शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

मुलीला आईने फेकलं अस्वलासमोर... पुढे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 10:04 IST

अशा या ‘रानटी’ अस्वलाच्या समोर स्वत:च्याच मुलीला फेकणं म्हणजे जगावेगळीच घटना. उजबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे नुकतीच ही घटना घडली.

आईची थोरवी सगळ्यांनाच माहीत आहे; पण एखाद्या मातेनं आपल्याच लहानग्या मुलीला जंगली अस्वलासमोर फेकलं तर? आश्चर्य वाटेल, पण अशी घटना नुकतीच घडली आहे आणि ती प्रचंड व्हायरलही झाली आहे. या घटनेचे व्हिडिओही सर्वत्र फिरताहेत. पण त्याआधी अस्वल हा प्राणी म्हणजे काय चीज आहे, हे जाणून घेऊ. गावोगावी जाऊन अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी अपरिचित नाही. त्या दरवेशाच्या तालावर अस्वल अक्षरश: ‘नाचत’ असतं. दरवेशी म्हणेल तसं  ऐकत असतं.. अस्वलाचा हा खेळ कुठे रस्त्यावर चालू असेल तर अनेक जण; अगदी मोठी माणसंही थांबून तो खेळ पाहातात.पण ज्याला खेळवू शकू इतका अस्वल हा प्राणी साधा आहे? अनेकांना अस्वलाबाबत माहीत नाही, पण वन्यप्राणी अभ्यासक किंवा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारा,.. ‘जंगलातला सर्वात खतरनाक प्राणी कोणता?’ वाघ, सिंह, हत्ती अशा प्राण्यांची नावं तो सांगेल असं तुम्हाला वाटेल, पण ज्यानं जंगल पाहिलं आणि अनुभवलं असेल, असा जाणकार माणूस नक्कीच सांगेल, ‘जंगलातला सर्वांत खतरनाक प्राणी म्हणजे अस्वल!’ कारण अस्वल कोणत्या वेळी कसं वागेल याचा काहीच नेम नाही. ‘धोका’ वाटला नाही, वाघ-सिंहाच्या ‘राज्यात’ मुद्दाम जाऊन तुम्ही काही ‘खोड्या’ केल्या नाहीत, त्यांची पिलं जवळ असताना तुम्ही तिथे गेला नाहीत, ते भुकेले नसतील, तर बऱ्याचदा हे प्राणी तुम्हाला ‘सोडून’ही देतील.. काहीही करणार नाहीत, पण अस्वलाचं तसं नाही. त्याची नजर अंधुक असली तरी, त्याचं नाक मात्र प्रचंड तीक्ष्ण असतं. अगदी दोन किलोमीटर अंतरावरचा वासही त्याला येऊ शकतो आणि त्याच वासाच्या सहाय्यानं आपल्या भक्ष्याचा मागही तो शोधतो. ‘डोकं फिरलं तर’ कोणाच्याही मागे ते लागू शकतं आणि त्याचा पिच्छा पुरवू शकतं. केसांच्या जंजाळात त्याच्या हातापायांची नखं दिसत नसली, तरी त्यात प्रचंड ताकद असते. आपल्या नखांच्या या राक्षसी ताकदीनं माणसाला अगदी कवटीपासून ते त्याची हाडं दिसेपर्यंत ते सोलून काढू शकतं. जंगल परिसरात राहणाऱ्या अनेक लोकांना या प्राण्याचा चांगलाच अनुभव आला आहे. त्यामुळे वाघ, सिंहापेक्षाही ते जास्त घाबरून असतात, ते अस्वलालाच. म्हणून कोणीही जाणकार व्यक्ती स्वत:हून किंवा अगदी ‘अजाणतेपणीही’ अस्वलाच्या नादी लागत नाही..अशा या ‘रानटी’ अस्वलाच्या समोर स्वत:च्याच मुलीला फेकणं म्हणजे जगावेगळीच घटना. उजबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे नुकतीच ही घटना घडली. येथे एक अतिशय प्रसिद्ध असं राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय आहे. त्यात वेगवेगळे प्राणी ‘मुक्त’ अवस्थेत ठेवलेले आहेत. त्यातच अस्वलांसाठीही एक भलीमोठी जागा आहे. अर्थातच त्यांना पिंजऱ्यात कोंडलेलं नाही. ते मुक्तपणे फिरू शकत असले, तरी त्यांची फिरण्याची जागा मात्र मर्यादित आहे. नैसर्गिक वातावरण त्यांना उपलब्ध करून देण्यात आलं असलं तरी त्याला लोखंडी दरवाजे आहेत आणि पर्यटकांना हे प्राणी पाहाता यावेत यासाठी लोखंडी जाळ्याही आहेत. झूझू नावाचं एक जंगली अस्वल या प्राणिसंग्रहालयात आहे. ‘अतिशय डेंजर’ म्हणून हे अस्वल प्रसिद्ध आहे.  त्याच्यासाठीची तटबंदीही तशीच भक्कम आहे. १६ फूट खोल अशा ‘संरक्षित’ जागेत त्याला ठेवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी एक महिला तिथे आली. पर्यटकांना या अस्वलाला पाहाता यावं यासाठीची जाळ्यांची जी जागा आहे, त्याच्याजवळ ही महिला गेली. तिच्यासोबत होती तिची तीन वर्षांची मुलगी; पण अचानक या महिलेनं आपल्या मुलीला उचललं आणि जाळ्यांच्या आतून त्या अस्वलाच्या दिशेनं फेकलं.मुलीला अस्वलाच्या पुढ्यात फेकताक्षणीच ते अस्वलही धावतच त्या मुलीजवळ गेलं. आपला पंजा त्यानं तिच्या दिशेनं उगारला. आता पुढे काय होणार या भीतीनं सगळ्यांच्या हृदयाचा थरकाप उडाला.. या मुलीला अस्वल आता डोक्यापासून पायापर्यंत सोलवटून काढणार असं वाटत असतानाच ते थोडा वेळ शांत झालं. मुलीला हुंगून बाजूला बसलं. तेवढ्यात प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनीही लगेच त्या अस्वलाच्या आवडीचं खाद्य त्याच्यासमोर धरलं. अस्वल खाद्याच्या दिशेनं थोडं सरकलं. तेवढ्या वेळात सहा कर्मचारी जिवाची पर्वा न करता आत शिरले आणि त्यांनी त्या मुलीला उचलून बाहेर आणलं. सुदैवाची गोष्ट म्हणजे इतक्या उंचावरून फेकल्यावरही त्या मुलीला खरचटण्याव्यतिरिक्त फार काही झालं नव्हतं.. सगळ्यांच्या तोंडी शब्द होते, ‘देव तारी त्याला कोण मारी!’..

आईला जावं लागेल कोठडीत! आरोपी महिला मानसिक आजारानं ग्रस्त होती असं म्हटलं जातंय. घटनेनंतर प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी लगेच तिला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. तिच्यावर आता खटला चालू आहे. सुदैवानं मुलीला काहीही झालं नसलं तरी मुलीच्या खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली १५ वर्षांपर्यंत तुरुंगाची हवा तिला खावी लागेल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस