शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

सोशल मीडियाचंं चांगभलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 06:02 IST

सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडिया ही अपरिहार्य बाब झाली आहे. परंतु त्याचा वापर कसा करावा, याचे ज्ञान आणि ...

सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडिया ही अपरिहार्य बाब झाली आहे. परंतु त्याचा वापर कसा करावा, याचे ज्ञान आणि भान काही सर्वांनाच नाही. नेमका याच अज्ञानाचा फायदा समाजकंटक घेतात. जाती, धर्माबद्दल विद्वेष पसरविणारे संदेश टाकणे, महिलांना अश्लील शिविगाळ करणे, असे प्रकार सर्रास घडत आहेत. ट्रोलवाल्यांचा तर नुसता सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे सारासार विवेक वापरून या नवीन माध्यमांचा वापर करावा. तसेच जाणीवपूर्वक गैरवापर करणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी सरकारने कडक कायदे करावेत, असे वाचकांनी सुचविले आहे.ट्रोलविरोधात कडक कायदा हवासोशल होने म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणे असे आपण समजतो, परंतु काही लोक सोशल मीडियाचा उपयोग असहिष्णुता पसरविण्यासाठी करतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी आपला विचार, आपण कधी, कुठे, कसे मांडत आहोत, याचा विचार केला पाहिजे, तसेच ट्रोल करणाऱ्यांना वचक बसेल, असा कायदा हवा.- ललित नारायण कनाठे, राजुर कॉलरी, जि. यवतमाळ.बनावट खाती वाढलीप्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. सोशल मीडियाचा वापर सकारात्मक करतो की नकारात्मक, यावर असहिष्णुता वाढेल की नाही, हे अवलंबून आहे. अभिनेत्री केतकी चितळेला ज्या प्रकारे अश्लील भाषेत ट्रोल करण्यात आले, हा या प्रभावी साधनाचा दुरूपयोग आहे. जाणीवपूर्वक कोणाला तरी त्रास द्यायचा, म्हणून बनावट खाती उघडण्याचे प्रमाण वाढले असून, त्यावर अंकुश राहिलेला नाही.- डॉ. अजय गोपीनाथ दराडे, डॉ. हेडगेवार रुग्णालय, हिंगोली.झुंडबळी वाढलेसोशल मीडियाचा विधायक कामासाठी वापर करणारे खूपच थोडे आहेत. बनावट खाते उघडून सामाजिक व धार्मिक विद्वेष निर्माण होईल, अशा पोस्ट टाकल्या जातात. महिलांना अश्लील भाषेत ट्रोल करण्याचे प्रकार वाढले आहे. गेल्या काही वर्षात देशात झुंडबळीचे प्रकार सातत्याने घडत आहे त्यालाही सोशल मीडिया जबाबदार आहे. वापरकर्त्यांना सोशल मीडिया साक्षर करण्याची गरज आहे.- श्याम बसप्पा ठाणेदार,दौंड, जिल्हा पुणे.स्वयंशिस्त महत्त्वाचीसोशल मीडिया वापराबाबात कडक कायदे केले तर असहिष्णुता निर्माण होईल असे कोणी वागणार नाही. लोकांनी आवश्यक तेवढेच व्यक्त व्हावे, गरज नसताना विनाकारण किंवा टाइमपास म्हणून काहीही टाकत बसू नये. वापरकर्त्यांनी स्वयंशिस्त लावून घेतल्यास बºयाच गोष्टींना आपोआपच आळा बसेल.- अंबादास काळे,विचुंबे, पनवेल.

जागरूकता महत्त्वाचीसोशल मीडियावर टाकलेली एखादी पोस्ट आणि त्यावर येणाºया प्रतिक्रिया पाहता लोक हे जात, धर्म, लिंग, देश या गोष्टीतच अडकल्याचे दिसतात. एक तर टाकलेली पोस्ट ही खरी आहे की खोटी, हे कोणीच पाहत नाही. मात्र, तिचा प्रसार इतक्या वेगाने होतो की, विचार करायलाही वेळ नसतो. यासाठी याचा वापर करताना जागरूक असणे गरजेचे आहे.-बिंबीसार सुरेश शिकरे, इंदिरानगर, लातूर.सोशल मीडियाने आत्मविश्वास वाढविलासध्या सोशल मीडियाने जीवन व्यापून टाकले आहे. कालानुरूप त्याचे काही दुष्परिणाम जसे ठळकपणे समोर येत आहेत, तसेच त्याचे चांगले फायदेही निश्चितच आहेत. या नवीन तंत्रज्ञानाचा वापर कोण, कसा करतो, यावरच ते अवलंबून आहे. मी अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला आहे. आत्महत्या केलेल्या डॉक्टर पायल तडवीसारखीच मला वागणूक मिळत होती. माझ्यावर होत असलेल्या या अन्यायाची वाच्यता मी सोशल मीडियावरून करताच काही संघटना व लोक जागे झाले. त्यांचा भरभक्कम पाठिंबा लाभल्यामुळेच या प्रकरणात मला न्याय मिळाला. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. हे सर्व घडले ते केवळ सोशल मीडियामुळेच. त्यामुळेच मी अनुभवाने सांगू शकतो की कोणतेही माध्यम वाईट नसते. सारासार विवेक जागा ठेऊन त्याचा वापर आपण करायला हवा.- सम्यक किशोर तायडे, शिवाजीनगर, जळगाव.कुणाचीही मुस्कटदाबी नकोआजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया अभिव्यक्तीचे एक उत्तम साधन झालेले आहे, परंतु त्याचा वापर करून समाजात द्वेषमूलक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करीत आहेत. एखादी खोटी गोष्ट वारंवार सांगितली गेली की, ती खरी वाटायला लागते. हिटलरचा प्रचार-प्रसारमंत्री गोबेल्स यांनी याच पद्धतीचा वापर करून विरोधकांचे नामोनिशाण मिटवून टाकले. आजच्या घडीला सगळ्या गोष्टींच्या व्याख्या बदलायला लागलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीला धार्मिकतेचा, सांप्रदायिकतेचा, जातीयतेचा मुलामा चढविण्याचा जो प्रकार होत आहे, त्याच्यावर कायदाने कारवाई केली जावी. देशातील सामाजिक आरोग्य चांगले राहण्यासाठी धार्मिक मुद्द्यांना बगल देऊन रोजीरोटी, महिला सुरक्षा, रोजगार आणि तो प्राप्त करण्याची साधने याबाबतचे मार्गदर्शन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जावे. विचार मांडताना दुसºयाचा अनादर होईल अशा शिवराळ भाषेत मते मांडली जाऊ नयेत.- डॉ. सविता बेदरकर,नेहरू वॉर्ड, सिव्हिल लाइन, गोंदिया.खरं काय कळत नाहीसोशल मीडियाच्या आज तरुण वर्ग आहारी गेला आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, टिष्ट्वटर, टिकटॉक या मीडियावर बनावट खाते उघडून सरळ सरळ मनाला वाटेल तशा पोस्ट टाकल्या जातात. त्या किती खºया अन् किती खोट्या याची पडताळणी करणे अवघड असते. हा मीडिया तरुणांच्या हाती असल्यामुळे त्यांची दिशाभूल होण्यापासून तरुणांना वाचविण्याची गरज आहे.- प्रशांत अजाबराव वानखडे,टाकळी (नि.) ता. बाळापूर, जि. अकोला.दुरूपयोगच जास्तसोशल मीडियामुळे आपल्याला जगभर संपर्काचे साधन उपलब्ध झाले असले, तरी त्याचा दुरूपयोगच जास्त होत आहे. बनावट खाते उघडून जाती-धर्मात द्वेष पसरविणे, महिलांना अश्लील भाषेत भाष्य करणे असे प्रकार घडत आहेत. सामाजिक सलोख्याला यामुळे सुरुंग लागत आहे.- मुकुंद नागोराव काकीरवार,नवीन सुभेदार, नागपूर.सदुपयोग हवासोशल मीडियाचा योग्य तो वापर केल्यास नक्कीच फायदा आहे मात्र आजकाल त्याचा वापर नकारात्मकच होत आहे. सर्वाना आपली भूमिका मांडण्याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे, पण त्यामध्ये द्वेषभावना नको. वैचारिक भूमिका मांडताना मतभेद आसावेत मात्र मनभेद नसावेत.-अजय अंधारे,तिर्थपुरी, ता.घनसावंगी, जि. जालना.

आधार कार्ड सक्तीचे करासमाज माध्यमांवरील ट्रोलधाºयांना रोखण्यासाठी कायदा आणखी कडक करावा. ट्रोलधारी शक्यतो खोटे अकाउंट बनवून ट्रोल करतात. यासाठी समाज माध्यमावर अकाउंट काढण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे करावे. त्यामुळे ट्रोलवाल्यांना रोखण्यात यश येईल.- मेघा उज्ज्वलकुमार म्हस्के, नवयुग कॉलनी, औरंगाबाद.चीन, जपानप्रमाणे योग्य निर्बंध घालाचीन, जपान देशात सोशल मीडियावर (फेसबुक, व्हॉट्सअप) निर्बंध आहेत. भारतातही तसे असायला हवे. त्या वाचून काही अडेल असे वाटत नाही. सरकारशी संबंधित तेवढे सुरू राहावे. कामधाम नसल्यामुळे शेकडो तरुण-तरुणी येथे इतर उपद्व्याप करीत बसतात. हे बंद केले तर, निदान ते कामधंद्याला तरी लागतील.- सुमित तायडे, भांडारकर रोड, पुणे.युवा पिढी वाचवाआजची युवा पिढी व्यसनाधीन झाल्यासारखी सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. सोशल मीडियाचे जितके फायदे तितकेच तोटेही आहेत. हे माध्यम कसे वापरावे, याचे प्रशिक्षण कोणाचेच झालेले नाही. आजतरी फायद्यापेक्षा या माध्यमाचे तोटेच जास्त दिसत आहेत.-विनोद भाले, कडतन गल्ली, मानवत, जि. परभणी.सायबर क्राइम वाढलेआज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फेक अकाउंट्स आहेत. याच्या माध्यमातून समाजकंटक आर्थिक फसवणूक, लैंगिक शोषण करतात. अशा समाजकंटकांवर वचक बसविण्यात पोलिसांच्या साइबर क्राइम विभागाला अपयश आले आहे. म्हणूनच अशा अकाउंटवरून जातीयवादी पोस्ट टाकल्या जातात. त्यामुळे धार्मिक व जातीय भावना दुखावल्या जातात. एकमेकांच्या धर्माची व जातीची निंदानालस्तीही केली जाते. अशांवर सरकारने योग्य वेळी करवाई केली पाहिजे.-शेख मुुकरम,फत्तेसिंगपूरा,रहेमानिया कॉलनी, औरंगाबाद.सामाजिक भान संपत चाललंयसोशल मीडियावर सध्या जाती-धर्मात वाद पेटविणारे, मैत्रीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणारे, एकमेकांना आमिषे दाखवून लैंगिक शोषण करणाºया प्रवृत्ती झपाट्याने वाढत आहेत. सोशल मीडियाच्या अतिवापराने भ्रमिष्ट झालेली युवा पिढी एखादा अपघात किंवा एखादी मोठी सामाजिक हानी झाल्यावर त्या अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्याऐवजी मोबाइलमधून फोटो काढून ते सोशल मीडियावर प्रथम फॉरवर्ड करण्यासाठी धडपडत असल्याचे दुख:दायक चित्र दिसते. असेच चालत राहिले, तर देशात मोबाइलच्या माध्यमातून आराजकता वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन युवा पिढी बरबाद होईल.- प्रमोद दिलीप बिनवडे, ब्रम्हपुरी, ता. मंगळवेढा - सोलापूर.‘मॉब लिचिंग’चे प्रकार वाढलेसमाज माध्यमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडण्याऐवजी जातीय, धार्मिक तेढ, विद्वेष, फसवणुकीचे प्रकार आदी नकारात्मक गोष्टी जास्त घडत आहेत. अफवा, दिशाभूल करणारे संदेश, आदींमुळे ‘मॉब लिंचिंग’सारखे प्रकार घडत आहेत. सोशल मीडियाचा वापर विवेकशून्यतेने केल्याने काय होऊ शकते, हे अलीकडच्या काळातील घटना पाहता लक्षात येते. या माध्यमाचा वापर करून वाढत असलेली

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया