शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

मनात फक्त विचार आला, की खोलीतला दिवा बंद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 05:31 IST

रुग्णाच्या विचारांवर कृत्रिमरीत्या नियंत्रण मिळविण्यासाठी इलेक्ट्रिक सर्किटवाल्या चिप्स त्याच्या मेंदूत बसविण्याचे तंत्रज्ञान वेगाने प्रगत होते आहे. त्याविषयी!

- अच्युत गोडबोले, ख्यातनाम लेखक सहलेखिका- आसावरी निफाडकरआपण बसल्या जागेवरून वस्तू इकडून तिकडे हलवतोय, दिवे चालू-बंद करतोय, ग्लास उचलतोय, पाणी पितोय  आणि यासाठी आपल्याला फक्त विचार करण्याची तसदी घ्यावी लागते आहे. हे स्वप्नवत वाटत असलं तरी हे उद्याच्या जगात मुळीच अशक्य नसेल. आपण जेव्हा एखादी क्रिया करतो तेव्हा मेंदूतल्या न्यूरॉन्समधून काही रसायनं आणि इलेक्ट्रिकल सिग्नल्स सोडले जातात. पण काहींच्या बाबतीत हे न्यूरॉन्स योग्यप्रकारे काम करू शकत नाहीत. अशांना मग दररोजच्या क्रिया करणंही अवघड जातं. सतत चिडचिड होणं, ताण जाणवणं, विसर पडणं, उठता-बसता न येणं अशा गोष्टी होतात. विचार  नियंत्रित करणारा ‘कॉर्टेक्स’ नावाचा मेंदूचा भाग हा कवटीच्या जवळ असतो. या विचारांवर कृत्रिमरित्या नियंत्रण मिळविण्यासाठी मेंदूत काही इलेक्ट्रिक सर्किट असलेल्या चिप्स बसविल्या जातात आणि त्या माणसाला अनेकप्रकारे मदत करतात याला ‘ब्रेन इम्प्लांट’ असं म्हणतात. मानवी मेंदू आणि कॉम्प्युटर जोडण्याचा पहिला प्रयोग १९९८ साली जर्मनीतल्या एमोरी विद्यापीठ आणि तुबिंजेन विद्यापीठ यांनी मिळून केला. पक्षाघात झालेल्या एका ५६ वर्षीय रुग्णाचा  मेंदू आणि कॉम्प्युटर एका इलेक्ट्रॉडनं जोडला. कॉम्प्युटरच्या समोरच बसलेल्या या रुग्णाला कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर कर्सर दिसत होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर फक्त आपल्या मनात विचार आणून त्या कर्सरवर नियंत्रण मिळविण्यात त्याला यश आलं. त्याच्या मनातले विचार लहरींच्या रुपात इलेक्ट्राॅडमार्फत कॉम्प्युटरमध्ये शिरतील आणि त्या लहरींमार्फत रुग्णाला काय म्हणायचं आहे हे कॉम्प्युटरला समजेल, अशी सोय संशोधकांनी केली होती. त्याचवर्षी २४ ऑगस्टला केव्हिन वॉरविक नावाच्या एका प्राध्यापकानं ‘सायबोर्ग (Cyborg)’ नावाचा प्रकल्प हाती घेतला. स्वत:च्या दंडात लहानशी शस्त्रक्रिया करून एक रिसीव्हर आणि एक ट्रान्समीटर असलेली चिप बसवून घेतली. 

तो  विद्यापीठाच्या आवारात कुठेही फिरला तरी त्या कॉम्प्युटरला सिग्नल्स जायचे. हळूहळू दार उघडणं, दिवे/हीटर चालू-बंद करणं, असं सगळंच तो करू शकत होता आणि तेही चक्क फक्त मनात विचार आणून ! २००६ साली मात्र  अजून एक मोठं यशस्वी पाऊल पडलं. ब्राऊन विद्यापीठाच्या जॉनडोनोग्ह्यू यानं ‘ब्रेन गेट’ नावाचं एक उपकरण तयार केलं. मेंदूला जखम होऊन वाचा गेलेल्या रूग्णांना संवाद साधता यावा यासाठी त्यानं हे उपकरण तयार केलं होतं. असे रुग्ण विचार करू शकतात; पण त्यांचा मेंदू इतर अवयवांशी संवाद साधून कृती करू शकत नाही. डोनोग्ह्यूनं तयार केलेली ४ मिलिमीटरची एक चिप रूग्ग्णाच्या डोक्यावर बसवली की रुग्णाच्या मेंदूतल्या हालचाली कॉम्प्युटर टिपतो आणि त्यानुसार रुग्णाला संपर्क साधण्यात किंवा इतर हालचाली करण्यास मदत करतो. सुरुवातीला कॉम्प्युटरवरचा कर्सर हलवणं, नंतर ई-मेल लिहिणं-पाठवणं असं सगळं हे रुग्ण हळूहळू करायला लागायचे. 
आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे या तंत्रज्ञानाला चांगलाच आधार मिळाला आहे. रूग्णांच्या मेंदूत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)चा अल्गॉरिदम लिहिलेली एक लहानशी चिप शस्त्रक्रियेद्वारे बसवली जाते. रूग्णाच्या मनात नैराश्य किंवा आत्महत्या असे कुठलेही विचार यायला लागले की,  ही चिप रूग्णाच्या मेंदूला बारीकसा शॉक देते आणि त्याच्या मनातले हे विचार घालवते. याला ‘ब्रेनस्टिम्युलेशन’ असं म्हणतात. त्यावेळी त्या चिपला डॉक्टरच्या परवानगीचीही गरज भासत नाही. हे काम ती स्वत:च्या डोक्यानं (अल्गॉरिदमनं) करत असते. अर्थात या चिप्स अजून परिपूर्ण झालेल्या नाहीत. पुढे जाऊन अशा चिप्स अनेक मानसिक तसंच मानसिक-शारीरिक (psycho-somatic) आजारांवरही उपयुक्त ठरतील, अशी अपेक्षा आहे. अमेरिकेतली डार्पा (DARPA) ही लष्करी संस्था अशा संशोधनांना चालना देते आहे. याचं कारण AI चा उपयोग करून जखमी सैनिकांना हालचाली करण्यात मदत मिळू शकेल, अशी त्यांना आशा आहे. टेस्ला आणि स्पेस एक्सचा सीईओ इलॉन मस्कनं ‘न्युरोलिंक’ नावाचा भन्नाट प्रकल्प हाती घेतलाय. एखाद्या नाण्याच्या आकाराची चिप रुग्णाच्या मेंदूत बसवली जाईल. या चिपला आपल्या केसांपेक्षा तब्बल २० पटीनं बारीक असलेल्या वायर्स जोडलेल्या असतील. मेंदूमधल्या हालचाली टिपण्यासाठी या वायर्समध्ये १०२४ इलेक्ट्रॉड्स असतील. इलेक्ट्रॉड्सनी या मेंदूतला डेटा मिळवला की तो कॉम्प्युटरकडे पाठवला जाईल. त्यासाठी वायरची गरज भासणार नाही. थोडक्यात मेंदू ते कॉम्प्युटर यांच्यामधली देवाणघेवाण ही वायरलेस पद्धतीनं होईल आणि कैक मैल लांब राहून रुग्णावर नियंत्रण मिळवता येईल. पण त्यासाठी आपल्याला अजून थोडी वाट बघावी लागणार आहे. आपला मेंदू आणि कवटी यांच्यातलं अंतर फारच कमी असतं. तसंच या चिप्स धातूच्या असतात आणि त्या घातक ठरू शकतात. हे दोन प्रश्न सुटले तर या चिप्स/ इम्प्लांट्स परावलंबी रूग्णांसाठी वरदान ठरतील यात शंकाच नाही !   godbole.nifadkar@gmail.com