शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जरा झूल उतरवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:40 IST

मिलिंद कुलकर्णी संकटकाळात धावून येतो, मदत करतो तो आयुष्यभरासाठी लक्षात राहतो, असे म्हणतात. या सुविचाराचा प्रत्यय ह्यकोरोनाह्णच्या निमित्ताने सगळ्यांना ...

मिलिंद कुलकर्णीसंकटकाळात धावून येतो, मदत करतो तो आयुष्यभरासाठी लक्षात राहतो, असे म्हणतात. या सुविचाराचा प्रत्यय ह्यकोरोनाह्णच्या निमित्ताने सगळ्यांना येत आहे. नातलग, जिवाभावाचे मित्र, विचार-वाद यामुळे घनिष्ट संबंध तयार झालेले नेते-कार्यकर्ते हे ह्यशारीरिक अंतराह्णच्या नियमामुळे दुरावले आहेत. प्रगत तंत्रज्ञानामुळे किमान दर्शन व ध्वनीद्वारे निकटता येत आहे, तेवढाच दिलासा आहे.कोरोना पूर्व आणि कोरोना पश्चात अशी नवीन संस्कृती आता जगभर अस्तित्वात येणार आहे. कोरोना पश्चात संस्कृतीचे नीती-नियम अद्याप ठरायचे असले तरी त्याविषयी संकेत जाणवू लागले आहे. कोरोना पूर्व काळात भारतीय संस्कृती ही आतिथ्यशील मानली जात होती. आता काय आहे, नातलग जरी असला तरी तो येऊ नये, अशी मनोमन इच्छा असते. परदेश, परराज्यातील नातलग, मित्र आला तरी प्रशासकीय यंत्रणा त्याला आधी क्वारंटाईन करते. नंदुरबार जिल्ह्यातील श्रमिक मंडळी गुजराथमधून परत आली, मात्र त्यांना गावात घेण्यापूर्वी गावाबाहेर, शेतात १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले. भेद याठिकाणीही आहे. श्रीमंतांसाठी विलगीकरण कक्ष आहेत, गरिबांसाठी माळरान आहे. नवीन संस्कृती उदयाला येत असली तरी भेदाभेदसारखे दुर्गुण मात्र कायम राहिले आहेत.ह्यकोरोनाह्णच्या संकटात माणुसकी शिल्लक आहे की नाही, असा प्रश्न पडत असताना उत्तर प्रदेशातील महिलेची प्रसुती करण्यासाठी कवी कासार हा राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता पुढे येतो आणि कन्यारत्न जन्माला येते. संघाचे पदाधिकारी डॉ.विलास भोळे सहाय्यभूत ठरतात. त्याच जळगावात ५० दिवसांच्या लॉकडाऊनने वडील आणि भावाचा रोजगार बुडाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेल्या तरुणीने गळफास घेऊन जीवन संपविले. शासकीय विभाग, सामाजिक संघटनांनी अन्नछत्र उघडूनदेखील भूकबळी कसे होतात? कुठेतरी समन्वय कमी पडतोय काय, असे या घटनेतून जाणवले.नंदुरबार- धुळ्यात स्थलांतरित कामगारांसाठी मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे या आदिवासी समाजासाठी झटणाऱ्या नेत्या प्रयत्नशील आहेत. गुजराथ व मध्य प्रदेशातून आदिवासी बांधव यावेत, यासाठी शिंदे यांनी मंत्री व प्रशासनाकडे पाठपुरावा केला. स्थलांतरितांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाटकर यांनी मध्य प्रदेशात ४८ तासांचे उपोषण केले. गेल्या दोन दिवसांपासून धुळ्यात थांबून त्या उपाययोजनांवर चर्चा करीत आहे. परप्रांतीय कामगारांना राज्य सरकार केवळ त्या राज्याच्या सीमेवर सोडत असताना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवा, अशी त्यांची मागणी आहे. समाजाविषयीची कळकळ, तळमळ यातून दिसून येते.या पार्श्वभूमीवर अधिकार, पदांची झूल पांघरलेल्या मंडळींच्या अस्तित्वाची खरी कसोटी आहे. वर्षभरापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात संपूर्ण समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, अध्यात्म, वैचारिक आणि मतदानाच्या आदल्या रात्री आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने झटणाºया भावी लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या समर्थकांची कळकळ किती फोल होती, हे कोरोनाच्या संकटकाळात दिसून येते. समाजमाध्यमांवर सक्रीय असलेली ही मंडळी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी मात्र अदृश्य आहे. एका कार्यकर्त्याला सहज विचारले, बाबा रे आता तुझी समाजकार्याची उर्मी कशी जागृत होत नाही. तेव्हा तो विनयशील स्वरात म्हणाला, आम्ही ठरवलेय, आमचे नेते जोवर घरातून बाहेर पडत नाही, तोवर आम्ही पण पडणार नाही.समाजाच्या कल्याणाची कळकळ वर्षभरापूर्वी वाटणाºया या मंडळींनी सरड्यासारखा रंग बदललेला दिसला. लोकांना केवळ धीर, आधार हवा आहे. संकट कोसळल्यावर ह्यलढ म्हणाह्ण असा आपुलकीचा शब्द हवा आहे. पण त्यापासून लोक वंचित आहे.प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी, परिचारिका हे सध्याचे खरे हिरो आहेत. हजाराहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाधा झाली आहे. प्रशासकीय अधिकारी, डॉक्टरदेखील कोरोनापासून बचावलेले नाही. पण धीरोदात्तपणे ते संकटाशी मुकाबला करीत आहेत. वाद असतील, नियोजनातील गोंधळ असेल, साधनसामुग्रीची कमतरता असेल, निधीचा ठणठणाट असेल पण इच्छाशक्ती दांडगी आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी समाजाने स्वयंशिस्त, संयम पाळायला हवा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव