तनी अवतरम...
By Admin | Updated: October 13, 2016 16:30 IST2016-10-13T15:58:08+5:302016-10-13T16:30:06+5:30
माझ्या उघड्याबंब पोटावर रेललेला तो घट आणि त्यातून तालाचे अचूक बोल काढणारी माझी छोटी, कोवळी बोटे. उघड्या पोटावर ठेवलेल्या घटमला पोटाच्या स्नायूंकडून मिळणारा

तनी अवतरम...
- जगप्रसिद्ध घटम वादक विक्कू विनायकराम
- यांच्याबरोबर भन्नाट गप्पांचा एक कलंदर दिवस
माझ्या उघड्याबंब पोटावर रेललेला तो घट आणि त्यातून तालाचे अचूक बोल काढणारी माझी छोटी, कोवळी बोटे. उघड्या पोटावर ठेवलेल्या घटमला पोटाच्या स्नायूंकडून मिळणारा आधार आणि रेटा यांमुळे मंद्र सप्तकात वाजणारे बोल अधिक वजनदार वाजतात हे मी वाजवता-वाजवता शिकत होतो आणि उघड्या अंगाने रंगमंचावर, न बिचकता जाणेही..! पण तेवढ्यात आयुष्यात एम.एस. सुब्बलक्ष्मी नावाचे एक सात्त्विक पर्व आले. माझ्या घटमला स्वतंत्र ओळख देऊन थेट संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक व्यासपीठावर नेणारे...!
जेमतेम २३-२४ वर्षांचा होतो तेव्हा! आजवर कधी मुंडू सोडून दुसरे वस्त्र अंगावर चढवले नव्हते. आता अमेरिकेला जायचे म्हणजे विमान प्रवास आला, सूटा-बुटाची साहेबी कडक इस्त्री आली. चुडीदार, झब्बा त्यावर वेस्टकोट असे सुब्बलक्ष्मीनी शिवून घेतलेले कपडे घालून आरशासमोर उभा राहिलो आणि.... आणि स्वत:वरच जाम खूश झालो. भस्म लावलेल्या आणि उघड्याबंब अंगाने पोटावर घटम घेऊन बसणाऱ्या विनायकपेक्षा तरतरीत दिसणाऱ्या या माणसाला राधाने, सुब्बलक्ष्मीच्या मुलीने स्मार्ट नाव दिले, विक्कू...!
... पुढे या घटमने मला जगभरात नेले. मग पुन्हा अंगावर मुंडू आणि कपाळावर भस्माचे पट्टे आले. फरक एवढाच होता की मद्रासमध्ये उघड्या अंगाने बसताना तपमान ३० डिग्री असायचे आणि इथे अनेकदा सामना करावा लागायचा तो पाच किंवा सहा डिग्री तपमानाशी...! स्टेजवर उघड्या अंगाने बसलेल्या मला बघून श्रोते गारठून जायचे पण माझी घटमवरची बोटे कधीच गारठली नाहीत... कशामुळे झाले असावे हे?