शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

अन्वयार्थ | विशेष लेख: माझे स्वप्न आहे... जगातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य असायला हवे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 06:46 IST

ध्यान म्हणजे केवळ गूढ साधना नाही,  ती जीवन जगण्याची एक पद्धत आहे. ध्यान म्हणजे केवळ एकाग्रताही नव्हे; ते विसर्जन आहे. सोडून देण्याची कला आहे.

गुरुदेव श्री श्री रविशंकर

शांत व्यक्ती एक शांत समाज निर्माण करते, श्वासागणिक. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणणे आणि तणावमुक्त, हिंसामुक्त जग निर्माण करणे, हे माझ्यासाठी सर्वांत सुंदर स्वप्न आहे. ध्यान ही भारताच्या आध्यात्मिक परंपरेशी जोडलेली प्राचीन साधना आहे, जी हिमालयातील ऋषींच्या ध्यानधारणेच्या आणि काशीच्या पवित्र नगरीतील कथांमुळे प्रेरणा देत आली आहे. 

अशांत मन हे ध्यान नव्हे. सध्याच्या क्षणी असलेलं मन ध्यान आहे. मन जेव्हा कोणतीही हयगय किंवा अपेक्षा करत नाही, तेव्हा ते ध्यान आहे. मन जेव्हा निर्मळ होतं, तेव्हा ते ध्यान आहे. ध्यान म्हणजे केवळ गूढ साधना नाही, तर ती जीवन जगण्याची एक पद्धत आहे. ध्यान म्हणजे केवळ एकाग्रताही नव्हे; ते विसर्जन आहे. सोडून देण्याची कला आहे. जेव्हा मन त्याच्या नैसर्गिक लयीत स्थिर होतं, तेव्हा स्पष्टता प्रकट होते आणि एक गहनशांतता उदयास येते.

ध्यान हे केवळ आरामाचे तंत्रही नाही. ती वर्तमान क्षणात जगण्याची कला आहे, ज्याद्वारे मन सतर्क आणि शांत राहते. ध्यान आपल्याला शांततेने आणि लक्षपूर्वक आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करते, अडथळे दूर करते आणि आपली अंतःसाधनेची क्षमता उघडते. ध्यानाचा उद्देश म्हणजे आतून शांतता आणि बाहेरून स्फूर्ती निर्माण करणे. ध्यानाच्या माध्यमातून भारतभर  परिवर्तनाची लाट सुरू आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर अनेक  स्वयंसेवक दुष्काळग्रस्त गावांमध्ये परतले आणि परिवर्तन घडवून आणले. नद्यांचे पुनरुज्जीवन, नापीक जमिनी पुनर्संचयित करणे यांसारख्या उपक्रमांद्वारे हे तरुण ग्रामीण भारताची कथा नव्याने लिहीत आहेत. आठ राज्यांतील ७० पेक्षा अधिक नद्या आणि प्रवाह पुनरुज्जीवित झाले आहेत, ज्याचा परिणाम २० दजार गावांमधील ३.४५ कोटी लोकांवर झाला आहे.

ध्यानाची ही शक्ती केवळ व्यक्तींपुरती मर्यादित नाही, तर फूट पडलेल्या राष्ट्रांना एकत्र आणण्यासाठी सुद्धा ध्यानाच्या शक्तीचा उपयोग केला जाऊ शकतो. जिथे पाच दशकांहून अधिक काळ सशस्त्र संघर्ष चालू होता, अशा कोलंबियामध्ये  संवाद आणि ध्यानाच्या हस्तक्षेपामुळे वर्षानुवर्षे साठलेल्या द्वेषाला विराम मिळाला. यामुळे FARCने युद्धविराम जाहीर केला आणि लोकशाही व्यवस्था स्वीकारली. इराक, सीरिया आणि श्रीलंका यांसारख्या युद्धग्रस्त प्रदेशांमध्ये, ध्यानाने दीड लाखांहून अधिक युद्धग्रस्तांना सांत्वना दिली आहे. निर्वासित आणि आघातग्रस्त पीडितांना साध्या श्वसन तंत्राद्वारे आशा आणि उपचार मिळाले, ज्यामुळे त्यांच्या अदृश्य जखमा आनंदात परिवर्तित झाल्या.

विविध समुदायांमध्ये संवाद आणि समजूत वाढविण्याच्या प्रयत्नांना येणारे यश दाखवून देते की अगदी विपरित परिस्थितीतही ध्यान  स्पष्टता, करुणा आणि आनंद निर्माण करते. ध्यान केवळ मन शांत करत नाही, तर एक उच्च दृष्टिकोन देते, ज्यामुळे नेते आणि समुदाय खोलवर रुजलेल्या भेदभावांच्या पलीकडे जाऊन टिकाऊ शांततेसाठी कार्य करण्यास सक्षम होतात.

ध्यानाने आता कॉर्पोरेट बोर्ड रूमपासून ते सरकारी कार्यालयांपर्यंत स्थान मिळविले आहे. Google आणि Microsoft यांसारख्या कंपन्यांनी उत्पादकता वाढीबरोबरच कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यक्रम स्वीकारले आहेत.  जपानच्या संसदेमध्येही अलीकडेच योग क्लबची स्थापना झाली आहे. कारागृहांमध्ये ध्यानाने हजारो कैद्यांना नवीन संधी दिली आहे. प्रिझन SMART कार्यक्रमाद्वारे  ६० देशांतील आठ लाखांहून अधिक कैद्यांनी हिंसेच्या चक्रातून मुक्तता मिळविली आणि आपली माणुसकी पुन्हा शोधून काढली आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करता, तेव्हा तुम्ही केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण जग उन्नत करत असता. 

खरेतर तुमच्या जन्मापूर्वीपासून तुम्ही ध्यान करीत आहात... जेव्हा तुम्ही तुमच्या आईच्या गर्भात काहीही न करता केवळ अस्तित्वात होतात, तेच ध्यान आहे. प्रत्येक माणसामध्ये त्या अत्यंत आरामदायी अवस्थेकडे जाण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असतेच.

टॅग्स :Meditationसाधना