शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

संपादकीय : काँग्रेसमध्ये पुनश्च सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 05:55 IST

सोनिया गांधी या व्यक्ती नसून संस्था आहेत. गेल्या शंभर वर्षांच्या राष्ट्रीय परंपरेच्या त्या प्रतिनिधी आहेत. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची पुण्याई व कार्य त्यांच्या पाठीशी आहे.

काँग्रेस पक्ष जेव्हा संकटात येतो तेव्हा त्याला सोनिया गांधींच्या उत्तुंग नेतृत्वाची आठवण होते. १९९० च्या दशकात त्या पक्षाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आणि पुढे पी.व्ही. नरसिंहरावांचे सरकार १९९९ मध्ये पराभूत झाले, त्या वेळी त्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याने सोनिया गांधींना आपले नेतृत्व करण्याची गळ घातली. त्यांची विनंती मान्य करून त्या पक्षाध्यक्ष झाल्या व अवघ्या पाच वर्षांत, २००४ मध्ये त्यांनी पक्षाला केंद्रात सत्तेवर आणले. त्या वेळी लोकसभेतील बहुमताने त्यांना दिलेले पंतप्रधानपद जेव्हा त्यांनी नाकारले तेव्हा त्यांच्या त्यागाचा महिमा देशाने व जगाने गायला. आता पुन्हा काँग्रेस पक्षाने त्यांना आपले ‘हंगामी अध्यक्षपद’ दिले आहे.राहुल गांधींनी २०१९ च्या निवडणुकीतील पराभवाचे प्रायश्चित्त म्हणून पक्षाध्यक्षपद सोडले आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाला सर्वांना मान्य होईल असा नेता एक महिन्यात निवडता आला नाही. ज्यांची नावे पुढे आली त्यांना ना त्यांच्या राज्यात मान्यता होती ना त्यांना त्यांचा मतदारसंघ सांभाळता आला होता. या स्थितीत पक्षाने पुन्हा एकवार सोनिया गांधींना पक्षाचे नेतृत्व करण्याची विनंती केली व त्यांनी ते अवघड उत्तरदायित्व आता स्वीकारले आहे. पक्ष विस्कळीत आहे. त्याची केंद्रातील व अनेक राज्यांतील सत्ता गेली आहे. पक्षात वाद आणि भांडणे आहेत. मतभेदांनीही त्याला त्रस्त केले आहे. ही स्थिती एका मातृहृदयी नेतृत्वानेच सामोरे होऊन त्याला सांभाळण्याची व एकत्र राखण्याची गरज सांगणारी आहे. सोनिया गांधींचे नेतृत्व व व्यक्तिमत्त्व निर्विवाद व निष्कलंक आहे. त्यांच्यावर कोणताही आरोप भाजपला करता आला नाही. त्यांना पक्षाएवढाच पक्षाबाहेरही मान आहे. शिवाय त्या देशाएवढ्याच विदेशातही परिचित व मान्यवर आहेत.

भांडणाऱ्या, निराश झालेल्या व भांबावलेल्या संघटनेला जशा नेतृत्वाची गरज असते तसे देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. झालेच तर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांएवढ्याच त्या नव्या व कनिष्ठांनाही कमालीच्या आदरस्थानी आहेत. वय आणि पराभव यामुळे येणारी निराशा त्यांनाही आली असणार, परंतु याही स्थितीत पक्षाची गरज ओळखून व पक्षातील इतरांच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी हे काम स्वीकारले आहे. त्यांना सर्व राज्यांत जशी मान्यता आहे तशा सर्वच पक्षांतील नेत्यांना त्या आदर्शस्थानी वाटत आल्या आहेत. प्रसंगी आपल्याकडे लहानपण घेऊनही त्या पक्ष व सरकार यांची जबाबदारी पूर्ण करणा-या आहेत हा देशाचा अनुभव आहे. इतर पक्षातील व विशेषत: मित्रपक्षातील ज्येष्ठ नेत्यांना राहुल गांधींचे नेतृत्व आवडणारे असले तरी त्यांचे वय त्यांना द्यावयाच्या मान्यतेआड येणारे आहे असे मनातून वाटत आले. शरद पवार, फारूख अब्दुल्ला, लालूप्रसाद, चंद्राबाबू किंवा अगदी नितीशकुमार व नवीन पटनायक यांच्यापर्यंतच्या व ममता बॅनर्जींसारख्या आक्रमक नेत्यांचीही तीच अडचण होती. सोनिया गांधींच्या आगमनामुळे हा अडसर दूर होईल व त्यांच्यात पुन्हा एकवार चांगला संवाद सुरू होईल ही अपेक्षा आहे. सोनिया गांधी या व्यक्ती नसून संस्था आहेत. गेल्या शंभर वर्षांच्या राष्ट्रीय परंपरेच्या त्या प्रतिनिधी आहेत. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची पुण्याई व कार्य त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी ज्यांना पंतप्रधानपदावर आणले त्या डॉ. मनमोहन सिंगांची दहा वर्षांची कारकिर्दही त्यांचे स्थान उंचावणारी आहे.
पक्षाध्यक्ष, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष, एका महान परंपरेच्या प्रतिनिधी व पंतप्रधानपद नाकारणाºया नेत्या एवढा जबरदस्त वारसा पाठीशी असूनही त्या नम्र राहिल्या आहेत. विदेशात जन्म घेऊनही त्या कोणत्याही राष्ट्रीय महिलेएवढ्या राष्ट्रीय राहिल्या. त्यांचे नवे नेतृत्व काँग्रेसची मरगळ दूर करील व त्या पक्षाला पुन्हा एकवार लढाऊ पक्षाचे स्वरूप प्राप्त करून देतील ही अपेक्षा आहे. त्यांचा शब्द पक्षात कुणी खाली पडू देणार नाही आणि विरोधी पक्षातीलही कुणाला त्यांचा शब्द अव्हेरता येणार नाही. त्यामुळे पुन्हा एकवार ते पक्ष एकत्र येण्याची शक्यताही नाकारता येण्याजोगी नाही. सोनिया गांधींच्या नेतृत्वाला शुभेच्छा.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण