शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?

By यदू जोशी | Updated: May 9, 2025 06:53 IST

'सुप्रिया कधीही भाजपसोबत जाणार नाही', असे पवार म्हणत नाहीत; पण 'एकत्र येण्याचा निर्णय अजित-सुप्रिया यांनी घ्यावा, असेही म्हणतात, म्हणजे काय?

- यदु जोशी, 

सहयोगी संपादक, लोकमतस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील, असे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिसते. 'मिनी विधानसभे'ला राज्य सामोरे जाईल. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवातून उद्धवसेना, काँग्रेस आणि शरद पवार गट अद्याप सावरलेले नाहीत. महाविकास आघाडीसाठी भूकंपच इतक्या रिश्टर स्केलचा होता की, अपार पडझडीने झालेले नुकसान अजूनही भरून निघालेले नाही. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तर झाले; पण त्यांच्याकडे ओसाड गावची पाटीलकी आलेली आहे. वाळवंटात पाणी शोधत आहेत. भाजपशी जोरदार संघर्ष करण्याची मानसिकताच काँग्रेसमध्ये दिसत नाही. फोटो काढून तो छापण्यासाठी आंदोलन करणारे अधूनमधून काहीतरी करत असतात तेवढेच. काँग्रेस आजही लोकांमध्ये आहे; पण ती त्यांच्या नेत्यांनाच दिसत नाही.शरद पवारांचे सगळे गुण घेऊन अजित पवार पक्ष वाढवत आहेत आणि तिकडे शरद पवार कधी नव्हे ते गोंधळलेले दिसत आहेत. 'कन्या सुप्रिया सुळे यांनी संसदेत विरोधी पक्षात बसावे की, सत्तापक्षात याचा निर्णय तिनेच घ्यावा,' असे पवार यांनी एका मुलाखतीत नुकतेच म्हटले आहे. त्याच वेळी विरोधी इंडिया आघाडीने भाजपला एक सक्षम पर्याय द्यायला हवा असेही ते म्हणत आहेत. 'अजित पवार यांच्यासोबत जावे' असा एक मतप्रवाह त्यांच्या पक्षात असल्याचेही त्यांनी मान्य केले. भाजपसोबत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षही जाऊ नये, असा दुसरा प्रवाहही त्यांच्या पक्षात आहे. इंडिया आघाडीचा एक प्रमुख आधारस्तंभ असलेले शरद पवार आपल्या मुलीने इंडिया आघाडीसोबत राहावे की नाही याचा निर्णय तिच्यावर सोडत आहेत. 'सुप्रिया माझी कन्या आहे, ती कधीही भाजपसोबत जाणार नाही' असे ते ठामपणे म्हणत नाहीत. त्याच वेळी, 'एकत्र येण्याचा निर्णय अजित आणि सुप्रिया यांनी घ्यावा, मी त्या प्रक्रियेत नाही,' असेही ते म्हणतात. याचा अर्थ काय घ्यायचा? अशा विधानांमध्येच उद्याची समीकरणे दडलेली आहेत, पुढेमागे एकच राष्ट्रवादी राहील, असे दिसते. काँग्रेस, शरद पवार गटात भवितव्य दिसत नाही, तेव्हा महायुतीसोबत गेलेले बरे असे वाटणारा एक वर्ग या दोन्ही पक्षांत आहे. अजित पवार गट अनेकांना सुरक्षित वाटतो. सत्तेसोबत जायलाही मिळते आणि पक्षाच्या नावात काँग्रेसही राहते असा हा विचार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपखालोखाल यश अजित पवारांना मिळेल असा एक अंदाज आहे.

शिंदेंचे काय चालले आहे?एकनाथ शिंदेंच्या पक्षात विधानसभा निवडणुकीपूर्वी बरेच लोक गेले, नंतरही गेले; पण सध्या जरा हे प्रमाण कमी झाले आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर शिंदेंच्या पक्षाला किती आणि कसे भवितव्य असेल हा विचार आता सुरू झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून शिंदे भरभरून देत होते, आता त्या देण्याला साहजिकच मर्यादा आल्या आहेत किंवा येत राहतील. शिवाय अजित पवार आपल्या पक्षातील मंत्र्यांना, नेत्यांना पक्षकामासाठी जेवढे उत्तरदायी करतात, तेवढे शिंदे करताना दिसत नाहीत. शिंदेंचे बरेच मंत्री थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असतात. 'पक्ष म्हणून आमचे नेते शिंदे, तर सरकार म्हणून फडणवीस' अशी विभागणी करताना काही मंत्री दिसतात. तरीही 'लाडकी बहीण' सारख्या धडाकेबाज योजना आणणारे शिंदे आजही जनमानसांत प्रिय आहेत.

भाजपमध्ये नो व्हेकन्सीइतर कोणत्याही पक्षापेक्षा भाजपमध्ये जाण्यास अन्य पक्षजन इच्छुक आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचे विविध पक्षांमधील नेत्यांना आकर्षण आहे; पण त्या-त्या जिल्ह्यातील प्रस्थापित भाजपवाल्यांना बाहेरचे लोक आता नको आहेत. बाहेरून आलेल्यांचे खूप लाड झाले, आता आमचे लाड करा, ही त्यांची भावनाही चुकीची नाही! सत्तेत आणखी वाटेकरी त्यांना नको आहेत. लोकसभा आणि विशेषतः विधानसभा निवडणुकीत पक्ष सोडून गेलेले लोक परतू पाहत आहेत; पण 'त्यांना धडा शिकवा, ताटकळत ठेवा, थोडक्यात काय तर त्यांची गंमत घ्या' असा अॅप्रोच दिसत आहे.yadu.joshi@lokmat.com

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे