शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

स्वधर्म, स्वभाषा... आणि ‘शिवसृष्टी’चा संस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 07:38 IST

सत्तालालसेपासून दूर असणे, अन्याय, अत्याचाराविरोधात बंड पुकारणे आणि स्वधर्मासाठी निष्ठेने लढणे - ही मूल्ये शिवसृष्टीतून जगभरात पसरतील!

शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यातील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे  भाषण वैशिष्ट्यपूर्ण होते. त्यांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वंकष पैलूंना ओघवत्या शैलीत स्पर्श केला आणि शिवाजी महाराजांची अराजकीय प्रतिमा मांडली. शिवाजी महाराजांनी शून्यातून उभारलेल्या स्वराज्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विधानाचा दाखला दिला. यशवंतराव म्हणाले होते, ‘छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचे काय झाले असते याची जगाला पूर्ण जाणीव आहे. पाकिस्तानची सीमा शोधण्यासाठी दूर जावे लागले नसते, तुमच्या-माझ्या घराजवळच (पाकिस्तानची) सीमा असती.’ कोणतीही राजकीय टिप्पणी न करता भाजपला शिवराज्य कसे अपेक्षित आहे, याची मांडणी शाह यांनी केली.   

बाबासाहेब पुरंदरे यांचा सन्मान करताना अमित शाह  म्हणाले, ‘आसेतुहिमाचल शिवाजी महाराजांची गौरवगाथा मांडताना बाबासाहेब थकले नाहीत, ते नसते तर शिवाजी महाराजांना जाणणाऱ्यांची संख्या कमी असती.’ ब. मो. पुरंदरे या सामान्य माणसाचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होण्याचा प्रवास उलगडताना शाह यांनी मैथिलीशरण गुप्त यांच्यापासून ते रामायण, महाभारताचे दाखले दिले. छोट्या-मोठ्या कार्यक्रमात स्वनाममुद्रेची पाटी लावण्यासाठी धडपणाऱ्या राजकारण्यांनी जाणीव ठेवावी की, ४३८ कोटी रुपये खर्च करून उभ्या राहात असलेल्या  शिवसृष्टीवर बाबासाहेब पुरंदरे यांची नाममुद्रा नाही, याचा उल्लेखही शाह यांनी केला. शिवाजी महाराज स्वधर्मासाठी लढले, स्वभाषेचा आग्रह धरला, स्वराज्यास राजमुद्रा दिली, हा शाह यांच्या भाषणातील संदर्भही महत्त्वाचा होता.    

‘महाराजा शिवछत्रपति प्रतिष्ठान’ची स्थापना श्रीमंत राजमाता सुमित्राराजे भोसले, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि मंडळींनी दि. ७ एप्रिल १९६७ रोजी केली. शिवचरित्राचा प्रसार आणि प्रचार, त्यातून राष्ट्रीय कार्य घडावे, या ध्येयाने हे प्रतिष्ठान काम करीत आहे. पुढे स्थायी आणि भरीव स्वरूपाचे काही निर्माण व्हावे, या भावनेतून उभी राहिली ‘शिवसृष्टी’! ती पुण्यापासून ११ किलोमीटर अंतरावर पुण्याच्या दक्षिण भागात आंबेगाव (बु), पुणे येथे असून, शिवजयंतीच्या निमित्ताने अमित शाह यांच्या हस्ते या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले.‘शिवसृष्टी’मध्ये सरकारवाडा, रंगमंडल, गंगासगर, भवानीमाता स्मारक, डार्कराइड, राजसभा, माची, बाजारपेठ, कोकण ग्राम, आकर्षण केंद्र, लँड स्केपिंग, हार्ड स्केपिंग, तटबंदी, अश्वारोहण इत्यादि उभारण्यात येणार आहे. यासाठी ४३८ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात सरकारवाडा, भव्य ग्रंथालय तसेच प्रदर्शनी दालनामध्ये शिवकालीन किल्ल्यांची प्रतिकृती मांडण्यात आली आहे. आग्र्याहून सूटका, छत्रपती शिवाजी महाराजांचे भाषण, रायगडाची हवाई सफर, शिवराज्याभिषेक, शस्त्र प्रदर्शन उभारण्यात आली आहे. पहिला टप्पा शिवभक्तांसाठी खुला झाला असून पुढच्या तीन टप्प्यात भवानीमाता स्मारक, राजसभा इत्यादि कामे डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सत्तालालसेपासून दूर असणे, अन्याय अत्याचाराविरोधात बंड पुकारणे आणि स्वधर्मासाठी निष्ठेने लढणे, ही मूल्ये शिवसृष्टीतून जगभरात पसरतील.

निखिल कैलास नानगुडे, उद्योजक, इतिहासाचे अभ्यासक

टॅग्स :Amit Shahअमित शाह