शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रेम’ करण्यासाठी चीनमध्ये विद्यार्थ्यांना स्पेशल सुट्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 04:50 IST

वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागली की चीनमध्ये विद्यार्थ्यांना काही ठराविक काळासाठी सुट्टी दिली जाते.

वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागली की चीनमध्ये विद्यार्थ्यांना काही ठराविक काळासाठी सुट्टी दिली जाते. चीन सरकारनं यावेळी दोन आठवड्यांपूर्वीच वसंत ऋतूची सुट्टी जाहीर केली. सरकारच्या या घोषणेनंतर सिचुआन आणि ईस्ट जियांगसू राज्यांसोबतच  सुझोउ आणि नानजिंग शहरांनी लगेचंच त्याचं अनुकरण केलं.

त्यानंतर सिचुआन येथील साउथ वेस्ट व्होकेशनल कॉलेज ऑफ एव्हिएशन विद्यापीठनंही लगोलग विद्यार्थ्यांना सुट्टी देऊ केली, पण त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना एक अटही घातली. ही जी सुट्टी तुम्हाला दिली आहे, त्याचा विनियोग चांगल्या कामासाठीच करा. इतरवेळी विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळात अभ्यासाचा किंवा नवीन काही स्किल्स शिकण्याचा सल्ला दिला जातो, पण या विद्यापीठानं विद्यार्थ्यांना बजावलं, या काळात सर्वंत्र छान फुलं फुललेली  असतात. वातावरण अतिशय सुंदर आणि आल्हाददायक असतं. 

या काळात तुम्ही फुलांचा आस्वाद घ्या, बागांमध्ये हिंडा, पण एकट्यानं नाही, आपल्या जोडीदारासोबत निसर्गाचा हा आनंद घ्या आणि भरपूर रोमान्स करा ! विद्यापीठानं यासाठी थेट नोटीसच काढली आणि त्यात लिहिलं, ‘विद्यार्थ्यांनो, या काळात इतर कोणत्याही ‘फालतू’ गोष्टी करू नका, पुस्तकं, अभ्यास, वाचन.. यांसारख्या गोष्टीत निदान सध्या तरी आपला अमूल्य वेळ घालवू नका, त्याऐवजी आपापाल्या बॉयफ्रेण्ड, गर्लफ्रेण्डसोबत मौजमजा करा!. तुम्हाला कोणी जोडीदार नसेल, तर तातडीनं अशा जोडीदाराचा शोध घ्या आणि एकमेकांच्या सोबतीचा, सहवासाचा आनंद घ्या !’ सुटीच्या काळात तरुणांनी प्रेमात पडण्याची, रोमान्स करण्याची आणि अर्थातच मूल जन्माला घालण्याची त्यांनी जणू काही सक्तीच केली आहे. त्यासाठी विद्यापीठानं विद्यार्थ्यांना भरीव प्रोत्साहन दिलं आहे. एवढंच नाही, विद्यापीठाच्या बागा, उद्यानं आणि अगदी एकांतही उपलब्ध करून दिला आहे !

देशाचा जन्मदर वाढावा यासाठीच हे केलं जात आहे. आपली लोकसंख्या वाढावी यासाठी चीन युद्धपातळीवर जे काही प्रयत्न करीत आहे, त्या प्रयत्नांचाच हा आणखी एक अभिनव मार्ग आहे.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, देशातील जन्मदर वाढविण्यासाठी हे केलं जात आहे. विद्यापीठानं आपल्या अधिकृत वीचॅट अकाउंटवरून या सुट्टीबद्दल माहिती दिली. त्यात ‘विषय’ या कॉलममध्ये ‘विद्यार्थ्यांनी फुलं पाहणं आणि एकमेकांच्या सोबतीनं रोमान्सचा आनंद घेणं’ असं नमूद केलं आहे. विद्यापीठातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या काळात पुस्तकांपासून दूर राहण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

चिनी अधिकाऱ्यांनी सांगितलं, विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना ऑफ-सीझनमध्ये, जेव्हा पर्यटनस्थळांवर गर्दी कमी असते त्यावेळी अशा ठिकाणी फिरण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. यासाठी त्यांना सशुल्क रजाही दिली जाईल. म्हणजेच या काळात तुम्ही जोडीदारासोबत मनमुक्त फिरा, प्रवास करा, मौज करा, ऑफिसमध्ये येऊन काहीही काम करू नका, सुट्टी घ्या, तरीही तुमचा पगार कापला जाणार नाही !  

ऐश करण्यासाठीच ही सुट्टी त्यांना दिली जाणार आहे. जन्मदर सुधारण्यासाठी चिनी सरकारनं अशा प्रकारे प्रवास आणि मनोरंजनाला प्रोत्साहन देण्याचा नवा फंडा आता अंमलात आणायला सुरुवात केली आहे. चीनच्या या नव्या फंड्याला तरी तरुण बळी पडतात का, हा प्रश्नच आहे!

 

English
हिंदी सारांश
Web Title : China's colleges give 'love leave' to boost birth rates.

Web Summary : Chinese colleges are granting students 'love leave' to encourage romance and boost the country's declining birth rate. Students are urged to enjoy nature with partners, prioritizing romance over studies. The initiative includes paid leave for staff to promote tourism and leisure.
टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीchinaचीनLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट