शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आयटी क्षेत्रात क्रांती घडविणारा ‘पाटील इफेक्ट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 07:02 IST

मराठी माणसांनी अटकेपार झेंडे रोवल्याचा इतिहास वाचून आपली छाती अभिमानाने फुलते. विविध क्षेत्रात जगभरात कर्तृत्ववान मराठी माणसांनी आपली छाप उमटवली आहे.

नंदकिशोर पाटील

संपादक, लोकमत, छत्रपती संभाजीनगर

मराठी माणसांनी अटकेपार झेंडे रोवल्याचा इतिहास वाचून आपली छाती अभिमानाने फुलते. विविध क्षेत्रात जगभरात कर्तृत्ववान मराठी माणसांनी आपली छाप उमटवली आहे. उच्च शिक्षण, संशोधन आणि तांत्रिक कौशल्यांच्या जोरावर अनेक मराठी तरुण जगातील आघाडीच्या क्षेत्रांत नेतृत्व करत आहेत. या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे - राहुल पाटील! कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन करणाऱ्या ‘अँथ्रोपिक’ या कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून त्यांनी घेतलेली झेप सध्या जागतिक आयटी क्षेत्राच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

‘अँथ्रोपिक’ने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पायाभूत रचनेत,  क्लाऊड संगणक क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवला आणि आयटी क्षेत्रात अक्षरश: भूकंप यावा, अशी स्थिती निर्माण झाली. गुगल, मेटा, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, ऑरेकलपासून टीसीएस, इन्फोसिस, विप्रो पर्यंत; नामांकित आयटी कंपन्यांचे शेअर्स एका रात्रीतून गडगडले. या सर्व क्रांतीकारी बदलामागे राहुल पाटील नावाचा बुद्धिमान मराठी तरुण असल्याचे समोर आले. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्याचे असलेले राहुल पाटील हे मराठी भाषक. शालेय शिक्षण बागलकोट येथे झाले. बंगळुरूमधील अभियांत्रिकी शिक्षणानंतर ते ‘एमएस’ करण्यासाठी अमेरिकेत गेले. दोन दशकांहून अधिक काळ जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात अनुभव संपादन केला. ‘स्ट्राइप’मध्ये तंत्रज्ञान प्रमुख म्हणून अब्जावधी डॉलर व्यवहारांची सुरक्षित प्रक्रिया सुनिश्चित करणारी प्रणाली विकसित करण्यात त्यांचे योगदान आहे.

राहुल पाटील

कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन करणाऱ्या ‘अँथ्रोपिक’ या कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी  म्हणून त्यांनी घेतलेली झेप सध्या जागतिक आयटी क्षेत्राच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

सॉफ्टवेअर कंपन्यांचे बाजारमूल्य का गडगडले? 

ऑक्टोबर २०२५ मध्ये राहुल पाटील हे ‘अँथ्रोपिक’ या कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि विकास करणाऱ्या कंपनीत मुख्य तंत्रज्ञान अधिकारी  म्हणून रुजू झाले. ही कंपनी संवेदनशील व सुरक्षित एआय मॉडेल विकसित करण्यासाठी ओळखली जाते. आयटी क्षेत्रात उडालेली खळबळ केवळ भीतीमुळे नव्हे, तर ‘अँथ्रोपिक’ने विकसित केलेल्या ‘क्लॉड’ या प्रगत भाषा मॉडेलमुळे आहे.

‘क्लॉड’ केवळ मजकूर निर्मितीपुरते मर्यादित नसून कायदेशीर कागदपत्रांचे विश्लेषण, कोड लेखन, करार तपासणी अशा गुंतागुंतीच्या कामांचे स्वयंचलितपणे व्यवस्थापन करू शकते. त्यामुळे अनेक पारंपरिक आयटी सेवा कंपन्यांसाठी हे आव्हानात्मक ठरले आहे. या तांत्रिक प्रगतीचा आर्थिक परिणामही लक्षणीय ठरला आहे. या कंपनीने केलेल्या प्रगत एआय क्षमतांच्या अधिकृत घोषणेनंतर पारंपरिक सॉफ्टवेअर कंपन्यांच्या बाजारमूल्यात मोठी घसरण झाली.

आयटी क्षेत्रात खळबळ?

आयटी कंपन्या प्रामुख्याने मनुष्यबळावर आधारित सेवा मॉडेल वापरतात. कोडिंग, टेस्टिंग, सपोर्ट, डॉक्युमेंटेशन इत्यादी. मात्र ‘अँथ्रोपिक’चे ‘क्लॉड’ सारखे प्रगत एआय मॉडेल हीच कामे काही मिनिटांत, कमी खर्चात करू शकतात. यामुळे सॉफ्टवेअर कन्सल्टिंग क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.

संभाव्य व्यापक परिणाम

रोजगार संरचनेत बदल : कमी कौशल्याच्या आयटी नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

उच्च कौशल्यांची मागणी वाढ : एआय प्रशिक्षण, मॉडेल मॉनिटरिंग, डेटा सायन्स

शिक्षण क्षेत्रावर प्रभाव : एआय-आधारित संशोधन व शिक्षण साधने

व्यवसाय मॉडेलमध्ये परिवर्तन : “मानव+एआय” सहकार्याची नवी पद्धत

यात नवीन काय आहे?

‘अँथ्रोपिक’ने चॅटबॉट विकसित केला नाही; तर स्वयंचलित निर्णय घेणारी व कामे पूर्ण करणारी प्रणाली विकसित केली. उदा. संपूर्ण कोड प्रोजेक्टचे पुनरावलोकन करणे, कायदेशीर दस्तऐवजांचे विश्लेषण, आर्थिक अहवालांचे अंकेक्षण हे सर्व मानवी हस्तक्षेपाशिवाय शक्य होत आहे. 

‘अँथ्रोपिक’ कंपनी नेमके काय करते?

अमेरिकेतील एआय स्टार्टअप ‘अँथ्रोपिक’ने आणलेल्या क्लाऊड कोवर्क या नव्या चॅटबॉट व्हर्जनमुळे नामांकित आयटी कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. या व्हर्जनचे जनक अनिवासी भारतीय राहुल पाटील आहेत. म्हणूनच, जागतिक शेअरबाजारातील पडझडीला ‘पाटील इफेक्ट’ म्हटले गेले. ‘ओपन-एआय’ मधून बाहेर पडलेल्या संशोधकांनी ही कंपनी स्थापन केली.

उद्दिष्ट स्पष्ट होते. एआय केवळ शक्तिशाली नको, तर सुरक्षितही असावा. ‘क्लॉड’ हे त्यांचे प्रमुख मॉडेल केवळ मजकूर तयार करत नाही; तर ते विश्लेषण, तर्क, दस्तऐवज वाचन, कोड लेखन, करार तपासणी, संशोधन संक्षेप, ग्राहक सेवा ऑटोमेशन अशा अनेक गुंतागुंतीच्या कामांसाठी वापरले जाते.

‘अँथ्रोपिक’ला अब्जावध डॉलरची गुंतवणूक मिळाली

आहे या कंपनीने विकसित केलेल्याएआय तंत्रज्ञानाची झपाट्याने प्रगती पाहून गुंतवणूकदारांनी पारंपरिक सॉफ्टवेअर कंपन्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्हउपस्थित केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Patil's AI Revolution: The 'Patil Effect' Shakes IT World

Web Summary : Rahul Patil's work as CTO at Anthropic is disrupting the IT sector. Anthropic's AI model, Claude, automates complex tasks, impacting traditional software companies and causing market value declines. This 'Patil Effect' signals a shift towards AI-driven solutions and a potential restructuring of IT jobs.
टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स