शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
2
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
3
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
4
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
5
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
6
शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !
7
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
8
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
9
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
10
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
11
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
12
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
13
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
14
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
15
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
16
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
17
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
18
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
19
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
20
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...

विशेष: पाण्याचा हिशोब ठेवणारा द्रष्टा ऑडिटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 10:38 IST

नगर जिल्ह्याच्या राहात्याचे सतीश खाडे सिव्हिल इंजिनिअर झाले. व्यवसाय करण्यासाठी पुण्यात आले, तेथे त्यांना व्यवसाय करता-करताच ‘वॉटर बजेटिंग’ हा शब्द कळला आणि त्यांचे पाणीवापराबाबत डोळे उघडले !

मुलखावेगळी माणसेदिनकर गांगलनगर जिल्ह्याच्या राहात्याचे सतीश खाडे सिव्हिल इंजिनिअर झाले. व्यवसाय करण्यासाठी पुण्यात आले, तेथे त्यांना व्यवसाय करता-करताच ‘वॉटर बजेटिंग’ हा शब्द कळला आणि त्यांचे पाणीवापराबाबत डोळे उघडले ! जलसंवर्धन जेवढे महत्त्वाचे, तेवढीच उपलब्ध पाणी पुरवून-पुरवून वापरण्याची दृष्टी महत्त्वाची हे त्यांना कळले. तोच मुद्दा घेऊन त्यांनी गेल्या बारा-पंधरा वर्षांत प्रचाराचे रान उठवले आहे. नुसत्या ‘बजेटिंग’वर साठ कार्यशाळा घेतल्या. त्याचबरोबर पाणी या द्रव्याचा सर्वांगीण अभ्यास केला. ते त्या विषयावर किमान साडेतीन तास अखंड भाषण करू शकतात.- एकाही श्रोत्याला कंटाळा येत नाही. उलट, अनेक माणसे पाणी बचतीस प्रवृत्त होतात. त्यांनी त्या भाषणातील चार-चार ओळींच्या ग्राफिटी तयार केल्या आणि व्हॉट्सॲपवरून साडेतीन हजार लोकांना पाठवल्या. एकाही माणसाने वर्षभरात तो ‘ग्रुप’ सोडला नाही !

ते रोटरी सभासद आहेत. त्यांनी पुणे डिस्ट्रिक्टच्या एकशे नऊ क्लबना जलप्रबोधनाने पाणी बचत मोहिमेत जोडून घेतले. त्यातून गेल्या सात वर्षांत पुणे शहराबरोबरच एकशे सेहेचाळीसपेक्षा अधिक गावांत पाणीसंबंधात कार्य उभे राहिले आहे. त्यांनी त्यांच्या व्यवसायातील अर्थ मूव्हिंग मशीन एक वर्षभर वेगवेगळ्या गावांना पाणीसंबंधित कार्यासाठी विनामूल्य दिले, त्यातून सात गावे त्या मशीनच्या मदतीने जलस्वयंपूर्ण झाली !

त्यांनी वृत्तपत्रांत दीडशेहून अधिक लेख लिहिले आहेत. त्यातून ‘जलनायक’सारखे पुस्तक तयार झाले. त्यांनी पाण्यावरच गावोगावी सहाशेपेक्षा अधिक भाषणे केली आहेत. यूट्यूबवर त्यांचे पाणी प्रबोधनावर चाळीस कार्यक्रम आहेत. ताजा ‘कॅन्सर ट्रेन’ हा कार्यक्रम हृदय व मेंदू फाडून टाकतो. पंजाबमधील भटिंडा ते राजस्थानातील जयपूर ही ट्रेन कॅन्सर पेशंट्सची भरलेली असते. ती कहाणी सांगता-सांगता सतीश खाडे कोल्हापूर जिल्ह्यात आणि त्यातही शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे प्रमाण जास्त का? तर त्याचे कारण रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर हे पटवून देतात. म्हणजे जेथे पाणी पुरेसे आहे तेथेही माणूस शहाणपणाने वागत नाही. तो त्या पाण्याचा वापर करून रोग फैलाव करत राहतो.

सतीश यांनी केलेले अभ्यास मोठमोठे आहेत. त्यांनी चार हजार आठशे दहा लोकांकडून प्रश्नावली भरून घेतली व ते निष्कर्ष राष्ट्रीय परिषदेत मांडले. तेथे त्या निबंधाचे कौतुक झाले. त्यांनी एकशे बावीस गावांचे ‘वॉटर ऑडिट’ गावकऱ्यांकडून करवून घेतले आणि त्या गावांना त्यांची जलस्थिती पटवून दिली. त्यांना पर्यावरण रक्षकसारखे सात प्रतिष्ठाप्राप्त पुरस्कार लाभले आहेत.

जलसप्ताहासारखे कार्यक्रम योजून लोकांना आकृष्ट करण्याचे तंत्रही सतीश यांनी अचूक अवलंबले आहे. तेथे जलप्रबोधनाविषयी कार्यक्रम होतात, रोटरी वॉटर अवॉर्ड, जलदुर्गा असे पुरस्कार दिले जातात. वॉटर ऑलिंपियाड भरवून मुलांना त्या वयातच जलसाक्षर केले जाते. कारण उद्याच्या पाणीटंचाईची झळ त्यांनाच जास्त सहन करावी लागणार आहे!

टॅग्स :WaterपाणीMaharashtraमहाराष्ट्रAhmednagarअहमदनगर