शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!

By विजय दर्डा | Updated: October 21, 2024 07:52 IST

कॅनडाबरोबरचे भारताचे संबंध कधी नव्हे इतके ताणले गेले आहेत, जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर नवी आशा जन्माला आली आहे!

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

पाकिस्तानी राज्यकर्ते असे गृहीत धरून चालले होते की एससीओ म्हणजेच शांघाई को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत भारत आपल्या प्रतिनिधीला पाठवेल. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर स्वतःच बैठकीत सहभागी होण्यासाठी पोहोचतील अशी अपेक्षा कोणाचीच नव्हती. म्हणून तर पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खान म्हणाल्या, ‘स्मार्ट मूव्ह’.

भारतीय परराष्ट्रमंत्र्यांच्या स्वागतात पाकिस्तानने अजिबात कसर ठेवली नाही. गेल्यावर्षी गोव्यात झालेल्या एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बिलावल भुट्टो आले होते. त्या बैठकीत बरीच तणतण झाली. परंतु जयशंकर यांची गोष्टच वेगळी आहे. ते अनुभवी कूटनीतिज्ञ आणि प्रभावी परराष्ट्रमंत्री आहेत. त्यांनी पाकिस्तानवर थेट प्रहार न करता इस्लामाबादमध्ये आपले म्हणणे अत्यंत प्रभावीपणे मांडले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा सूरही नरमाईचा होता. भारत दुखावेल अशी कोणतीही गोष्ट त्यांनी केली नाही. नेहमीचा ‘काश्मीर राग’ही आळवला नाही. एकंदरीत वातावरण अत्यंत सद्भावनापूर्ण होते. सामान्यत: कोणत्याही देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशाच्या समकक्ष पदावरील व्यक्तीलाच भेटतात; परंतु शाहबाज यांनी पुढे येऊन जयशंकर यांचे स्वागत केले. भारतात परतल्यावर जयशंकर यांनीही या  आदरातिथ्याबद्दल शाहबाज यांचे समाजमाध्यमांवर आभार मानले.  बैठकीव्यतिरिक्त सामान्य  शिष्टाचाराची जी छायाचित्रे मी पाहिली त्यावरूनही एकंदर वातावरण चांगले होते असे दिसते. मेजवानीप्रसंगी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याबरोबर बसले होते. दोघांमध्ये आनंदाने बोलणे चालले होते. यावेळी शाहबाज यांनीही जयशंकर यांच्याशी बोलणे केले.

अलीकडेच संयुक्त राष्ट्र महासभेच्या न्यूयॉर्कमध्ये झालेल्या बैठकीत जयशंकर आणि शाहबाज एकमेकांवर खूपच घसरले होते. या पार्श्वभूमीवर नव्या बदलाकडे एक चांगला संकेत म्हणून पाहता येईल काय? शत्रुत्व भले कितीही दीर्घकाळ चालू दे, ते कधी कायमचे नसते. दोन शेजाऱ्यांनी एकत्र येण्यात दोघांचाही फायदाच असतो. दीर्घकाळ आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानलाही आपल्या परिस्थितीचा अंदाज आहे. भारत आणि पाकिस्तानातील सामान्य जनता तर उभयपक्षी संबंध सुधारण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. खरी आडकाठी आहे ती भारतविरोधावरच अस्तित्व अवलंबून असलेल्या आयएसआयची आणि तिथल्या सैन्यदलांची! भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या इम्रान खान यांची परिस्थिती हा त्या आडकाठीचाच पुरावा आहे.

दोन्ही देशांच्या संबंधांची निरगाठ इतकी सहज सुटेल असे नाही, ते म्हणूनच!  दोन्ही देशांना या दिशेने आणखी बरेच प्रयत्न करावे लागतील. आता कॅनडा आणि भारताच्या नात्याला नव्याने बसलेली गाठ अधिकच घट्ट होताना दिसते. कॅनडा आपला शेजारी देश नाही; पण माझ्या मते तो शेजाऱ्यापेक्षा कमी नाही. कारण भारतीय वंशाचे १८ लाख  लोक त्या देशाचे नागरिक आहेत. १० लाख भारतीय तेथे राहतात आणि सव्वादोन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी तेथे शिकतात. अशा देशाबरोबरचे संबंध ताणले जाणे हे दोन्ही देशांसाठी गंभीर ठरू शकते.परंतु दुर्भाग्य असे, की राजकीय स्वार्थापायी मजबूर झालेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे समजून घ्यायला तयार नाहीत. भारताबद्दलच्या त्यांच्या विषारी भावनांविषयी या सदरात मी पूर्वीही लिहिले होते. खलिस्तानी दहशतवादी निज्जर याला  कुणीतरी मारून टाकले तेव्हा ट्रुडो यांनी भारत सरकारवर आरोप ठोकला. हे ट्रुडो आपल्या वडिलांच्याच मार्गाने चाललेले दिसतात. १९८५ मध्ये कनिष्क विमान घातपाताने उडवून ३२९ लोकांचे बळीही घेणारा खलिस्तानी दहशतवादी तलविंदर सिंह परमार कॅनडात लपलेला होता. भारताने तलविंदर सिंह याला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. परंतु, पेरी ट्रुडो यांनी स्पष्ट नकार दिला. तेव्हापासून कॅनडा हा खलिस्तानचे स्वप्न पाहणाऱ्या दहशतवाद्यांचा गड झालेला आहे.

खलिस्तानी दहशतवादी तेथे राहून खुलेआम आपले उद्योग करतात. भारताविरुद्ध षड्यंत्र रचण्यात सहभागी असतात. भारताविरुद्ध षड्यंत्र रचणारा एखादा दहशतवादी मारला गेला असेल; परंतु भारताची भूमिका कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचविण्याची नसते. ट्रुडो यांचा आरोप पूर्णपणे निराधार आहे. भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याकडे बोट दाखवून त्यांनी कूटनीती नियमांचे उल्लंघनही केले आहे. आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावणे भारताला भाग पडले. जशास तसा व्यवहार करून आपणही त्यांच्या सहा अधिकाऱ्यांना हाकलून दिले. ही काही सामान्य घटना नाही.

खरा प्रश्न असा आहे,  की पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुका समोर ठेवून कॅनडा असे वागत  आहे, की त्याचा बोलविता धनी वेगळा आहे? - हा प्रश्न अशासाठी की कॅनडाचे लोकच ट्रुडो यांच्या भूमिकेवर टीका करत आहेत. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याबद्दल अमेरिका भारताकडे बोट का दाखवते, हा भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न तर नव्हे?

तूर्त तरी कॅनडाशी संबंध बिघडल्याचा परिणाम व्यापार आणि व्यवसायावर किती होईल हे इतक्यात सांगता येणार नाही. एवढे निश्चित की दोन देशांमधले संबंध जितके खराब होतील, भारतीय आई-वडील आपल्या मुलांना कॅनडात शिकायला पाठवताना तेवढेच अधिक साशंक असतील. दोन्ही देशांच्या नात्याला  निरगाठ बसली, तर त्याची जास्त किंमत कॅनडालाच चुकवावी लागेल.

- डाॅ. विजय दर्डा यांचे समग्र लेखन (vijaydarda@lokmat.com)

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारतPakistanपाकिस्तानS. Jaishankarएस. जयशंकर