शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: रतन टाटा, देश तुमच्याप्रति अखंड कृतज्ञ राहील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:06 IST

Ratan Tata: रतन टाटा यांनी असंख्य आयुष्यांना स्पर्श केला आणि अनेक स्वप्ने जोपासली. त्यांनी देशासाठी खूप काही केले आहे, त्यांचे ऋण फिटणार नाही!

नरेंद्र मोदी(पंतप्रधान) 

रतन टाटाजी आपल्याला सोडून गेले त्याला एक महिना झाला आहे. गजबजलेल्या शहरांपासून ते छोटी शहरे, अगदी गावांपर्यंत, समाजातल्या प्रत्येकाला त्यांचे नसणे कायम तीव्रतेने जाणवत राहील. प्रस्थापित उद्योगपती, होतकरू उद्योजक आणि मेहनती व्यावसायिक सर्वांनीच त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पर्यावरणाप्रति सजगता आणि परोपकाराला वाहून घेतलेल्या प्रत्येकालाही तितकेच दुःख झाले. देशच काय, सारे जगही हळहळले.

युवकांसाठी रतन टाटा  प्रेरणास्थान होते. स्वप्ने साकारायची असतात आणि करुणा, विनम्रता बाळगत यश साध्य होऊ शकते, याचा धडाच त्यांनी तरुण पिढीला दिला.  भारतीय उद्योजकतेची सर्वोत्कृष्ट परंपरा त्यांनी जोपासली. प्रामाणिकपणा, सर्वोत्कृष्टता आणि सेवा या मूल्यांप्रति ठाम कटिबद्धता हे त्यांचे जीवनध्येयच होते..  त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने आदर, सचोटी आणि विश्वासार्हता  जपत जगभरात यशाची नवी शिखरे  गाठली. तरीही अतिशय विनम्रतेने त्यांनी हे यश स्वीकारले.  

इतरांची स्वप्ने साकारण्यासाठी आधार देणे हा रतन टाटा यांचा  एक अनोखा गुण होता. भारताच्या स्टार्ट अप परिसंस्थेचे  मार्गदर्शक म्हणून ते ओळखले जात असत. युवा उद्योजकांच्या आशा-आकांक्षा त्यांनी जाणल्या आणि  भारताच्या भविष्याला आकार देण्याची त्यांची क्षमता ओळखली. रतन टाटा यांनी नेहमीच सर्वोत्कृष्टतेचा  पुरस्कार केला आणि भारतीय उद्योगाने जागतिक मापदंड स्थापित करावेत, असा आग्रह धरला. बोर्डरूम किंवा फक्त आपल्या सहकाऱ्यांपुरती त्यांची महानता मर्यादित नव्हती. सर्व मानवतेप्रति त्यांची  परोपकारी दृष्टी होती. प्राण्यांप्रति त्यांचे अपार प्रेम सर्वपरिचित आहे. कोट्यवधी भारतीयांच्या दृष्टीने, रतन टाटा यांची देशभक्ती संकटाच्या काळात तेजाने झळाळून उठली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील प्रतिष्ठित ताज हॉटेल त्यांनी झपाट्याने पुन्हा उभे केले.  भारत दहशतवादाला नकार देत एकजुटीने उभा आहे, हेच जणू त्यांनी जगाला दाखवून दिले. 

व्यक्तिगतरीत्या मला अनेक वर्षांपासून त्यांचा स्नेह मिळाला. आम्ही गुजरातमध्ये सोबत काम केले. तिथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली, यातील अनेक प्रकल्पांवर त्यांचा खूप जीव होता. काही आठवड्यांपूर्वी, मी स्पेनचे अध्यक्ष  पेड्रो सांचेझ यांच्यासमवेत बडोदा येथे होतो आणि आम्ही संयुक्तपणे सी-२९५ विमाने बनवणाऱ्या संकुलाचे उद्घाटन केले. रतन टाटा यांनीच यावर काम सुरू केले होते. त्यांची अनुपस्थिती आम्हाला फारच जाणवली हे वेगळे सांगायला नको.

रतन टाटा हे पत्रलेखक म्हणूनही माझ्या स्मरणात आहेत. ते वारंवार मला निरनिराळ्या मुद्द्यांवर पत्र लिहीत असत. मग ते प्रशासनाचे विषय असोत, सरकारच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे असो किंवा निवडणूक विजयानंतर अभिनंदनाच्या शुभेच्छा असोत. मी केंद्र सरकारमध्ये गेल्यावरही आमचा निकटचा संवाद कायम राहिला आणि ते  राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांमधील एक वचनबद्ध भागीदार राहिले. रतन टाटा यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ला दिलेला पाठिंबा विशेषत्वाने माझ्या हृदयाच्या जवळ आहे. भारताच्या प्रगतीसाठी सामूहिक स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि साफसफाई अत्यावश्यक आहे हे समजून ते या लोकचळवळीचे मौखिक पुरस्कर्ते बनले. 

आरोग्यसेवा आणि विशेषत: कर्करोगाविरुद्धची लढाई हे त्यांना महत्त्वाचे वाटणारे दोन विषय.  दोन वर्षांपूर्वीच आसाममध्ये आम्ही दोघांनी मिळून कर्करोग रुग्णालयांचे  उद्घाटन केले होते. ‘आपल्या आयुष्याची शेवटची वर्षे आरोग्यसेवेसाठी समर्पित करायची आहेत’, असे तेव्हा त्यांनी बोलून दाखवले होते. समाजातील दुर्बळांच्या/असुरक्षितांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हेच न्याय्य असल्याचा त्यांना विश्वास होता.

जेव्हा जेव्हा रतन टाटा यांची आठवण निघेल, तेव्हा तेव्हा त्यांनी कल्पिलेल्या समाजाचे चित्र नजरेसमोर उभे राहील.. असा समाज, जिथे उद्योग-व्यवसाय केवळ संपत्तीनिर्मितीची नव्हे सत्कार्याला आधार देणारी केंद्रे असतील, जिथे प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेचे मूल्य असेल आणि जिथे प्रगती ही सर्वांचे कल्याण आणि आनंदाच्या मापाने मोजली जाईल...

रतन टाटा यांनी असंख्य आयुष्यांना स्पर्श केला आणि अनेक स्वप्ने जोपासली... त्यामध्ये ते निरंतर वास करून राहतील. भारत देशामध्ये अक्षय ऊर्जेचे एक केंद्र तयार केल्याबद्दल देशातल्या पुढच्या पिढ्याही त्यांच्या कृतज्ञ असतील.

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटाNarendra Modiनरेंद्र मोदी