शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

ग्रहण काळात शुक्लकाष्ट

By सचिन जवळकोटे | Updated: July 26, 2018 06:11 IST

ग्रहणकाळात राजकीय नेते नेमकं काय करणार, याचाही शोध घेण्यासाठी बनले सारेच उत्सुक.

‘उद्या काय हाय रं बंड्याऽऽ’ पारावर बसल्या-बसल्या कानात काडी फिरवत गुंड्यानं विचारलं. ‘उद्या का नाऽऽय पोरनिमा हाय पोरनिमा.. खाटखूटवाली आषाढी पोरनिमा,’ बंड्यानंही डोक खाजवत उत्तर दिलं. तसा गण्या खेकसला, ‘खाटखूटवाली गटारी अमावश्या असतीयाऽऽ’‘मग काय हाय रं उद्या?’ महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण, या गहन प्रश्नासारखंच कोडं बंड्याला पडलं.‘उद्या गिºहान हाय गिºहानऽऽ लई सावध ºहायचं असतंया उद्या,’ गुंड्यानं नवी माहिती पुरविताच पारावरच्या चर्चेला लागले ग्रहणाचे वेध. या ग्रहणकाळात राजकीय नेते नेमकं काय करणार, याचाही शोध घेण्यासाठी बनले सारेच उत्सुक. सर्वप्रथम ही सारी मंडळी ‘कृष्णकुंज’वर गेली, तेव्हा खर्ज्या आवाजात अन् फर्ड्या भाषेत ‘राज’ सांगू लागले, ‘मी माझ्या तमाम मनसैनिकांना सांगितलंय की मुंबईच्या खड्ड्यातल्या पाण्यात ग्रहण बघा अन् माझ्या फेसबुक वॉलवर टाका.’.. नंतर भेटले रौतांचे संजय. ते ‘उद्धों’शी मोबाईलवरून बोलत होते, ‘आपण असं करू या का साहेब... इतकी वर्षे देवेंद्रांच्या चंद्राला आपण खंडग्रास ग्रहणाइतका त्रास दिला. आता सावज दमलं असेल तर आपण थेट खग्रासच बनू या,’ हे ऐकून मंडळी दचकली. ‘सत्तेचा सूर्य’ देऊनही ‘मातोश्री’कार केवळ ‘ग्रहणाऽऽ ग्रहणी’मध्येच अडकलेत, हे ध्यानात येताच मंडळींनी चंद्रकांतदादांना गाठलं. मात्र, ‘सार्वजनिक बांधकाम’च्या कृपेनं चौका-चौकात पडलेल्या खड्ड्यांमुळे त्यांची पाठ दुखू लागल्याचा निरोप यल्लपानं देताच मंडळी पुढे सरकली.आता गाठ पडली जळगावच्या नाथाभाऊंशी. ग्रहणाविषयी विचारताच त्यांनी रागारागानं खडसावलं, ‘इथं मलाच ग्रहण लागून राहिलेऽऽ तिथं तुम्ही मला काय नवीन विचारून राहिले?’ हिरमुसल्या चेहऱ्यानं मंडळी सदाभाऊंना भेटली. ते पांढºया दुधातले काळे बोके हुडकत बसलेले. त्यांना विचारताच दाढी खाजवत त्यांनी दोन-तीन कृषी अधिकाºयांना धडाऽऽ धड फोन केले, ‘दिवाळी खुशीसारखी ग्रहणाची काही स्पेशल गिफ्ट-बिफ्ट असते की नाही?’ अशी विचारणा करताच तिकडचे आवाजच बंद झाले.मग मंडळी अशोकराव नांदेडकरांना भेटली. ते मात्र, भलतेच खुशीत दिसले. ‘आता आमचं ग्रहण सुटायची वेळ झालीय,’ असं मोठ्या आत्मविश्वासानं सांगून त्यांनी ‘राहुल बाबां की जादू की झप्पी’ हा व्हिडीओ बघण्यास सुरुवात केली. विरोधकांना ‘झप्पी’ देण्यापेक्षा सहकाºयांना ‘प्रेमाची मिठी’ मारली तर अडथळे दूर होतील, हे या ‘हात’वाल्यांना कधी कळणार, असं एकमेकांना विचारत मंडळी बारामतीला पोहोचली.तिथं ‘मीडियासोबत आक्रमक संवाद कसा साधावा?’ हे पुस्तक वाचण्यात सुप्रियाताई दंग होत्या तर ‘मीडियासमोर कसं तोलून-मापून बोलावं?’ याचे धडे चिरंजीवांना देण्यात अजितदादा रमले होते. थोरल्यां काकांना मंडळी भेटली, तेव्हा त्यांनी सांगितलं, ‘ग्रहणकाळात कमळाची पूजा करावी, मात्र देवेंद्राचं दर्शन घेऊ नये, अशी इच्छा असली तरी मी पडलो ‘पुरोगामी’ विचारसरणीचा. विरोधकांची ‘जात’ बघून राजकीय भूमिकेचा ‘धर्म’ ठरविणारा. त्यामुळे ग्रहणकाळात विरोधकांमागे नसती शुक्लकाष्ट लावण्याचा नवा प्रयोग करावा म्हणतोय.’ 

 

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshok Chavanअशोक चव्हाणSadabhau Khotसदाभाउ खोत chandrakant patilचंद्रकांत पाटील