शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

पक्ष गारठला

By admin | Updated: January 19, 2015 22:47 IST

काँग्रेसच्या पराभवाचे प्रामाणिक कार्यकर्त्याला शल्य आहे़ या पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी परिश्रमाची त्याची तयारी आहे़ पण आपमतलबी नेत्यांमुळे हा कार्यकर्ता संतापलेला आहे.

काँग्रेसच्या पराभवाचे प्रामाणिक कार्यकर्त्याला शल्य आहे़ या पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी परिश्रमाची त्याची तयारी आहे़ पण आपमतलबी नेत्यांमुळे हा कार्यकर्ता संतापलेला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सपशेल नाकारल्यानंतरही काँग्रेस पक्ष यातून कुठलाही धडा घ्यायला तयार नाही़ काँग्रेससाठी पराभव नवीन नाही़ सव्वाशे वर्षांचा इतिहास लाभलेल्या या पक्षाने यापूर्वीही अनेक पराभव बघितले आणि पचवलेही आहेत़ अशा संकटांमधून पुन्हा उभ्या राहिलेल्या काँग्रेसने नंतरच्या काळात देशाला खंबीर नेतृत्वही दिले आहे़ यावेळची परिस्थिती मात्र वेगळी आहे़ काँग्रेसशी एकनिष्ठ असलेला पारंपरिक मतदार या पक्षापासून आता दुरावलेला आहे. दलित-मुस्लीम मतदार नव्या पर्यायाच्या शोधात आहे. राहुल गांधींना खूप तळमळ आहे, पण नेमके काय करावे, याच संभ्रमावस्थेत ते सतत चाचपडत असतात. दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसची ही दयनीय अवस्था या पक्षाचा कार्यकर्ता प्रथमच हताशपणे पाहात आहे. विदर्भात तर काँग्रेस नामशेष झाली की काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात खदखदत आहे़ प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याबद्दल विदर्भातील सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या असंतोषाची दखल घ्यायला पक्षनेतृत्वाला सवड नाही आणि प्रदेशाध्यक्ष नट्टा-पट्ट्यातून बाहेर पडायला तयार नाहीत़ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या परवाच्या चंद्रपूरच्या सभेत एका महिला कार्यकर्त्याने माणिकरावांना सुनावलेले खडे बोल हा कार्यकर्त्यांच्या मनातील प्रातिनिधिक संताप आहे़ चंद्रपूरच्या सभेप्रमाणेच कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, या भीतीने माणिकरावांनी नंतरची यवतमाळातील सभा वेळेवर रद्द केली. कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला लढण्याचे बळ देण्याचा हा काळ आहे आणि अशावेळी प्रदेशाध्यक्ष त्याला पाठ दाखवून पळ काढतात? खरे तर माणिकरावांना पदावर राहण्याचा कवडीचाही नैतिक अधिकार नाही. विधानसभा निवडणुकीत मुलाच्या तिकिटासाठी राजीनाम्याची माणिकरावांनी धमकी दिली त्याच दिवशी त्यांनी तो अधिकार गमावला होता.देशात, राज्यात सत्ता गेल्यानंतर खचलेल्या कार्यकर्त्यांना विश्वासाने सोबत घेऊन त्यांचे मनोबल वाढविण्याची गरज आहे. पण तसे होत नाही. स्वत:च्या शिक्षण संस्था, सहकारी सोसायट्यांच्या पलीकडे विचार न करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी स्वत:च्या कुटुंबीयांव्यतिरिक्त सामान्यांचे नेतृत्व पुढे येऊ दिले नाही़ सामान्य कार्यकर्त्यांतून नवे नेतृत्व उदयास यावे यासाठी राहुल गांधींनी युवक काँग्रेसच्या निवडणुकांची नवी रचना अमलात आणली. पण शेवटी काय साध्य झाले? युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून कोण निवडून आले. अकोल्याचे महेश गणगणे (माजी मंत्री सुधाकर गणगणे यांचे सुपुत्र), चंद्रपूरचे राहुल पुगलिया (माजी खासदार नरेश पुगलिया यांचे सुपुत्र), नागपूरचे कुणाल राऊत (माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र) राहुल गांधींना अपेक्षित असलेले नेतृत्व या निवडणुकीतून समोर आलेच नाही. काँग्रेसच्या पराभवाचे प्रामाणिक कार्यकर्त्याला शल्य आहे़ या पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी परिश्रमाची त्याची तयारी आहे़ पण आपमतलबी नेत्यांमुळे हा कार्यकर्ता संतापलेला आहे. विधिमंडळ अधिवेशनात पक्षाने काढलेल्या मोर्चात त्याला जावेसे वाटले नाही, शेवटी भाड्याने माणसे आणावी लागली, त्यातही नेत्यांचा कद्रूपणा एवढा की भाड्याने कार्यकर्ते जमवतानाही त्यांनी कंजुषी केली. कशीबशी पाच हजार माणसे आलीत. वर्धा जिल्ह्यात तर या पक्षाला जिल्हाध्यक्ष नाही़ अकोला, वाशिम जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व दिसत नाही़. नागपुरात विलास मुत्तेमवारांच्या वैयक्तिक अहंकारापोटी काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. संकटात सापडलेल्या काँग्रेसला विदर्भाने नेहमीच बळ दिले आहे. या पक्षाने विदर्भातील काँग्रेस नेत्यांनाही खूप काही दिले आहे. शिक्षण संस्था, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, कंत्राटदारी, बायको-मुलांना सरपंचापासून आमदारकी इत्यादी इत्यादी...पण आज पक्षाला काही देण्याची वेळ आली तेव्हा काँग्रेस नेत्यांची अवस्था समुद्रात भरकटलेल्या जहाजावरच्या उंदरांसारखी झाली आहे.- गजानन जानभोर