत मंत्रिमंडळ बैठकीत बसले की बाहेर आल्यानंतर उलट्या होतात हे आपण सांगितले. इतके स्पष्टपणे बोलणारा नेता या राज्यात दुसरा नाही. खरे तर आपण एक पुस्तकच लिहिले पाहिजे. "अकोला ते धाराशिव ते सुरत... गोहाटीमार्गे गोवा, मुंबई आणि मंत्रिमंडळातला प्रवेश" हा सगळा प्रवास आपण लिहिला तर ते जगातले बेस्ट सेलर पुस्तक होईल. राजकारणात येणाऱ्या कित्येक पिढ्यांना हे पुस्तक महत्त्वाचे ठरेल. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना आपल्याला मंत्रिमंडळात घेतले तर आपण पक्षासाठी काय काय कराल असे आपण उद्धव ठाकरे यांना सांगितले होते? त्याची यादीदेखील त्या पुस्तकात द्या, म्हणजे महाराष्ट्राला आपली प्रचंड क्षमता लक्षात येईल. आपण स्पष्ट बोलणारे म्हणून प्रसिद्ध आहात. परवा आपण केलेले विधान एकदम खतरनाक होते.

राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत म्हणजे अजित पवार गटासोबत मंत्रिमंडळ बैठकीत बसल्यानंतर बाहेर येताच आपल्याला उलट्या होतात असे आपण सांगितले. नेमक्या कोणत्या प्रकारच्या उलट्या होतात हे आपण अधून सांगितले असते तर बरेच झाले असते... उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित दादा उपमुख्यमंत्री असताना आपण ठाकरेंच्या सोबत होतात. तेव्हा आपण अजितदादांकडे कामासाठी जात होता. तेव्हा आपल्याला उलट्या होत नव्हत्या. त्या आताच कशा सुरू झाल्या, याचा शोध घेण्याच्या सूचना दादांनी दिल्या आहेत. आपल्या गटात अशा उलट्या आणखी किती जणांना होतात तेही सांगितले तर सगळ्यांसाठी एकत्रितरीत्या औषधी खरेदीचे टेंडर काढता येईल. ते टेंडरदेखील थेट मंत्रिमंडळ बैठकीतच आपण मंजूर करून घेऊ. एक घाव दोन तुकडे..! तिथल्या तिथे सह्या करायला सांगू.. उगाच फाईल इकडेतिकडे फिरत ठेवण्यात काय अर्थ आहे. जेवढा वेळ जाईल तेवढा तेवढे 'टक्के' औषधाचा परिणाम कमी होईल. एक टक्कादेखील परिणाम कमी होऊन चालणार नाही. कोणत्याही औषधाचा १००% परिणाम होण्यासाठी किमान २०% डोस तरी पोटात गेला पाहिजे. म्हणजे उलट्या होणे, मळमळ होणे थांबेल. असे आपल्या कार्यालयातील काही सहकारी सांगत होते. ते या क्षेत्रातले (म्हणजे टक्केवारीच्या नव्हे) तज्ज्ञ डॉक्टर आहेत असेही कळले. असो. मागे आरोग्य विभागाच्या फिरत्या दवाखान्यासाठी वाहन खरेदी करण्याच्या प्रस्तावाची फाईल इकडून तिकडे फिरत होती. तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी अजित दादांना, मंत्रिमंडळ बैठकीतच त्याच्यावर सही करायला सांगितले. त्यावरूनही तिथे धुसफूस झाली, अशा बातम्या बाहेर आल्या. खरे-खोटे माहिती नाही. मागेही आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या अॅम्ब्युलन्सच्या १००% बिलासाठी मंत्रालयात फक्त ७ ते ८ टक्के चकरा मारणाऱ्या ठेकेदारांना त्यांच्या बिलाची काळजी नसावी. त्यांनी मंत्रालयात किमान २० % तरी चकरा मारल्या पाहिजेत. म्हणजे फायलीवर उपस्थित शंकांचे निरसन होते. त्यात आरोग्य विभागाची काय चूक..? उगाच त्यावरून मंत्री कार्यालयाला बदनाम करणारे लोक दादांच्याच गटाचे असावेत....

धाराशिवमध्ये प्रश्न विचारणाऱ्या एका शेतकऱ्याला आपण झापले ते बरेच झाले. तुमच्या सभेत तुम्हालाच प्रश्न विचारणारा तो शेतकरी नक्की अजितदादांच्या गटातून आलेला असेल. त्याच्याशी बोलताना तुम्ही, "सगळ्यांनी आपापल्या औकातीत राहून बोलायचं आणि आपल्या औकातीत विकास करून घ्यायचा. मी ऐकून घेतोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलणार आणि मी ऐकणार. कुणाची तरी सुपारी घेऊन इथे बोलायचं नाही. कुणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही..." इतके रोखठोक बोलून त्याची मधून औकात काढली ते बरे झाले. शेतकरी असले म्हणून काय झाले.... आपला हा कित्ता आपल्या गटाच्या इतर नेत्यांनीही अंगी बाळगला पाहिजे. जेणेकरून सगळे शेतकरी १०० टक्के आपल्या पाठीला पाठ लावून उभे राहतील..!

तुम्ही फार टेन्शन घेऊ नका. तुम्ही धाराशिव जिल्ह्यातले आपल्या गटाचे सगळे उमेदवार जाहीर करून टाका. शेवटी त्यांनादेखील आपल्याकडून निवडणुकीच्या काळात गांधीजींचे फोटो छापलेले रंगीत कागद हवे असतात. अनेकांना गांधीजींचे फोटो छापलेले कागद जमवण्याचा छंद असतो. आपल्यामुळे त्यांचा छंद पुरा होतो याची त्यांना चांगली जाणीव आहे. इतरांकडून मिळणारे गांधीजींचे फोटो छोटे छोटे असतात. त्यामुळे छंद पुरा होत नाही. आपल्याकडून मिळणारे गांधीजींचे फोटो छंद जोपासण्यासाठी पुरेसे असतात. त्यामुळे उगाच टेन्शन घेऊ नका, तसेही यंदाच्या निवडणुकीत गांधीजींचे फोटोरूपी विचार मोठ्या प्रमाणावर घरोघरी पोहोचवण्याची योजना सुरू आहेच ना... गांधीजी म्हणायचे, खेड्याकडे चला.... आपणही त्यांना खेड्याकडे नेण्यासाठी मदतच करत आहात. त्यामुळे आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे....- आपलाच बाबूराव

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतAjit Pawarअजित पवार