शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

टीमनं सेन्चुरी मारली. . पण संजयभाऊंची विकेट पडली !

By सचिन जवळकोटे | Updated: March 5, 2021 14:13 IST

व्हाॅटसअप...संपादकीय लेख...

सचिन जवळकोटे

द्वेष, मत्सर, अन् सुडाग्नीचा उद्रेक झाला ना सध्याच्या राजकारणात.. तेव्हा नेत्यांमध्ये खेळीमेळीचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून नारदांनी क्रिकेट मॅचचं आयोजन केलं.

इंद्र दरबारात अप्सरांच्या नृत्याविष्काराचा दिलखेचक नजराणा सादर केला जात होता. एवढ्यात बाहेरचा कलकलाट कानी पडू लागला. दरबार डिस्टर्ब झाला. इंद्र महाराजांनी नारदांना विचारलं, तेव्हा वीणा झंकारत मुनींनी सांगितलं, ‘भूतलावर अधिवेशन सुरू झालंय. त्याचाच हा गोंधळ. गेल्या दीड-दोन वर्षांपासून खदखदणाऱ्या द्वेष, मत्सर, असूया, कपट अन् सुडाग्नीचा उद्रेक झालाय नां आता. त्याचाच हा परिपाक.’

‘कॉमन पब्लिक अगोदरच लॉकडाऊन अन‌् महागाईनं होरपळतंय. अशावेळी एकत्र येऊन जनतेला धीर देण्याऐवजी कसल्या घाणेरड्या राजकारणात गुंतलेत हे सारे नेते ? ? ????? ’ इंद्राचा संताप पाहून मुनींनी तत्काळ भूतलाकडे प्रस्थान केलं.

सर्व नेत्यांमध्ये खेळकर वातावरण निर्माण व्हावं म्हणून मुनींनी क्रिकेट मॅचचं आयोजन केलं. नाव ठेवलं एमपीएल, अर्थात महाराष्ट्र पॉलिटिकल लीग. पंच म्हणून वडीलधारे ‘थोरले काका बारामतीकर’ यांच्याकडे जबाबदारी सोपविली. पहिली मॅच ‘मुंबईकर’ विरुद्ध ‘नागपूरकर’ यांच्यात ठरली.

‘देवेंद्र पंतां’नी टॉस जिंकला, मात्र ‘उद्धो’ म्हणाले, ‘अगोदर आमची बॅटिंग.’ हे ऐकून ‘चंदूदादा कोथरूडकर’ चरफडले, ‘हे तर शुद्ध चिटिंग.’ बॅट आपटत ‘उद्धो’ पीचकडं निघाले. तेव्हा ‘आदित्य’ हळूच पुटपुटले, ‘ज्याची बॅट, त्याचीच बॅटिंग. लहानपणी आम्ही दादरमध्ये असंच खेळायचो.’ ..विशेष म्हणजे ‘थोरल्या काकां’नीही बॅटिंगला मूकपणे सपोर्ट केला. पंतांची टीम हतबल झाली. मात्र, ‘काकां’समोर आदळआपट करण्याची हिम्मत नव्हती. कारण, ‘काका’ भरपावसातही तुफान बॅटिंग करण्यात माहीर होते.

मॅच सुरू झाली. ‘उद्धो’ अन् ‘अजित दादा’ ओपनिंगला गेले. रनर म्हणून न बोलविताही ‘संजयराव’ तयार होतेच. ‘मुंबई बँके’च्या लॉकरमध्ये जपून ठेवलेला बॉल फिरवत ‘दरेकर’ बॉलिंग करू लागले. मात्र, गठ्ठ्यांचा ओलावा लागल्यानं बॉल भलतीकडेच वळत होता. ‘उद्धो’ टुकूटुकू खेळण्यावर अधिक भर देत होते. धावा काढण्यापेक्षा पीचवर शेवटपर्यंत टिकून राहणं, त्यांच्यासाठी म्हणे महत्त्वाचं होतं. तेव्हा अस्वस्थ झालेल्या ‘दादां’नी संधी मिळेल तसे चौकार-षटकार लगावले. हे पाहून ‘उद्बों’ना वाटू लागलं की ‘दादा’च मॅच मारून जाणार.

दोघांनी धावसंख्या चांगली केली. दादा सेन्चुरी करणार, एवढ्यात ‘थोरल्या काकां’नी हळूच ‘जयंतराव-छगनराव’ यांना खुणावलं. सेकंड फळी मैदानावर बोलावली. आतल्या आत धुमसत ‘दादा’ परतले. ‘सीएम’ खुर्चीच्या वेळीही म्हणे असंच घडलेलं.

तिकडं बॉलिंग करून ‘मुनगंटीवार-सोमय्या’ जोडीही थकली होती. ‘नारायण कोकणकर’ फिरकी चांगली टाकायचे; मात्र नेहमीप्रमाणे सिंधुदुर्गातून विमान न उडाल्यानं ते ‘कणकवली’तच अडकून पडलेले. अखेर ‘देवेंद्र पंतां’नी बॉल स्वतःकडे घेतला. ‘धनुभाऊ परळीकर’ अन‌् ‘संजयभाऊ यवतमाळकर’ बॅटिंगला होते. हे दोघेही धडाडीचे फलंदाज, मात्र दोघांचेही ‘वीकपॉइंट’ समोरच्या टीमनं अचूक ओळखलेले. एका चेंडूवर ‘धनुभाऊं’नी बॅट फिरविताच ‘चंदूदादां’नी जमिनीवर झेपावत कॅच घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘काकां’नी स्पष्टपणे नॉट-आऊट दिलं.

आता बॅटिंग ‘संजयभाऊं’कडे येताच त्यांनीही चेंडू जोरात खेचून रन काढण्यासाठी धाव घेतली. मात्र, ‘काकां’नी खुणावल्यामुळे ‘धनुभाऊ’ जागचे हललेच नाहीत. ‘संजयभाऊ’ मध्यापर्यंत येऊन परत फिरले. मात्र, पंतां’नी त्यांना अलगद रन आऊट केलं. तिकडं स्टेडियममध्ये बसलेल्या ‘पंकजाताई’ मनातल्या मनात हळहळल्या. ‘धनुभाऊ’ आऊट झाले असते तर बरं झालं असतं, असं त्यांना वाटून गेलं. ‘संजयभाऊं’ची विकेट गेल्यानंतर ‘पंतां’ची टीम मैदानात आनंदानं नाचू लागली. ‘थोरले काका’ मात्र गालातल्या गालात मिस्कील हसले. कारण, संजय भाऊंना आऊट करण्याच्या नादात साऱ्यांचंच ‘धनुभाऊं’कडे दुर्लक्ष झालेलं नां.. नारायणऽऽ नारायणऽऽ                        

sachin.javalkote@lokmat.com

टॅग्स :SolapurसोलापूरSanjay Rathodसंजय राठोडchandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे