शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विद्यार्थी संप, एफटीआयआय अभ्यासक्रमात बदल अन् नसीरुद्दीन शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 03:31 IST

उत्तम लेखक, अभिनेता म्हणून ओळख असलेल्या गिरीश कर्नाड यांनी एफटीआयआयचे संचालक असताना विद्यार्थ्यांचे आंदोलन शांत केले होते़ त्याचा संदर्भ देत ‘खेळता खेळता आयुष्य’ या आत्मचरित्रावर आधारित लेख...

फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) संस्थेचे संचालक असताना विद्यार्थी संपाचा अनुभव गिरीश कर्नाड यांनाही आला होता. या संपावर त्यांनी तोडगा काढलाच; पण त्यानिमित्ताने एफटीआयआयच्या अभ्यासक्रमातही बदल केला.दिग्दर्शन आणि अभिनयाच्या विद्यार्थ्यांच्या संघर्षातून एफटीआयआयमधील हा संप झाला. दिग्दर्शनाचे विद्यार्थी डिप्लोमा चित्रपटांना अभिनयाच्या विद्यार्थ्यांना संधी द्यायचे नाहीत. बाहेरील कलाकारांना घेत असत. अभिनयाच्या विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे नसीरुद्दीन शाह आणि जसपाल यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. एफटीआयआयच्या स्वायत्ततेबाबत सुरू असलेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सभेच्या पार्श्वभूमीवर नट-नट्यांनी उपोषण करायला सुरुवात केली. एक आठवडाभर सत्याग्रह करून बैठकीच्या शेवटच्या दिवशी सदस्यांना घेराव घातला. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अब्दुल जमाल किडवाई, हृषीकेश मुखर्जी, मृणाल सेन यांना कार्यालयातून बाहेर पडू न देता आत्ताच्या आता नियम बदलण्याची मागणी केली. संस्थेत तातडीने नियम बदलणे शक्य नव्हते. विद्यार्थी ऐकत नसल्याने पोलिसांना कळवावे लागले. मोठ्या फौजफाट्यासह पोलीस आले. संस्थेत पोलीस येणे म्हणजे विद्यार्थ्यांना आवरण्यास आपण असमर्थ असल्याचे जाणवल्याने कर्नाड मुख्य दरवाजाकडे धावले. सईद मिर्झा आणि त्यांच्यासोबतच्या इतर विद्यार्थ्यांनी पोलिसांना आत सोडू नका, आम्ही कडे करून सदस्यांना सुरक्षितपणे बाहेरपर्यंत पोहोचवू, असे सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांतच दोन गट पडून मारामारी झाली असती. त्यामुळे कर्नाड यांनी सर्व सदस्यांना मागच्या प्रवेशद्वारातून बाहेर काढले.

यानंतरही दिग्दर्शनाचे विद्यार्थी आणि विशेष करून गिरीश कासारवळ्ळी यांनी हट्ट सुरू ठेवला. अभिनयाच्या विद्यार्थ्यांनी ‘आम्हाला दिग्दर्शक विद्यार्थ्यांच्या चित्रपटात काम मिळालेच पाहिजे; अन्यथा चित्रीकरण करून देणार नाही, असे सांगितले. दिल्लीहून नसीर आणि जसपालची हकालपट्टी करण्याचे सुचविण्यात आले. पण विद्यार्थी संस्थेत असेपर्यंत काही करणे अवघड होते. त्यामुळे कर्नाड यांनी संस्थेची बस करून विद्यार्थ्यांना मुंबईला आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवासाठी पाठविले. संस्था रिकामी झाल्याची खात्री झाल्यावर पत्रकारांना बोलावून दारे बंद करत असल्याची माहिती दिली. ‘जोपर्यंत माझे बोलणे, मी घातलेले करार पाळण्याची हमी मिळणार नाही तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही,’ असे सांगितले. यामुळे अभिनयाचे विद्यार्थी नि:शस्त्र होऊन त्यांच्या मुठीत आले. नसीरुद्दीन शाह यानेही माझे म्हणणे बिनशर्त मान्य करीत असल्याचे पत्र दिले. मात्र, व्यवस्थेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भूमिका न्यायाचीच होती, असेही त्यांना सांगितले. यानंतर दुसºया वर्षाच्या सुरुवातीपासून कर्नाड यांनी तेथील अभ्यासक्रम बदलला. दिग्दर्शक, छायालेखन, संकलन यांचा परस्परांशी काहीही संबंध न येता त्यांचे वेगवेगळे अध्ययन करणे ही जुनी पद्धत आचरली जात होती. जगात सर्वत्र असलेली एकाच विद्यार्थ्याने सगळे विषय एकत्रितपणे शिकायची पद्धत अवलंबण्यात आली.

विद्यार्थ्याने पटकथा लिहून चित्रीकरण करायचे, संकलन करून पूर्ण करायचे. विद्यार्थ्यांनी दोन वर्षांसाठी एक समान अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि त्यानंतर आपल्याला रस वाटेल त्या विषयात पारंगत व्हायचे अशी व्यवस्था झाली. त्याला संस्थेतील सगळ्या शिक्षकवर्गाने पाठिंबा दिला. ज्यांना फक्त नट-नटी व्हायचे अशांना या व्यवस्थेत स्थान नव्हते. पण दिल्लीच्या राष्टÑीय नाट्यशाळेत भरपूर संधी असतात. त्यांना एफटीआयआयच्या डिप्लोमा फिल्ममध्ये काम करण्याची संधी मिळाली. याच काळात श्याम बेनेगल यांनी ‘निशांत’ चित्रपटात भूमिका करण्यासाठी कर्नाड यांना बोलावले होते. त्यांना यासाठी एका तरुण नटाची गरज होती. नट प्रतिभावान असावा; पण हिंदी चित्रपटात असतो तसला गोजीरवाणा नट नको, अशी त्यांची मागणी होती. संस्था सुरू झाल्यावर कर्नाड यांनी नसीरला बोलवून बेनेगल यांना भेटून यायला सांगितले. त्यांची या भूमिकेसाठी निवड झाली. या कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध असणारा वैरभाव विरघळून गेला. त्यानंतर श्याम बेनेगल यांच्या ‘मंथन’ चित्रपटातही नसीरला स्थान मिळाले. कलात्मक चित्रपटांत नसीरुद्दीन शाहांची कारकिर्द सुरू झाली.

(सौजन्य - राजहंस प्रकाशन) 

टॅग्स :Girish Karnadगिरिश कर्नाडNaseeruddin Shahनसिरुद्दीन शाह