शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

सोयाबीन खरेदीचा उद्भवेल उद्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 3:46 AM

- धर्मराज हल्लाळेपावसाळा लांबला, त्यातच परतीच्या पावसाने मराठवाड्यातील सर्वाधिक क्षेत्र व्यापणाºया सोयाबीनचे नुकसान झाले़ मालाची आर्द्रता वाढली़ परिणामी, तूर जशी श्रेणीत अडकली तशी सोयाबीन खरेदी आर्द्रतेत अडकणार आहे़ साधारणत: आर्द्रता १२ टक्क्यांपर्यंत असावी, असा नियम आहे़ परंतु, बहुतांश ठिकाणी ती १४ टक्क्यांपर्यंत आहे़ हमीभाव जाहीर आहे, परंतु, आर्द्रतेच्या नियमात अधिकृत ...

- धर्मराज हल्लाळे

पावसाळा लांबला, त्यातच परतीच्या पावसाने मराठवाड्यातील सर्वाधिक क्षेत्र व्यापणाºया सोयाबीनचे नुकसान झाले़ मालाची आर्द्रता वाढली़ परिणामी, तूर जशी श्रेणीत अडकली तशी सोयाबीन खरेदी आर्द्रतेत अडकणार आहे़ साधारणत: आर्द्रता १२ टक्क्यांपर्यंत असावी, असा नियम आहे़ परंतु, बहुतांश ठिकाणी ती १४ टक्क्यांपर्यंत आहे़ हमीभाव जाहीर आहे, परंतु, आर्द्रतेच्या नियमात अधिकृत केंद्रांवर सोयाबीन स्वीकारले जाणार नाही, अशी परिस्थिती आहे़ उडीद व मुगाच्या विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी सुरू आहे़ नोंदणीनुसार खरेदी केंद्रांकडून संदेशही पाठविले जात आहेत़ परंतु, सोयाबीनची नोंदणी होताना दिसत नाही़ बाजारपेठेत मात्र हमीभावापेक्षा हजार ते पंधराशे रुपये कमी दराने काही काळ खरेदी केली गेली़ दरम्यान, हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जाऊ नये यासाठी सरकारी यंत्रणेने इशारा दिला़ त्याला प्रतिसाद मिळाला नाही़ उलट हमीभावाप्रमाणे भाव देणे परवडत नाही म्हणून बहुतांश ठिकाणी व्यापाºयांनी खरेदी बंद ठेवली आहे़लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणीसह मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सोयाबीन विक्रीकरिता आॅनलाईन नोंदणीसाठी कोणीही पुढे येत नाही़ परिणामी, अधिकृत केंद्रांमध्ये आठ दिवसांमध्ये प्रत्यक्ष खरेदीचा प्रश्नच उद्भवला नाही़ एकंदर तुरीनंतर सोयाबीन खरेदी हा विषय नव्या उद्रेकाला तोंड फोडणारा आहे़ सरकार व यंत्रणा त्यावर गंभीर विचार करेल, अशी अपेक्षा आहे़ राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केला़ गेल्या दोन महिन्यात १२ वर्षांत पहिल्यांदाच केंद्र सरकारने शेतकºयांच्या बाजूने चारवेळा अधिसूचना काढल्या़ आयात शुल्क वाढवून दाळीच्या आयातीवर निर्बंध लावले, निर्यातीवरची बंधने उठविली. ज्याचा शेतकºयांना लाभ होईल़ हे सर्व गृहित धरले तरी प्रत्यक्ष शेतकºयांना हमीभावही मिळत नाही वा शासनाने घेतलेल्या निर्णयाचा हितकारी दृश्य परिणाम समोर येत नाही, ही वस्तुस्थिती केंद्र व राज्याच्या कृषी मूल्य आयोगाने समजून घेतली पाहिजे़ सोयाबीनमध्ये १२ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता नसेल, डाग नसेल तरच अधिकृत केंद्रात खरेदी होणार आहे़ आता खुल्या बाजारपेठेत सोयाबीनचे दर वाढविणे हा पर्याय सरकार समोर आहे़ अन्यथा येणाºया काळात रोषाला सामोरे जावे लागेल़ न परवडणारा ३ हजार ५० रुपये इतकाही हमीभाव मिळत नसेल तर शेतकरी कर्जाच्या फेºयातून बाहेर येईल कसा अन् त्याची शेती शाश्वत होईल कशी? कर्जमाफी तांत्रिक कारणांमुळे अडथळ्याच्या शर्यतीत अडकली आहे़ पावसाळा लांबल्याने दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनची काढणी आली़ त्याचवेळी रीन (ऋण) काढून सण साजरा करणाºया माणसांनी निम्म्या भावात, खुल्या बाजारात सोयाबीन विकले तर ते नवल कसले़ अन् त्याचा बाजारात फायदा उठविला जात नसेल तर तो बाजार कसला?मध्य प्रदेश सरकार भावांतर योजना राबवित आहे़ प्रत्यक्ष मिळणारा भाव आणि हमीभावातील फरक सरकार शेतकºयांना देणार आहे़ या तात्कालिक योजनांबरोबरच कच्च्या व प्रक्रिया केलेल्या खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविले अन् सोयाबीनच्या पेंढीवरील निर्यात अनुदान वाढविले तर सोयाबीनला योग्य भाव मिळेल, हा राज्य कृषी मूल्य आयोगाचा दावा व्यवहार्य ठरला पाहिजे़ त्यासाठी केवळ चांगल्या निर्णयाचा आभास पुरेसा नाही़ थेट अंमलबजावणीची वेळ आहे़