शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

हिजाबविरोधी आंदोलनाची धग विश्वचषकाच्या मैदानापर्यंत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 09:44 IST

आपल्या देशातील महिलांच्या हिजाबविरोधी आंदोलनाला बळ देताना विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत इराणच्या खेळाडूंनी आपल्याच देशाचे राष्ट्रगीत गायला नकार दिला. 

किशोर बागडे, उपमुख्य उपसंपादक, लोकमत, नागपूर -

मागील काही दिवसांपासून इराणमध्ये हिजाबविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे वारे कतारमध्ये सुरू झालेल्या फुटबॉल विश्वचषकापर्यंत पोहोचले. सोमवारी इराणचा इंग्लंडविरुद्ध सामना झाला; पण इराणच्या खेळाडूंनी मैदानावर उतरल्यानंतर आपल्या देशाचे राष्ट्रगीत गायले नाही. इराणचं राष्ट्रगीत संपेपर्यंत सर्व खेळाडू भावहीन चेहऱ्याने मैदानावर उभे होते. या माध्यमातून त्यांनी हिजाबवरून सुरू असलेल्या वादावर न बोलताच बरेच भाष्य केले. फुटबॉलपटूंच्या या कृत्यामुळे जगभरात इराणविरोधी निदर्शनांची आग आणखी भडकण्याची शक्यता आहे. ही निदर्शने चिरडून टाकण्यासाठी इराणचे इस्लामिक सरकारही मोठ्या प्रमाणात दडपशाहीचा वापर करेल, अशी भीती व्यक्त होत आहे. या घटनेची पार्श्वभूमी अशी की, कुर्द वंशाची २२ वर्षीय तरुणी अमिनी हिजाब परिधान करून रस्त्याने जात होती; पण तिने इराणच्या इस्लामिक नियमांनुसार हिजाब परिधान केला नव्हता, या आरोपावरून इराण पोलिसांनी अमिनीला अटक केली. तुरुंगात डांबून तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान, तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाला. या घटनेचे जगभर पडसाद उमटले आणि हिजाबविरोधी आंदोलनाला सुरुवात झाली. या अभूतपूर्व संघर्षात आबालवृद्ध महिला आणि विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पुरुष खेळाडूसुद्धा सामील झाले. इराणच्या खेळाडूंनी न डगमगता या संघर्षातल्या स्त्रियांना जो पाठिंबा दिला, त्याचे सर्वत्र स्वागत होताना दिसतेय. अर्थात देशाच्या राष्ट्रगीताचा सन्मान न राखल्याबद्दल त्यांच्यावर काही जणांकडून टीकाही होतेय. इराणमधील हिजाबविरोधी संघर्षाला कोणी नेता नाही. चळवळीच्या केंद्रस्थानी स्त्रिया आहेत. न घाबरता हिजाबची त्या होळी करत आहेत, केस कापून आगीत टाकत आहेत. मुस्लीमबहुल देशात स्त्रिया पुढे आणि पुरुष त्यांच्यामागे उभे आहेत, हे चित्र नवी उमेद निर्माण करणारी आहे.काही दिवसांपूर्वी इराणचे बास्केटबॉलपटू आणि जलतरणपटूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अशीच भूमिका घेतली होती. आंतरराष्ट्रीय मंचावरून आपल्याच देशाच्या सरकारला विरोध केल्यामुळे खेळाडूंवर कठोर कारवाई होऊ शकते. या खेळाडूंविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले आहे. त्यांना एकतर तुरुंगाची हवा खावी लागेल किंवा सरकार त्यांना नजरकैदेत ठेवेल.इराणमधील हिजाबबंदीचे लोण भारतातही पोहोचले आहे. दोन आठवड्यांआधी केरळमधील कोझिकोडमध्ये हिजाबची जाळपोळ करीत महिलांनी तीव्र आंदोलन केले. धार्मिक दंडुकेशाही सुरू झाली की, एक ना एक दिवस जनता त्याविरोधात बंड करून लोकशाही स्वातंत्र्याची मागणी करते, याची ही घटना साक्ष देते. मात्र, यामुळे राष्ट्राध्यक्ष रईसी यांचे लगेचच मतपरिवर्तन होण्याची शक्यता नाहीच. मूलतत्त्ववादाचे वारे डोक्यात शिरले की, माथी उलट्या दिशेनेच प्रवास करू लागतात. एकेकाळी महिलांना स्वातंत्र्य देणाऱ्या राष्ट्राचा हा अधोगतीचाच प्रवास आहे. मात्र, इंग्लंडविरोधातील सलामीचा सामना इराणने गमावला असला तरी लोकशाही मूल्यांवर श्रद्धा असलेल्या आणि महिलांच्या स्वातंत्र्यासाठी आग्रही असलेल्या कोट्यवधी जनतेची मने या धाडसी खेळाडूंनी जिंकली, यात शंका नाही.जाता जाता...विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या अर्जेंटिनाला आशियाई संघ सौदी अरेबियाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. या निकालानंतर अर्जेंटिनाला फारशा संधी नाहीत. सौदी अरेबियाने त्यांच्या फुटबॉल इतिहासातील सर्वांत मोठा विजय साकारला. या एका विजयासाठी सौदी अरेबियाच्या राजाने बुधवारी संपूर्ण देशभरामध्ये सुट्टी जाहीर केली होती.

टॅग्स :IranइराणMuslimमुस्लीमFootballफुटबॉल