शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लेख: कृपा करा, आमच्या देशात येऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 09:49 IST

पर्यटकांच्या लोंढ्यांनी अनेक शहरांमध्ये उच्छाद मांडला आहे. पर्यटनज्वराने ग्रासलेल्या युरोपात तर पर्यटकांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत!

उज्ज्वला बर्वेमाध्यम अभ्यासकपर्यटन व्यवसाय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो, पर्यटकांना संस्मरणीय आनंद मिळतो हे खरे, पण  पर्यटन हे दुधारी शस्त्र आहे, हे आता सगळ्यांच्या लक्षात आले आहे. त्याचे फटके ज्यांना बसतात, त्यांनी प्रमाणाबाहेर चाललेल्या पर्यटनाच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. 

स्पेनमधल्या बार्सिलोना शहरात ‘नेबरहूड असेंब्ली फॉर सस्टेनेबल टुरिझम’ (शाश्वत पर्यटनासाठी परिसर संघटना) ही संस्था स्थापन झाली आहे. या संस्थेचे सदस्य सनदशीर मार्गाने त्यांच्या मागण्या मांडत आहेतच, पण कधी कधी पर्यटकांच्या सायकलींच्या चाकांतली हवा काढून टाकणे, पर्यटक वाहनांना थांबवणे, असे प्रकारही ते करतात. ‘पर्यटकांनो, परत जा!’ किंवा ‘आमचं शहर म्हणजे बीच रिझॉर्ट नाही’ असे फलक घेऊन ते पर्यटकांनी गजबजलेल्या रस्त्यांवर आक्रमक निदर्शने करतात. इटलीमधल्या व्हेनिस शहरात तर अशी निदर्शने ही नित्याची गोष्ट झाली आहे. ५० हजार लोकांच्या वस्तीसाठी योग्य असलेल्या या शहरात वर्षभरात दोन कोटी लोक राहून जातात. 

पाण्यात वसलेल्या या शहरातील जमीन इतक्या लोकांच्या वजनाने खाली जाते, असे म्हणतात. शेकड्याने पर्यटक आणणारी महाकाय जहाजे आणि इतर लहान-मोठ्या बोटींमुळे जुन्या इमारतींच्या पाण्यात असलेल्या पायांना धोका निर्माण झाला आहे.नेदरलँड्समधल्या आमस्टरडॅम या शहराच्या मध्यवर्ती भागात पर्यटकांची एवढी गर्दी होते की, फोटोंमधून प्रसिद्ध झालेली ‘आय लव्ह आमस्टरडॅम’ ही मोठी पाटी प्रशासनाने आता काढून टाकली आहे. पर्यटकांनी आपल्या देशात आल्यावर कसे वागावे, हे सांगणारे व्हिडीओ प्रसृत केले आहेत. त्याच्या जोडीला शहराच्या बाहेर वेगवेगळी पर्यटनस्थळे तयार करून पर्यटकांना तिकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तिकडे युरोपातच पर्यटनज्वराने शहरांना ग्रासले आहे, असे नाही. जपानमध्ये वाढत्या पर्यटनामुळे स्थानिक लोक अस्वस्थ होऊ लागले आहेत. भारतातही गोव्यापासून सिमलापर्यंत सर्वत्र पर्यटन व्यवसायाच्या फायद्यांबरोबरच त्याचे तोटे लोकांना जाणवू लागले आहेत.  त्याविरोधात स्थानिक नागरिक एकत्र यायला लागले आहेत. पर्यटकांच्या बाजूने विचार केला तरीही पर्यटनातून त्यांना जो सांस्कृतिक अनुभव, निवांतपणा, प्रसन्नता हवी असते ती गर्दीच्या पर्यटकांच्या लोंढ्यात त्यांना मिळते का, हा प्रश्न निर्माण झालाच आहे.

माद्रिद, आमस्टरडॅम, पॅरीस, लंडन ही लोकप्रिय पर्यटनस्थळे असली तरी ती त्या-त्या देशांची राजधानीची शहरे आहेत. तिथे पर्यटनाखेरीज अनेक महत्त्वाची कामे चालतात. साहजिकच स्थानिक रहिवाशांची संख्या मोठी आहे. त्यांना राहण्यासाठी परवडतील अशी घरे पूर्वी मिळत असत. पण, अलीकडे एअर बीएनबीसारख्या - स्थानिक लोकांची घरे राहण्याकरिता उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांची संख्या प्रचंड वाढली आहे. भाडेकरूंकडून एका महिन्याला जेवढे भाडे मिळू शकते त्यापेक्षा कितीतरी जास्त भाडे पर्यटकांना तात्पुरत्या स्वरुपात घर भाड्याने दिल्यामुळे मिळायला लागले. परिणामी स्थानिकांना भाड्याची घरे मिळेनाशी किंवा परवडेनाशी झाली आहेत.

पूर्वी पर्यटक हॉटेलांमध्ये राहात असल्याने  शहराच्या मध्यवर्ती भागात त्यांचा वावर असे. पण, आता शहराच्या कोणत्याही भागांतील कोणतेही घर पर्यटकांसाठी खुले झाल्याने सर्वत्र पर्यटक दिसतात. ते मजा करण्याच्या, ऐश करण्याच्या मनःस्थितीत असतात, वेळीअवेळी येणे-जाणे, मोठ्या आवाजात बोलणे त्यांना गैर वाटत नाही. पण, तिथल्या रहिवाशांना त्याचा उपद्रव होऊ लागला आहे. या पर्यटकांना स्थानिक जीवनमान बघण्याची मजा घेता येते. पण, शहरवासीयांच्या मनात मात्र आपली घरे, दुकाने हे पर्यटकांसाठी फक्त रीलचे विषय आहेत. आपल्या संस्कृतीचे वस्तूकरण होत आहे, अशी भावना बळावायला लागली आहे.

बार्सिलोना, लिस्बन, अगदी आपले सिमला, मनाली या शहरात येणाऱ्या लोंढ्यांमुळे दररोज किती कचरा निर्माण होतो, किती पाणी वापरले जाऊन पाण्याचा तुटवडा निर्माण होतो, याचा अंदाज बांधणे अवघड नाही. बेजबाबदार पर्यटकांनी हिमालयाच्या डोंगररांगांवर निर्माण केलेले कचऱ्याचे, प्लास्टिकचे ढिगारे पर्यटनाविषयी अनेक प्रश्न निर्माण करतात. अनेक ठिकाणचे नैसर्गिक अधिवास पर्यटकांच्या लोंढ्यांमुळे धोक्यात आले आहेत.

यावर वेगवेगळे देश आपापल्या पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. भुतान या देशाने पर्यटकांवर मोठे शुल्क लावायला त्यांनी सुरुवात केली आहे. अनेक युरोपीय शहरांना जास्त पैसे खर्च करून कमी त्रास देणारे पर्यटक हवे आहेत.  नव्या हॉटेलांना परवानगी नाकारली जात आहे. एअरबीएनबीसारख्या योजनांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण पर्यटनापासून मिळणाऱ्या आनंदापासून अनेकांना वंचित ठेवणारे हे मार्ग शाश्वत न ठरण्याची शक्यता जास्त आहे. त्याऐवजी पर्यटनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे.

पर्यटकांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. आपल्याला प्रवास का करायचा आहे, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. कुटुंबाबरोबर, मित्रांबरोबर निवांत वेळ घालवायचा असेल तर कमी गर्दीच्या ठिकाणांचा विचार करायला काय हरकत आहे?  ‘आम्ही इतक्या देशांना जाऊन आलो’ याबद्दलची शेखी मिरवणाऱ्या पर्यटनाला काहीही अर्थ नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

चांगले पाहुणे यजमानांच्या सोयीने त्यांच्याकडे जातात. यजमानांच्या घरात कचरा करत नाहीत, दंगामस्ती करत नाहीत, त्यांचे घर आपल्यामुळे खराब होणार नाही, याची काळजी घेतात, त्यांच्या घरच्या चालीरीतींचा सन्मान करतात. पर्यटकांनी असे पाहुणे व्हायला हवे आहे. सगळी जबाबदारी पर्यटकांवर टाकून चालणार नाही, हेही खरेच. सरकार आणि प्रशासनाच्या स्तरावरही मार्ग शोधावे लागतील.  अशी चहूबाजूंनी मोर्चेबांधणी झाली तरच पर्यटन, पर्यटन व्यवसाय आणि पर्यटनातील आनंद टिकू शकेल.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय