शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्पची धमकी गंभीरपणे घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 03:44 IST

ट्रम्प हे वृत्तीनेच आडमुठे गृहस्थ आहेत. त्यांच्याशी गोड बोलता येते पण त्यांच्याकडून हवे ते काढून घेता येत नाही.

ट्रम्प हे वृत्तीनेच आडमुठे गृहस्थ आहेत. त्यांच्याशी गोड बोलता येते पण त्यांच्याकडून हवे ते काढून घेता येत नाही. अध्यक्षपदावर येण्याआधी ते बांधकाम क्षेत्रात नाव मिळविलेले व्यापारी आहेत आणि ही बाब त्यांची मानसिकता स्पष्ट करणारी आहे.अमेरिकी मालावरील आयात शुल्क कमी करण्याची अध्यक्ष ट्रम्प यांची मागणी भारताने अजूनही त्यांच्या समाधानाएवढी पूर्ण केली नाही. परिणामी त्याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील, असा इशाराच त्या देशाने पुन्हा एकवार भारताला दिला आहे. रशिया दूर गेला आहे, चीनसोबतचे संबंध तणावाचे तर पाकिस्तानबरोबरचे वैराचे आहेत. फ्रान्सशी असलेला व्यापार संबंध राफेल विमानातील घोटाळ्यांमुळे आधीच संशयास्पद बनला आहे. जपान व ऑस्ट्रेलियाची अशा मदतीची ताकद मर्यादित आहे. इंग्लंड हा देश स्वत:च ब्रेक्झिटच्या कोंडीत अडकला आहे आणि जर्मनीच्या मर्केल अमेरिकेशी असलेले आपले आर्थिक संबंध आणखी बिघडवू न देण्याच्या विवंचनेत आहेत. भारताचा एकही शेजारी देश त्याच्या अडचणी पूर्ण करू शकणारा नाही. त्यामुळे ट्रम्प यांना राजी राखणे ही आपली आर्थिक गरज आहे.

ट्रम्प हे वृत्तीनेच आडमुठे व कुणाचेही ऐकून न घेणारे गृहस्थ आहेत. त्यांना मिठ्या मारता येतात, त्यांच्याशी गोड बोलता येते पण त्यांच्याकडून हवे ते काढून घेता येत नाही. अध्यक्षपदावर येण्याआधी ते बांधकाम क्षेत्रात साऱ्या जगात नाव मिळविलेले व्यापारी आहेत आणि ही बाब त्यांची मानसिकता स्पष्ट करणारी आहे. अमेरिकेत तयार होणारी एक प्रख्यात मोटारसायकल भारतात येते तेव्हा तिच्यावर शंभर टक्क्यांएवढे आयात शुल्क पूर्वी लावले जायचे. त्यामुळे ती भारतीयांना दुप्पट भावाने विकत घ्यावी लागायची आणि अमेरिकेचा व्यापार घटून भारताच्या तिजोरीत मोठी भर पडायची. ही विषमता नाहीशी करण्याचा इशारा अमेरिकेने प्रथम दिला तेव्हा भारताने ते शुल्क ५० टक्क्यांवर आणले, पण अमेरिकेला तेही मान्य नाही. आम्ही तुमच्या मालावर आयात शुल्क लावत नाही म्हणून तुम्हीही ते लावायला नको, असे तिचे म्हणणे आहे व ते करणार नसाल तर आम्हालाही आवश्यक ती कारवाई करावी लागेल, असे ट्रम्प यांचे सांगणे आहे. अशा धमक्या ते चीनलाही देत आले आहेत. म्हणून ट्रम्प यांच्या इशाऱ्याकडे एक साधी बाब म्हणून पाहिले जाऊ नये. तो गंभीरपणेच घेतला पाहिजे.

भारत लष्करी साहित्यासह औद्योगिक क्षेत्रासाठी व अन्य गरजांसाठी अमेरिकेवर अवलंबून आहे. अमेरिकेने जशास तसे म्हणून आपल्याही मालावर बरोबरीचे आयात शुल्क लावले तर आपला आंतरराष्ट्रीय व्यापार कोलमडल्यागत होईल व भारतातही अनेक वस्तूंची चणचण निर्माण होईल. त्यामुळे हे ट्रम्प प्रकरण केवळ बैठकांनी आणि चर्चांनी निकालात काढता येणारे नाही. स्वदेशाच्या कायदेमंडळाचा विरोध पत्करून ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधायला घेतली आहे. त्या बांधकामाला पैसा द्यायला विधिमंडळाने नकार दिला तेव्हा ट्रम्प यांनी सरकारलाच दहा दिवसांची सुटी देऊन साऱ्यांना अडचणीत आणले.
जो नेता स्वदेशी नागरिकांबाबत असे करू शकतो तो विदेशी नागरिकांची कितीशी पर्वा करील. त्यामुळे अमेरिकेशी होत असलेल्या एकूणच आयात-निर्यात व्यापारासंबंधी व्यापक चर्चा करून त्यातून कायमचा व सोयीचा मार्ग काढणे गरजेचे आहे. हे काम निर्मला सीतारामन यांचे नाही. कारण त्या ते करू शकणार नाहीत. त्यासाठी मोदी यांना अर्थतज्ज्ञ व त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींनाच सोबतीला घ्यावे लागेल. कारण साऱ्या युरोपातील राजकीय तज्ज्ञ व तेथील सरकारे यांचे एकमत धुडकावून ट्रम्प त्यांचे एकसूत्री ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण राबवीत आहेत. तसे करताना त्यांनी विदेशी लोकांएवढेच स्वदेशातील विपक्षांना व स्वपक्षातील अनेकांना पार बाजूला सारले आहे.ट्रम्प यांना काढून टाकण्यासाठी त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालविण्याचा विचार मध्यंतरी अमेरिकेत जोर धरीत होता. परंतु त्या देशातील कर्मठ व पुराणमतवादी लोकांनी तो हाणून पाडला. आता त्याविषयी कुणी बोलत नाहीत आणि स्वत: ट्रम्प यांनीच त्यांच्या पुढच्या निवडणुकीची घोषणाही आता केली आहे. डेमोक्रेटिक पक्ष उमेदवाराच्या शोधात आहे आणि रिपब्लिकनांना ट्रम्पखेरीज पर्याय नाही. त्यामुळे येती चार-पाच वर्षे भारताला ट्रम्पसोबतच व्यवहार करावे लागणार आहेत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतchinaचीनrussiaरशिया