शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आकाशात झुंडींनी उडणारे डासांच्या प्रणय नृत्याचे ‘सिक्रेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 06:42 IST

गेल्या आठवड्यात पुणे शहरात आकाशाच्या गुलाबी रंगाच्या पार्श्वभूमीवर उभ्या उभ्या विलोभनीय काळ्या रेषा दिसत होत्या... हे इतके डास एकत्र कशाला येतात?

विनय र. र.

‘सैराट’ सिनेमाच्या एका दृश्यात भिरभिरणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याचे विलोभनीय आकार दिसतात. गेल्या १२ तारखेला अशाच लवलवत्या विलोभनीय काळ्या रेषा पुणे शहरात आकाशाच्या गुलाबी रंगाच्या पार्श्वभूमीवर दिसत होत्या. नंतर कळले, की हे डासांमुळे तयार झालेले दृश्य आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात साधारणपणे तापमानात वाढ होते. उन्हाळ्याची सुरुवात होते. हे तापमान आणि जवळपास असणारा दमटपणा यांचा फायदा डासांना होतो. या लवलवत्या काळ्या हलत्या रेषा म्हणजे नर डासांचे प्रणय नृत्य असते. या वर्षी १४ फेब्रुवारी या प्रेमदिनाच्या - व्हॅलेंटाइन डेच्या आधीच डासांनी याची सुरुवात केलेली दिसते. या काळात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढते. नरडासाचे आयुष्य पाच-सहा दिवसच असते आणि या काळात त्याला आपले आयुष्य जगायचे असते. एक तरी मादी मिळालीच पाहिजे अशी त्याची अपेक्षा असते. 

आपल्या आसपास जसे नवतरुणांचे अड्डे असतात आणि ते जाणाऱ्या-येणाऱ्या तरुणींवर लक्ष ठेवत असतात, तसे डासांमध्ये नरांचे हे थवे! यात प्रचंड संख्येने नरडास असतात. नरडासांना सुरक्षितपणे आपली करामत दाखवण्यासाठी या थव्यांचा उपयोग होतो. ते वर-खाली भिरभिरत आपल्या दोन पंखांनी आवाज करत असतात. शिवाय आपल्या अंगातून गंधही सोडत असतात. खाली जमिनीवर किंवा अडगळीमध्ये किंवा गटारीमध्ये असणाऱ्या अंड्यातून बाहेर येणाऱ्या माद्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांची ही चाल असते. डासांच्या माद्याही चोखंदळपणे या नाचऱ्या नरांच्या झुंडीतून आपल्याला हवा तो नर धुंडत असतात. काही माद्या नरांचा शोध घेत घेत या नाचात सामील होतात. 

नर मादीची जोडी जुळली की ती जोडी झुंडीतून दूर निघून जाते. सगळ्या नरांना मादी मिळतेच असे नाही. काही नर कुवारे मरून जातात. तसं तर माद्यांचं आयुष्य पाच ते सहा आठवडे इतकं असतं मात्र त्यांच्या आयुष्यात नराशी मिलनाचा योग फक्त एकदाच येतो.  त्यानंतर त्या अंडी घालतात. त्यांना अंड्यांचे कवच तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रथिनांची गरज असते. त्यामुळे मादी डास माणसाच्या शरीरात सोंड खुपसून त्या स्ट्रॉने रक्त पितात आणि त्यातून त्यांना आवश्यक असणारी प्रथिने मिळवतात. तीन दिवसांनी अंडी घालतात ती साचलेल्या पाण्याच्या पृष्ठभागावर. पुढची अंडी घालण्यापूर्वी या माद्यांना पुन्हा रक्तातील प्रथिनांची गरज असते. तेव्हाच त्या पुन्हा रक्त पितात. इतरवेळी मादी डास नर डासांप्रमाणे फुलांमधील मकरंद तसेच झाडांमधून अन्नरस पिऊन आपली भूक भागवतात. त्या प्रक्रियेत परागीभवन होऊन झाडांची फलधारणा होते. माणसाप्रमाणे अन्य सस्तन प्राणी, पक्षी यांचे रक्तही मादी डासांना चालते. डासांच्या डंख्यण्यातून शरीरात एक रसायन  सोडले जाते, त्यामुळेच झोंबून खाज सुटते. 

ओ रक्तगटाच्या व्यक्तींना डास अधिक प्रमाणात चावतात. त्यामानाने ए रक्तगटाच्या व्यक्तींना कमी चावतात. या रसायनामुळे रक्त गोठण्याची शक्यता कमी होते. तसेच सूक्ष्म रक्तवाहिन्या वाढायलाही मदत होते. डासांच्या चाव्यापायी आपण हैराण होतो. हिवताप किंवा मलेरिया,  हत्तीपाय किंवा फायलेरिया, डेंगी झिका, चिकुनगुनिया असे रोग होऊ शकतात. त्यामुळे - डासमुक्त जग - म्हणत जगातले सर्व डास नष्ट करायच्या मागे लागतो. त्यांचे नियंत्रण करणे योग्य असले तरी ते नष्ट करून डासांवर अवलंबून असणाऱ्या अन्य सजीवांचे जगणे क्लेशकारक होण्यास आपण कारणीभूत ठरू. पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराचे नृत्य जसे आल्हाददायक असते तसेच नरडासांचे प्रणयनृत्यही आनंदाने पहावे. मादी डासांच्या चाव्यातून असा धडा घ्यावा की हा निसर्ग फक्त माणसाच्या सुखासाठी बनलेला नाही; सर्व सजीवांच्या जगण्यासाठी बनलेला आहे.

(लेखक विज्ञान प्रसारक, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यकर्ते आहेत)

टॅग्स :MosqueमशिदHealthआरोग्यscienceविज्ञान