शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

पडसलगीकर, मुंबईकरांकडून मनापासून धन्यवाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 06:41 IST

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी एका उत्तम अधिकाऱ्याच्या जागी तेवढ्याच योग्यतेचा दुसरा अधिकारी नेमल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौतुकास पात्र आहेत. देशाचे अग्रगण्य महानगर असलेल्या मुंबईतील नागरिकांना सुरक्षिततेची कितपत खात्री वाटते, यावर मुख्यमंत्र्यांची व त्यांच्या सरकारचीही प्रतिष्ठा अवलंबून असते.

- ज्युलिओ रिबेरो(माजी पोलीस महासंचालक)राज्याच्या पोलीस महासंचालकपदी एका उत्तम अधिकाऱ्याच्या जागी तेवढ्याच योग्यतेचा दुसरा अधिकारी नेमल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौतुकास पात्र आहेत. देशाचे अग्रगण्य महानगर असलेल्या मुंबईतील नागरिकांना सुरक्षिततेची कितपत खात्री वाटते, यावर मुख्यमंत्र्यांची व त्यांच्या सरकारचीही प्रतिष्ठा अवलंबून असते. या पदासाठी दोन इच्छुक स्पर्धक अधिकाºयांमध्ये स्पर्धा सुरू असल्याच्या अफवांचे गेले सहा महिने पीक आले होते. मुळातच नेमणुकीसाठी अयोग्य अशा या दोन स्पर्धकांनी आणलेल्या दडपणाला फडणवीस यांनी जुमानले नाही, हे उत्तम.प्रबोध जयस्वाल ‘रॉ’ या देशाच्या परकीय गुप्तहेर संस्थेत महत्त्वाच्या पदावर होते. त्यांना तेथून मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नेमण्याचा निर्णयही हुशारीचा आहे. या नेमणुकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी नक्कीच भूमिका बजावली असणार, असा माझा कयास आहे.पण सर्वप्रथम मला मुंबईचे मावळते पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांचे ‘हॅट््स आॅफ’ करून अभिनंदन करावेसे वाटते. मुंबई पोलीस दलाची धुरा त्यांनी दोन वर्षे समर्थपणे सांभाळली. कोणत्याही पोलीस दलात ९० टक्क्यांहून अधिक असलेल्या शिपाईवर्गाच्या कल्याणाची मनापासूनची तळमळ ही पडसलगीकर यांच्या या कारकिर्दीचे ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. पोलीस शिपायांचा वर्ग सुखी-समाधानी असेल तरच त्यांच्याकडून जनतेला उत्तम सेवा दिली जाऊ शकते.दत्ता पडसलगीकर यांनी त्यांच्या स्वीय पोलीस ड्रायव्हरच्या लहानग्या मुलीचा वाढदिवस लक्षात ठेवून त्यांच्या घरी जाऊन तिचे अभिष्टचिंतन करून पोलीस दलातील माणुसकीचा वस्तुपाठ घालून दिला. अशा प्रकारची मनाची दिलदारी दाखविणे फारच थोड्या पोलीस आयुक्तांना सुचले असते. आयुक्तपदाची सूत्रे सोडण्याच्या काही वेळ आधी त्यांनी एका पोलीस निरीक्षकाच्या घरी जाऊन त्याने केलेल्या उत्तम कामाचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली, हेही त्यांच्या वर्दीमागे दडलेल्या माणुसकीचेच द्योतक होते.दत्ता पडसलगीकर यांनी सामान्य पोलीस शिपायांच्या कल्याणासाठी केलेले सर्वात मोठे काम कोणते असेल तर त्यांच्यासाठी आठ तासांची शिफ्ट सुरु करण्याचे. हा प्रयोग त्यांनी आधी काही निवडक पोलीस ठाण्यांमध्ये करून पाहिला व नंतर महानगरातील सर्व ९० हून जास्त पोलीस ठाण्यात लागू केला. हा निर्णय पोलीस शिपायांचे मनोधैर्य वाढविणारा होता. त्यांच्या आधीही काही पोलीस आयुक्तांनी हे करण्याचे मनात आणले, पण प्रत्यक्ष करण्याचे धाडस कुणी दाखविले नाही. आठ तासांची शिफ्ट प्रत्यक्षात कशी लागू केली जाऊ शकते, याचा मूळ आराखडा एका पोलीस शिपायाने सुचविला होता. पडसलगीकर यांनी ही योजना यशस्वी झाल्यावर त्याचे श्रेय त्या पोलीस शिपायाला देऊन प्रामाणिकपणा व लीनता दाखविली.खरे तर पडसलगीकर यांच्या हाताखालच्या अनेकांनी उत्तम कामगिरी पार पाडली ती त्यांनी नेता म्हणून दिलेल्या प्रोत्साहनामुळे. पण पडसलगीकर त्या चांगल्या कामाचे श्रेय कधीच स्वत: न घेता ज्याचे त्याला देत राहिले. मराठा आरक्षणावरून निर्माण झालेली परिस्थिती पडसलगीकर यांनी एवढ्या खुबीने हाताळली की त्यामुळे होऊ घातलेला एक संभाव्य हिंसक संघर्ष टळला. हे त्यांनी पडद्यामागे केलेल्या चर्चा-वाटाघाटींमुळेच शक्य झाले. पडसलगीकर पूर्वी ‘इंटेलिजन्स ब्युरो’मध्ये (आयबी) होते व तेथील अनुभवाचा त्यांना यासाठी खूप उपयोग झाला हे अनेकांना माहीत नसेल. त्यांची रोखठोक कार्यशैली व जनतेच्या मनात त्यांच्याविषयी असलेली विश्वासार्हता यामुळेच हे शक्य झाले.हाताखालच्या अधिकाºयांच्या बदल्या व नेमणुका हे कोणत्याही पोलीस आयुक्ताला हाताळावे लागणारे मोठ्या कटकटीचे व नाजूक काम असते. दत्ता पडसलगीकर यांनी हे काम स्वत: हाताळले. त्यांनी हे काम अगदी खुल्या पद्धतीने केले. शिवाय त्यांच्याविषयी पूर्वग्रह किंवा वशिलेबाजीचा आरोप कुणीही करू शकत नसल्याने त्यांनी हे काम प्रत्येक जण समाधानी होईल, असे केले. वर्षअखेरीस पोलीस शिपायांच्या होणाºया नियमित बदल्या करताना त्यांना घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी कमीतकमी प्रवास आणि वेळ लागेल याची खात्री त्यांनी केली. त्यामुळे पोलीस शिपायांमध्ये आयुक्तसाहेब अगदी लाडके झाले.दत्ता पडसलगीकर दृढ निर्धाराने काम करीत. त्यांची बांधिलकी प्रामाणिकपणाशी असायची. पण वागण्या-बोलण्यात बडेजाव वा आढ्यता कधीही नसायची. राजकारण्यांकडून, अगदी वरच्या पातळीवरूनही केल्या जाणाºया विनंत्या हाताळतानाही त्यांनी सर्वसामान्यांचे कल्याण कशात आहे याचाच विचार केला आणि त्यात ते यशस्वीही झाले. पडसलगीकर मुंबईचे पोलीस आयुक्त नसले तरी त्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.सुदैवाने पडसलगीकर यांच्या जागी आलेल्या प्रबोध जयस्वाल यांच्यातही पडसलगीकर यांच्यासारखेच अनेक सदगुण आहेत. ज्यांच्यासाठी काम करायचे त्या जनतेचे समाधान व्हायला हवे असेल तर आणि पोलीस शिपायांना समाधानी ठेवायला हवे, हे सूत्र पडसलगीकर यांनी अनुसरले.जयस्वाल यांनीही काम करताना त्याचा जरूर उपयोग करावा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार पडसलगीकर यांना पोलीस महासंचालकपदी पूर्ण दोन वर्षे राहू दिले तर त्याने राज्याचे व सरकारचेही भलेच होईल. याचे कारण साधे, सरळ आहे. ते हे की पोलीस दल समाधानी व शिस्तबद्ध असणे ही यशाची हमखास गुरुकिल्ली आहे हे जाणून त्याप्रमाणे काम करणारे ते उत्तम अधिकारी आहेत.

टॅग्स :Policeपोलिस