शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Student: सावधान! विद्यार्थ्यांवर वाढते आहे डिजिटल पाळत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 05:50 IST

Digital surveillance: बहुतांश विद्यार्थी दोन वर्षे ऑनलाईन शिक्षण घेत होते. त्यामुळे डिजिटल उपकरणे वापरणं, हा त्यांच्या आयुष्याचा अत्यावश्यक भाग झाला आहे. कोविडच्या काळात विद्यार्थी - निरीक्षण सॉफ्टवेअर अनेक शाळांनी वापरले होते. मोठ्या डेटाबेसमध्ये विद्यार्थ्यांच्या  वैयक्तिक माहितीचे संकलन आणि त्यानंतरचा वापर (अनेकदा संमतीशिवाय), माहितीचे  संरक्षण आणि गोपनीयतेला धोका निर्माण करतो.

- डॉ. दीपक शिकारपूर (उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक)

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे जगभरातील काम करण्याच्या पद्धतीवर ‘न भुतो न भविष्यति’ असा परिणाम झाला आहे. त्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. कामकाजाच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब करण्याकडे सर्वच देशांचा कल दिसून येत आहे आणि तो वाढतच  जाणार आहे. २०२२ नंतर न्यू नॉर्मल जीवन पद्धती आपल्याला अनुभवायची आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ हे आवडो वा न आवडो, पण आता अनेकांच्या हळूहळू अंगवळणी पडलं आहे. यामुळे सतत ऑनलाईन असणे हे अनेकांचे वास्तव आहे.

बहुतांश विद्यार्थी दोन वर्षे ऑनलाईन शिक्षण घेत होते. त्यामुळे डिजिटल उपकरणे वापरणं, हा त्यांच्या आयुष्याचा अत्यावश्यक भाग झाला आहे. कोविडच्या काळात विद्यार्थी - निरीक्षण सॉफ्टवेअर अनेक शाळांनी वापरले होते. मोठ्या डेटाबेसमध्ये विद्यार्थ्यांच्या  वैयक्तिक माहितीचे संकलन आणि त्यानंतरचा वापर (अनेकदा संमतीशिवाय), माहितीचे  संरक्षण आणि गोपनीयतेला धोका निर्माण करतो. ही माहिती कशा प्रकारे वापरली जाते, यावर काहीच बंधन नाही. चुकून जर ही माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागली तर पुढील परिणामांची जबाबदारी कुणाची (शाळेची, पालकांची का विद्यार्थ्यांची) यावर विचार होणे आवश्यक आहे. 

सध्या अनेक शाळा काही सेवा देयकांचे सॉफ्टवेअर वापरत आहेत. हे सेवा देयक अनेक प्रकारची माहिती गोळा करत आहेत. (अनेकांचा हेतू स्तुत्य आहे.) शैक्षणिक दर्जा सुधार व विद्यार्थ्यांचा  सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून अनेक पालक उत्साहाने डिजिटल शिक्षण पद्धतीत सहभागी झाले आहेत. पण भारतात, शैक्षणिक सॉफ्टवेअरच्या नियमनाच्या अनुपस्थितीमुळे शैक्षणिक संस्था व त्यांनी नियुक्त केलेल्या सेवा देयकांच्या सेवेत संदिग्धता, अस्पष्टता आणि माहितीची विषमता निर्माण झाली आहे. गोपनीयता, माहितीची सुरक्षित हाताळणी हे मुद्दे किती शाळा, पालक जागरूकतेने पाहतात? अनेक विकसित देशांत सतत होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी, विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती जाणण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले जात आहे.

भारतातही जिथे पालकांचे (वेळ नसल्याने) पाल्यावर नियंत्रण नाही तिथे शाळेची जबाबदारी वाढत आहे. आजच्या पिढीला संवादमाध्यमी तंत्रज्ञान अगदी लहानपणापासूनच हाताळण्याची संधी मिळाली आहे.  त्यामुळे तरूणांचे इंटरनेट वापरण्याचे प्रमाण खूपच जास्त असते. बऱ्याचदा निव्वळ उत्सुकतेपायी त्यांच्याकडून संशयास्पद साइट्स उघडल्या जातात (ॲन्टिव्हायरसने धोक्याचा इशारा दिल्यानंतरदेखील!) परिणामी त्यांच्या वापरातील संगणकीय प्रणालींमध्ये विविध व्हायरस, मालवेअर, स्पायवेअर घुसवणे सोपे जाते. फेसबुकवरून बदनामी किंवा ऑनलाइन व्यवहारांतील फसवणूक यामध्येही त्यामुळेच अल्पवयीनांचे प्रमाण पुष्कळच आहे. विद्यार्थ्यांवरील ही डिजिटल पाळत अतिशय धोकादायक आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षणStudentविद्यार्थी