शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

डार्क वेब ... सायबर विश्वातील अंडरवर्ल्ड

By मनोज गडनीस | Updated: June 25, 2023 13:12 IST

The Dark Web: तंत्रज्ञानाच्या या सुविधेचा फायदा कसा करून घेता येईल याची चाचपणी करत अनेक दुष्प्रवृत्तींचा यामध्ये शिरकाव झाला. याचे दृश्य परिणाम आपल्याला पॉर्न साइट असतील किंवा मग सायबर तंत्राच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक असेल, या माध्यमातून दिसू लागले.

 - मनोज गडनीसइं टरनेट नावाच्या तंत्राविष्काराची १९९०च्या दशकात निर्मिती झाली आणि बघता बघता इंटरनेटच्या माध्यमातून विणल्या गेलेल्या माहितीच्या जाळ्याने आपले आयुष्य व्यापून टाकले. दैनंदिन जगण्यातील अनेक व्यवहारांना इंटरनेट नावाच्या तंत्रज्ञानाचे कोंदण लाभले. मात्र, तंत्रज्ञानाच्या या सुविधेचा फायदा कसा करून घेता येईल याची चाचपणी करत अनेक दुष्प्रवृत्तींचा यामध्ये शिरकाव झाला. याचे दृश्य परिणाम आपल्याला पॉर्न साइट असतील किंवा मग सायबर तंत्राच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक असेल, या माध्यमातून दिसू लागले. आता मात्र सायबर विश्वातल्या माफियांनी या इंटरनेटच्या माध्यमातून त्याच्याच पोटात एक समांतर इंटरनेट विश्व उभे केले आहे. त्याचे नाव आहे डार्क वेब. अंडरवर्ल्डच्या कारवायांप्रमाणेच या डार्क वेबच्या माध्यमातून अनेक काळी कृत्य सुरू असल्याचे दिसून आले आहे. आजवर आंतरराष्ट्रीय पातळीवर डार्क वेबच्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार सुरू होते. पण गेल्या काही दिवसांत आपल्या घराच्या गल्लीपर्यंत डार्क वेब पोहोचले असून, या माध्यमातून अमलीपदार्थांच्या विक्रीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. म्हणूनच डार्क वेब हा आता नव्या डोकेदुखीचा विषय झाला आहे.

डार्क वेब म्हणजे काय?आपण जे नियमित इंटरनेट वापरतो त्याला तंत्रज्ञानाच्या भाषेत ओपन वेब म्हणजेच सर्वांसाठी खुले असे म्हटले जाते. मोबाइल किंवा कॉम्प्युटर ज्या माध्यमातून इंटरनेटची सुविधा मिळते, त्या माध्यमातून त्याचा वापर अगदी सहज करता येतो. डार्क वेब मात्र असे नाही. ते विशिष्ट प्रकारे कोडिंग केलेल्या सॉफ्टवेअरच्याच माध्यमातून वापरता येते. सामान्य लोकांना याची कोणताही माहिती कधीच मिळू शकत नाही. इंटरनेटच्या उदरात राहून डार्क वेब त्याच्या कारवाया करत राहते. मात्र, त्याचा माग काढणे अशक्य असते. उदाहरणाने सांगायचे तर, आपण कोणत्याही उपकरणाच्या माध्यमातून इंटरनेट वापरले, की संबंधित उपकरण त्याचा आयपी अॅड्रेस सेव्ह करते. त्यामुळे उद्या जर काही गैरप्रकार झाला तर त्याचा माग काढणे शक्य होते. मात्र, डार्क वेब वापरणाऱ्या व्यक्तीचा आयपी अॅड्रेस जगातील कोणत्याही उपकरणावर सेव्ह होत नाही तसेच त्यांचा माग काढणेही शक्य होत नाही.

जोखीम काय आहे?डार्क वेबची कार्यपद्धती सोपी आहे. मुळात ते जेथून वापरले जाते, ते उपकरण उघडकीस येत नाही. मात्र, त्याकरिता आयपी अॅड्रेस तर लागतो; पण तोही समजत नाही. ओपन वेब व्यवस्थेमध्ये ज्या वेबसाइटवरून पॉर्न दिसते किंवा ऑनलाइन गेमिंग किंवा सट्टा खेळला जातो किंवा कोणत्याही असुरक्षित वेबसाइटला डार्क वेबचे लोक लक्ष्य करतात. ज्यावेळी एखादी व्यक्ती पॉर्न पाहते किंवा अशा काही वेबसाइटवर जाते, तेव्हा अनेक परवानग्या देऊन त्या वेबसाइटवर प्रवेश मिळवते. उपकरणाच्या माध्यमातून ज्याने खरोखर वापर केला आहे, तो मात्र अलगद निसटतो.

'ते' कसे काम करते?द ओनियन राउटर नावाचे एक सॉफ्टवेअर डार्क वेबसाठी प्रसिद्ध आहे. या माध्यमातून जगभरातून कोट्यवधी लोक आपले व्यवहार करतात. तिथेच त्यांच्या वेबसाइट असतात व त्या वेबसाइटच्या माध्यमातून ते व्यवहार करत असतात. या वेबसाइट शोधून काढणे, त्यांचे मूळ शोधणे हे तपास यंत्रणांसाठी अत्यंत जिकिरीचे काम असते. जोपर्यंत तुम्ही एखाद्या विशिष्ट वर्तुळात प्रवेश करत नाही तोवर तुम्हाला डार्क वेबमध्ये प्रवेश मिळत नाही. एकदा प्रवेश मिळाला की दृष्टिआडच्या सृष्टीचा सारा परीध तुम्हाला अनुभवता येतो.

..म्हणून गुन्हेगार 'हे' वेब वापरतातया वेबसाइटचा किंवा यावरील व्यवहारांचा माग काढणे जवळपास अशक्य असल्यामुळे गुन्हेगार याचा सर्रास वापर करताना दिसत आहेत. अमली पदार्थांची विक्री हा त्यातील एक मोठा घटक आहे. गेल्या चार महिन्यांत मुंबईत विविध तपास यंत्रणांनी जी अमली पदार्थांची तस्करी पकडली. त्यामधील किमान दहा प्रकरणांत अमलीपदार्थाचे व्यवहार हे डार्क वेबच्या माध्यमातून झाल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Internetइंटरनेटtechnologyतंत्रज्ञान