शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

समजा, माणसाला अदृश्य होता आले, तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 09:51 IST

या कल्पनेच्या भुंग्याने शेकडो, हजारो वर्षांपासून माणसाचे डोके खाल्ले आहे. आपण कुणाला दिसतच नाही; याने माणसाला सुख मिळेल की दु:ख?

श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर

माणसाला खरेच अदृश्य होता येईल का? तसे घडले तर काय गमतीजमती घडतील, या कल्पनेचा भुंगा शेकडो, हजारो वर्षांपासून डोके खात आला आहे. प्राचीन दंतकथांपासून ते अलीकडच्या वैज्ञानिक संशोधनापर्यंत हा भुंगा स्वस्थ बसू देत नाही. तशी दैवी शक्ती लाभली तर तिचा उपयोग माणसांच्या भल्यासाठी होईल की काही वाईट गोष्टीही घडतील, हा त्या कल्पनेच्या भरारीतून जन्मणारा पुढचा प्रश्न आहे. अशी कोणतीही कल्पना सृजनाला तसेच संशोधनाला चालना देते. चित्रपट, कथा व कादंबऱ्यांमधून तिला सृजनाचे पंख फुटतात तर प्रयोगशाळेत संशोधनासाठी दिवस व रात्री खर्ची पडतात.

या कल्पनेला लिखित स्वरूपाचा किमान दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. ग्रीक दंतकथेमधील मेडुसा, स्थिनो व युरायली या दुर्जन बहिणींनी त्रासलेल्या समाजाची सुटका करणाऱ्या अपोलोला अदृश्य करणारी ‘कॅप ऑफ हेडीज’ ही टोपी सापडली होती. थोर तत्त्ववेत्ता प्लेटोच्या रिपब्लिकमध्ये सॉक्रेटिस व ग्लॉकॉन यांच्या संवादात जैजीज नावाच्या मेंढपाळाला एका मृतदेहावर सापडलेल्या चमत्कारी अंगठीचा उल्लेख आहे. मेंढपाळांना कळपाचा हिशेब राजाला नियमितपणे द्यावा लागत  असे. तो देताना अंगठी घातलेल्या मेंढपाळाला त्याच्याकडे अदृश्य होण्याची शक्ती असल्याचे लक्षात आले. मग त्याने राजाला छळले, राणीची छेड काढली, राज्य बळकावले. त्याला अमर्याद शक्ती व सत्तेचा मोह झाला व त्यातच त्याचा अंत झाला. अमर्याद सत्तेचा मोह कसा वाईट असतो, यासाठी सॉक्रेटिसने ही कथा ग्लॉकॉनला सांगितली. याचाच अर्थ अदृश्य होण्याची शक्ती नेहमी दैवी वरदानच असते असे नाही. आपण कुणाला दिसत नाही, आपले काही अस्तित्वच नाही, ही बाब अधिक वेदनादायी असते. अदृश्यता शाप ठरतो.

अदृश्य होण्याच्या दैवी शक्तीवर आधारित २०२० मधील ‘द इनव्हिजिबल मॅन’ हा चित्रपट ज्यावर बेतला ती एच. जी. वेल्स यांची कादंबरी १८९७ची. यातूनच या कल्पनेभोवती काळ कसा थांबला हे लक्षात यावे. यातील नायक त्याच्या जुन्या प्रेयसीवर लक्ष ठेवण्यासाठी त्या शक्तीचा वापर करतो. जे. आर. आर. टोलकिनच्या ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या जुन्या तीन चित्रपटांच्या मालिकेचा नायक याच वेदनेतून वेडा होतो. व्हिक्टर रौसोच्या ‘द इनव्हिजिबल डेथ’मधील अदृश्य राजा तशाच सैन्याच्या मदतीने अमेरिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतो. एडवर्ड पेज मिचेलच्या ‘द क्रिस्टल मॅन’मधील प्रयोगशाळा मदतनीसालाही हा शाप भोवतो. तो आत्महत्या करतो.

या विषयावरचे देशी साय-फाय म्हणता येतील असे आपले भारतीय चित्रपट मात्र भाबडे. त्यात ही शक्ती म्हणजे वरदानच जणू. १९८७ सालच्या सुपरहिट ‘मिस्टर इंडिया’मध्ये नायक अनिल कपूर दुर्जनांचा नाश करण्यासाठी ही शक्ती वापरतो. सोबतच श्रीदेवीशी दिसण्या, न दिसण्याचा लपंडावही खेळतो. त्याआधी १९७१ च्या के. रमणलाल दिग्दर्शित ‘एलान’मध्ये पत्रकार विनोद मेहराला त्या ग्रीक मेंढपाळासारखीच अद्भुत अंगठी सापडते व जटील गुन्ह्यांची पाळेमुळे तो शोधून काढतो. अपवाद, १९६४ मधील ‘मिस्टर एक्स इन बॉम्बे’ या चित्रपटाचा. त्यात कुमकुमचे वडील अदृश्यपणा देणारे द्रावण तयार करतात. ते प्यायल्याने त्यांच्या सहायकाचा मृत्यू होतो. मदन पुरी त्यांना ब्लॅकमेल करून कुमकुमशी लग्न करतो. ती मात्र किशोरकुमारच्या प्रेमात पडते.

प्लेटोच्या मेंढपाळाच्या चमत्कारी अंगठीने पुढे मनगटावरचे घड्याळ किंवा प्रयोगशाळेतील द्रावण, यंत्राचे रूप घेतले. २००६ साली ‘नेचर’ या वैज्ञानिक नियतकालिकात, सेंट अँड्र्यूज विद्यापीठ, ड्युक विद्यापीठ व इम्पेरियल कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी दावा केला, की मेटामटेरियल्सचे क्लोकिंग म्हणजे व्यक्तीभोवती इलेक्ट्रोमॅग्नेटिक आवरण तयार केले तर तो पारदर्शक बनू शकतो. त्याआधी टोक्यो विद्यापीठातील सुसुमू ताची व सहकाऱ्यांनी रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी शोधल्याचा दावा केला होता. रस्त्यावर उभ्या व्यक्तीभोवती इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग तयार केले तर ती व्यक्ती पारदर्शक बनते, त्याच्या मागून जाणारी वाहने स्पष्ट दिसतात, असा व्हिडीओ त्या प्रयोगाचे यश म्हणून जारी करण्यात आला. तो अजूनही यूट्यूबर आहे. याशिवाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगांचा उपयोग भूकंपाची आगाऊ सूचना देण्यासाठी होऊ शकेल, असे मानणारे अनेक संशोधक आहेत. भूकंपापूर्वीची स्पंदने, आवाज व प्रकाशाचे सूक्ष्म तरंग टिपण्यासाठी झाडांचा वापर कसा करता येईल यावर संशोधन सुरू आहे. कारण, झाडे त्या स्पंदनांचा, तरंगांचा प्रतिध्वनी टिपू शकतील.