शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

सुरेश प्रभूंची ‘अपघात’काले ‘राजीनामा’य बुद्धी !!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 02:27 IST

- महेश चेमटेभारतीय वाहतूक व्यवस्थेतील जनसुसह्य वाहतूक व्यवस्था म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. देशातील सर्व रेल्वे सेवांचे पालकत्व रेल्वेमंत्र्यांकडे असते. यामुळेच केंद्रीय मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री हे प्रमुख जबाबदारीचे पद आहे. हे पद जबाबदारीसह जोखीमेचेही असल्याचे रेल्वे अपघातांवरुन दिसून येते. रेल्वे अपघातामुळे राजीमाना देणारे सुरेश प्रभू हे पहिलेच रेल्वे मंत्री नाही. या आधी देखील ...

- महेश चेमटेभारतीय वाहतूक व्यवस्थेतील जनसुसह्य वाहतूक व्यवस्था म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. देशातील सर्व रेल्वे सेवांचे पालकत्व रेल्वेमंत्र्यांकडे असते. यामुळेच केंद्रीय मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री हे प्रमुख जबाबदारीचे पद आहे. हे पद जबाबदारीसह जोखीमेचेही असल्याचे रेल्वे अपघातांवरुन दिसून येते. रेल्वे अपघातामुळे राजीमाना देणारे सुरेश प्रभू हे पहिलेच रेल्वे मंत्री नाही. या आधी देखील रेल्वेमंत्र्यांचा ‘अपघाता’ ने घात केला आहे. रेल्वेतील अपघातामुळे रेल्वेमंत्र्यांचे राजीनामा, अपघाताची कारणे आणि रेल्वेला पर्याय विमान प्रवास या बाबींवरील शब्द-प्रवास ‘अपघात’ काले ‘राजीनामाय’ बुद्धी यात मांडण्यात आला आहे.यंदा (२०१६-१७) रेल्वे अपघातात २३८ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे बोगी रुळावरुन घसरल्यामुळे सर्वाधिक १९३ जण मरणमार्गावर स्वार झाले. उपलब्ध आकडेवारीनूसार गत १७ वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. २०१५-१६ साली १२२ जणांचा मृत्यू झाला.यात बोगी घसरल्यामुळे ३६ जणांचा समावेश आहे. देशातील रेल्वे प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्यास सक्षम नाही. हे या आकडेवारीवरुन हे सत्य पुन्हा एकदा ठळक होत आहे.१ एप्रिल ते १५ आॅगस्ट २०१७ या कालावधीत रेल्वे मार्गावर एकणू २२ अपघात झाले आहेत. यात रेल्वे बोगी घसरल्याची १८ प्रकरणे आणि लेव्हल क्रॉसिंग अपघाताची ४ प्रकरणे यांचा समावेश आहे.रेल्वे अपघात आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत रेल्वे मंत्रालय गंभीर नसल्याचे आकडे बोलत आहे. राज्यसभेत सादर केलेल्या आकड्यांवरुन दिसून येतो. ११ आॅगस्टरोजी राज्यसभेत प्रश्न क्रमांक ३००७ याला उत्तर देताना २०१५-१६ मध्ये १०७ अपघातात १२२ जणांचा मृत्यू झाला. २०१६-१७ मध्ये १०४ रेल्वे अपघातात २३८ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी मांडण्यात आली. मात्र प्रश्न क्रमांक ३०२३ मध्ये २०१५-१६ या कालावधीत १०७ रेल्वे अपघातात ९७ आणि २०१६-१७ या कालावधीत १०४ रेल्वे अपघातात १८१ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी सादर करण्यात आली.अपघाताची कारणेअनेक दशके सेवा देणाºया रेल्वे रुळांच्या क्षमतेची झीज होत आहे. त्याचप्रमाणे रुळावर नियंत्रण करणारी सिग्नल यंत्रणादेखील दोषरहीत असल्याचे दिसून आले आहे. मानव रहीत रेल्वे क्रासिंग ही रेल्वे अपघाताची प्रमुख कारणे असल्याचे दिसून येते. प्रत्यके अपघातानंतर कनिष्ठ ते वरिष्ठ सर्व अधिकाºयांचे ‘स्टेस्टमेंट’ नोंदवले जाते. कारवाईचे संकेत देण्यात येतात. मात्र अपघाताचा दाह मिटण्याआधी संपूर्ण रेल्वे व्यवस्था पुन्हा कामावर रुजू होते.अपघातानंतर ठरलेल्या कारणांचा अहवाल पुढे सरकवण्यात येतो. यात सुरक्षा निधीची कमतरता, विशिष्ठ थांबा घेण्यासाठी यंत्रणेवर असलेला दबाव, देखरेखीचे काम करण्यासाठी अपुरे मनुष्यबळ आणि मावनी चुकां या कारणांचा यात समावेश होतो. एक्सप्रेसमधील लोको पायलट यांनी केलेल्या तक्रारींदेखील विचारात घेणे आवश्यक आहे.विश्रांती घेण्यासाठी पुरेसे आसन नसणे, योग्य वेळी लंच ब्रेक नसणे, ड्यूटी वेळात शौचालयाची सोय नसणे अशा लोको पायलटच्या प्रमुख तक्रारी आहे. नादुरुस्त सिग्नल यंत्रणा आणि हवामानाच्या परिस्थितीमुळे देखील चुकीच्या पद्धतीने रुळ बदलला गेल्यास बोगी रुळावरुन घसल्याचे दिसून येते.प्रभू राजीनाम्याचे तत्कालीन कारण-१० दिवसांत ३ अपघातआॅगस्ट महिना रेल्वेसाठी अपघाती महिना ठरला. २९ आॅगस्टला राज्यात आसनगाव येथे नागपुर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे डब्बे घसरले. तत्पुर्वी २३ आॅगस्टला उत्तर प्रदेश येथे कैफियत एक्सप्रेस घसरल्यामुळे ८१ प्रवासी जखमी झाले. १९ आॅगस्टला उत्तरप्रदेश मध्येच कालिंगा उत्कल एक्सप्रेस घसरल्याने २२ प्रवाशांचा मृत्यू होऊन २०० पेक्षा जास्त जखमी झाले. रेल्वेचे पालकत्व असलेल्या प्रभूंनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला.

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभू