अफगाणिस्तानात तालिबाननं महिलांवरील अत्याचाराची आता परिसीमा गाठली आहे. महिलांचं जगणं त्यांनी अक्षरश: नकोसं करून टाकलं आहे. आधीच अनेक बंधनांनी तालिबाननं स्त्रियांना जखडून ठेवलं आहे, त्यात आता नवा फतवा काढताना अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारनं महिलांसाठी गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापरावरही बंदी घातलीय. स्त्रियांनी मुलांना जन्म द्यायचा की नाही, हेदेखील आता त्यांच्या हातात राहिलेलं नाही. तेदेखील आता पुरुष आणि तालिबानीच ठरवतील. महिलांचा आपल्या शरीरावरही आता हक्क राहिलेला नाही.
तालिबाननं तिथल्या डॉक्टरांनाही धमकी दिलीय, त्यांनी महिलांना गर्भनिरोधक औषधं दिली, तर त्यांच्यावर तर कडक कारवाई होईलच, पण त्यांचं क्लिनिकही कायमस्वरूपी बंद केलं जाईल. त्यामुळे देशभरात महिला उपचारांची क्लिनिक्स बंद होत आहेत. महिलांना गर्भधारणा किंवा मिसकॅरेजवरील उपचार मिळत नाहीयेत.
जवजजान प्रांतात ३० वर्षांपासून क्लिनिक चालवणारे एक डॉक्टर सांगतात, तालिबान सत्तेत आल्यानंतर गर्भनिरोधक गोळ्या झपाट्यानं संपताहेत. इथे ७० पैकी ३० महिलांना या गोळ्यांची गरज असायची. आता आम्ही सांगतो, आमच्याकडे काहीच नाही. कंधार प्रांतासह अनेक ठिकाणी महिलांना थेट पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेण्यावर कडक निर्बंध आहेत. त्यांना उपचारासाठी महिला डॉक्टरांकडेच जावं लागतं. बदगीस प्रांतातल्या एका खासगी क्लिनिकमधील डॉक्टरांनाही तालिबान्यांनी धमकावलं आणि तिथली सगळी औषधं नष्ट करण्यात आली. २०२१ मध्ये तालिबाननं पुन्हा अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतनंतर महिलांचं स्वातंत्र्य संपवण्याचा त्यांनी जणू चंगच बांधला. महिलांविरोधी अनेक कायदे लागू करण्यात आले.
अफगाणिस्तानातील महिलांच्या दर्दभऱ्या कहाण्या जगभरातील लोकांच्या डाेळ्यांत अक्षरश: पाणी आणतात. कंदहारमधील ३६ वर्षांची परवाना. तिला नऊ मुलं आहेत. आता तिला स्वतःच्या मुलांनाही ओळखू शकत नाही. तिला नऊ मुलं तर झालीत, शिवाय सहा वेळा तिचं मिसकॅरेज झालंय. नवरा आणि सासरच्यांच्या दबावामुळे परवाना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे खचली आहे. तिची आई शरीफा सांगते, भीती आणि सततच्या गर्भारपणानं तिला पार मोडून टाकलंय. परवानासारखीच ४२ वर्षांची शकीबा. ती १२ मुलांची आई आहे. ती सांगते, मला आता उठणंसुद्धा अवघड होतंय. हाडांत सतत वेदना असतात. कुठलीही गर्भनिरोधकं न वापरण्याची नवऱ्याची सक्ती आहे. नवऱ्याकडूनच कायम बलात्काराला सामोरं जावं लागतं.
२९ वर्षांची जरघोनाही सततच्या बाळंतपणांमुळे त्रस्त आहे. तिला स्वत:चं काही आयुष्यच राहिलेलं नाही. दरवर्षी तिच्या घरात पाळणा हलतो. तिला आतड्यांचा त्रास झाला. गेल्या वर्षी डॉक्टरांनी इशारा दिला की ती जर पुन्हा गर्भवती राहिली, तर तिचा जीव जाऊ शकतो. पण, वर्षभरानंतर तिला पुन्हा गर्भ राहिला. तिनं बाळाला जन्म दिला. बाळ वाचलं, तिचाही जीव वाचला, पण आता ती रक्तस्रावाशी झुंज देतेय. अफगाणिस्तानात कुठेही जा. सगळीकडे हीच स्थिती. मुलं जन्माला घालण्याची त्यांच्यावर सक्ती. आता तर तालिबाननं तसा अघोषित कायदाच
Web Summary : Taliban bans contraception for Afghan women, forcing them to bear children. Doctors face threats for providing birth control, clinics are closing, and women lack healthcare access. Many Afghan women are facing physical and mental health issues due to forced pregnancies.
Web Summary : तालिबान ने अफगान महिलाओं के लिए गर्भनिरोधक पर प्रतिबंध लगाया, जिससे उन्हें बच्चे पैदा करने के लिए मजबूर होना पड़ रहा है। गर्भनिरोधक देने पर डॉक्टरों को धमकियां मिल रही हैं, क्लीनिक बंद हो रहे हैं और महिलाओं को स्वास्थ्य सेवा नहीं मिल पा रही है। जबरन गर्भधारण के कारण कई अफगान महिलाएं शारीरिक और मानसिक स्वास्थ्य समस्याओं का सामना कर रही हैं।