शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
8
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
9
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
10
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
11
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
13
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
14
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
15
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
16
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
17
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
18
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
19
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
20
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून सदासर्वकाळासाठी मूर्ख बनविण्याचे काम सोशल मीडिया दीर्घकाळ करू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 07:04 IST

‘मिलेनियल जनरेशन’ म्हणजेच तिशीच्या आतबाहेर वय असणाऱ्या पिढीचे तर जगणेच जणू सोशल मीडियाविना मुश्कील बनले आहे.

वेगवान ‘मास कॉन्टॅक्ट’ हे सोशल मीडियाचे बलस्थान; पण त्यालाही प्रामाणिकता, आशय आणि विश्वासार्हतेची जोड नसेल, तर हेच शस्त्र उलटल्याशिवाय राहत नाही. ज्या वेगाने हा मीडिया शिखरावर नेतो, त्याच वेगाने तो जमीनदोस्तही करतो. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियावर भारतीय जनता पक्ष आणि रा. स्व. संघाचे नियंत्रण असल्याचे सांगत काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी संसदीय चौकशीची मागणी केली. त्यावर भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी गांधींना ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ची आठवण करून दिली. हा विषय राजकीय बनला; कारण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर या आभासी विश्वात आज देशच नव्हे, तर विश्व बुडाल्याची वस्तुस्थिती या सगळ्याच्या तळाशी आहे. ‘मिलेनियल जनरेशन’ म्हणजेच तिशीच्या आतबाहेर वय असणाऱ्या पिढीचे तर जगणेच जणू सोशल मीडियाविना मुश्कील बनले आहे. सोशल मीडियाच्या आधारे जनमत बनविणे, बदलविणे, वाकविणे या तिन्ही गोष्टी शक्य असल्याचे सांगितले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याचा पराक्रम, नरेंद्र मोदी यांनी खंडप्राय आणि अफाट लोकसंख्येच्या भारतात सलग दोनदा विजय मिळविण्याचा चमत्कार, युरोपातून बाहेर पडण्याचा ग्रेट ब्रिटनचा ‘ब्रेक्झिट’चा निर्णय किंवा त्याआधीची २०११ची इजिप्तमधली ‘अरब स्प्रिंग’ क्रांती या ठळक घटनांमध्ये सोशल मीडियाचा वाटा निर्णायक राहिलेला आहे. गेल्या शतकात वृत्तपत्र, दूरचित्रवाणी आणि इंटरनेट ही प्रचार, प्रसार, जनसंपर्काची साधने होती.

नव्या शतकातल्या पहिल्याच दशकात या सर्व पारंपरिक साधनांना सोशल मीडिया या अजस्र आणि अतिवेगवान राक्षसाने बघता बघता कालबाह्य ठरविले. सोशल मीडियाचा वेग आणि पसारा शब्दश: विश्वव्यापी आहे. अर्थातच शस्त्र कोणतेही असो, ते चालविणा-या हातांमागचा मेंदू महत्त्वाचा असतो. सोशल मीडियाच्या बाबतीत हे विधान जास्त खरे; कारण या माध्यमाचा वरपांगी चेहरा हा अनियंत्रित आणि मुक्त स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा आहे; पण वास्तवात हे माध्यम वापरकर्त्याला ‘ग्राहक’ बनविणारे आहे. वापरकर्त्याच्या आवडीनिवडी जोखून त्याला तेच-ते खाद्य देत राहण्याची आजवरच्या कोणत्याही माध्यमाकडे नसलेली अचूकता सोशल मीडियाकडे आहे. त्यामुळेच इतर कोणत्याही पारंपरिक माध्यमांच्या तुलनेत सोशल मीडिया अधिक पद्धतशीरपणे आणि प्रभावीपणे जनमत खेळवू शकतो. मोबाईल, पर्सनल कॉम्प्युटरच्या माध्यमातून व्यक्तीच्या थेट मनात प्रवेश करून हवी ती विचारसरणी त्याच्या मनावर बिंबवत राहायचे, हे सोशल मीडियाचे अनोखे कौशल्य आहे. म्हणूनच राहुल गांधींचा आरोप बिनबुडाचा नाही. इतकेच की, त्यांच्या विधानात व्यावहारिक तथ्याची भली मोठी चूक आहे. फेसबुक ही बहुराष्ट्रीय आणि त्यातही पुन्हा अमेरिकी कंपनी आहे, जिला फक्त नफा-तोटा कळतो. कोणाच्या बाजूला राहण्यात व्यावसायिक हित अधिक आहे, हे फेसबुकसाठी महत्त्वाचे. आज सत्तेत भाजप असल्याने त्यांचे झुकते माप त्या बाजूला पडले असेल, तर उद्या काँग्रेस सत्ताधारी झाली तर त्यांच्यासाठी काँग्रेस महत्त्वाची ठरेल. या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे सामान्य वापरकर्ता. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्या भारतीयांची संख्या प्रचंड म्हणजे ४० कोटी आहे.
सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेणे फेसबुकसाठी महत्त्वाचे ठरते ते या संख्येमुळे. अंबानींच्या डिजिटल कंपनीत फेसबुक थेट ४४ हजार कोटी रुपये गुंतविणार असेल, तर सत्ताधाºयांशी जुळवून घेणे आणखीनच महत्त्वाचे ठरते. अन्यथा गुगल, फेसबुकसारख्या बलाढ्य कंपन्यांना चीनने जसे झटके दिले, तसेच अडथळे भारतातल्या सत्ताधाºयांनी आणले, तर चाळीस कोटी एवढे अफाट ग्राहक संपूर्ण युरोपात किंवा अमेरिकेतही मिळणे मुश्कील. महत्त्वाचा प्रश्न असा, की, राहुल म्हणतात त्याप्रमाणे फेसबुक जर भाजप नियंत्रित होणार असेल, तरी त्यांचे ४० कोटी ग्राहकसुद्धा त्यांचेच अंकित होतील का, हा आहे. असे घडणार असेल तर हे अपयश येथील राजकीय व्यवस्थेचे असेल, ज्याची मोठी जबाबदारी या देशातल्या सर्वांत जुन्या काँग्रेस पक्षाकडेच जाईल. सोशल मीडियामुळे चाळीस कोटी लोकांच्या घरात पोहोचता येईल; पण त्यांना सदासर्वकाळासाठी मूर्ख बनविण्याचे काम सोशल मीडिया दीर्घकाळ करू शकत नाही, हेही भाजप आणि काँग्रेस या दोघांनी ध्यानात घ्यावे लागेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीSocial Mediaसोशल मीडिया