शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

Shaheed Diwas : भगतसिंग...पण दोन दिवसांपुरतेच...बाकी ट्रेंडिंग नसतात यार !  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 14:59 IST

दोन दिवस भगतसिंगांच्या विचारांना भरपूर लाइक मिळवण्याचा सिझन असतो. भगतसिंग, शहीद दिन, हॉट ट्रेंडिंग असतात म्हणून केवळ त्यांच्या पोस्ट व्हायरल करायच्या आणि उरलेले दिवस आपल्या वागण्यात काहीच आणायचं नाही, कारण ते प्रत्यक्ष वागण्याच्या बाबतीत समाजात कधीच हॉट ट्रेंडिंग नसतं. हा भंपकपणाच! कोणत्याही क्रांतिकारकाला जराही मान्य नसणारा ! भगतसिंगांना तर नाहीच नाही !

- तुळशीदास भोईटेव्हॅलेंटाइन डेला एका कार्यक्रमात प्रमुख वक्ता होतो. त्यावेळी एक स्थानिक कार्यकर्ता सूत्रसंचालनही जोशात करत होता. दिवसाची महती सांगताना आपण कसे राष्ट्रीय महापुरुषांना विसरलेलो नाही, सामाजिक भान कसं आहे ते दाखवताना अनेक महापुरुषांची नावं घेत होता. तेवढ्यात त्या कार्यकर्त्याने उल्लेख केला तो आज भगतसिंगांचा शहीद दिन असल्याचा.आणि आपण सारेच फक्त व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात एवढे मग्न आहोत की आपल्याला या दिनविशेषाच्या राष्ट्रीय जबाबदारीचं भानच नसतं. मी दुसऱ्या वक्त्यांचं भाषण सुरू असताना त्या कार्यकर्त्याला बोलावले. 14 फेब्रुवारी हा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा शहीद दिवस नसून तो 23 मार्चला असल्याची जाणीव करून दिली. तो कार्यकर्ता नरमला. अर्थात त्याची चूक माहिती नसणे ही होती. पण सध्याच्या व्हायरल ज्ञानाच्या काळात अनेकदा चुकीची माहिती बेधडकपणे व्हायरल केली जाते. भलेभले ती खरी मानू लागतात. तो कार्यकर्ता अशा व्हायरल पोस्टमुळेच फसला असावा.अर्थात कितीही सांगितलं तरीही 14 फेब्रुवारी हा शहीद दिवस असल्याच्या पोस्ट व्हायरल होतंच असतात. त्या पोस्ट तयार करणारे, पाठवणारे जे व्हॅलेंटाइन डेला विरोध करून त्याच्या उत्साहावर पाणी ओतण्यासाठी जाणीवपूर्वकच अशा पोस्ट पाठवतात. त्यांची तर मला कीवच येते. मुळात अशांना भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्याविषयी काहीच घेणे-देणे नसते. केवळ त्यांना व्हॅलेंटाइन डेला विरोध करायचा असतो म्हणून ते तसं करतात. भगतसिंगांना फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी गैरहेतूने वापरूनच घेतात.दुसरीकडे अशा चुकीच्या पोस्टना बळी पडून जे त्या व्हायरल करतात. ज्यांचा व्हॅलेंटाइन डेला विरोध करण्याचा हेतू नसतो. पण शहिदांप्रति आदर व्यक्त करणे, कृतज्ञता व्यक्त करणे यासाठी ते त्या करत असावेत. असाच एक मोठा वर्ग 23 मार्चलाही सक्रिय असतो. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या हौतात्म्याविषयी ऐकलेलं असतं. ते हिरो असतात. त्यामुळेच शहीद दिन आला की 23 मार्चला स्वयंस्फूर्तपणे शहीद दिनाच्या पोस्ट व्हायरल करू लागतो. काही जण तर भगतसिंगांचे खूप प्रेरणादायी विचारही मांडतात. लोकांपर्यंत ते पोहोचवतात, हेही चांगलंच.मात्र हे सारं जे काही घडतं ते फक्त दोन दिवसांपुरतेच. चुकीनं व्हॅलेंटाइन डेला. दुसऱ्यांदा शहीद दिनी. तेवढ्यापुरते भगतसिंग, त्यांचे विचार चर्चेत येतात. व्हायरल केले जातात. पुढे कुणीच काहीच लक्षात ठेवत नाही. अमलात आणलेही जात नाहीत.भगतसिंग जे बोलले तसेच ते जगले. त्यांचा एक विचार तर कसं जगायचं ते सांगणारा. “जिंदगी अपने दम पर जी जाती है, दुसरों के कंधों पर तो सिर्फ जनाजे उठाये जाते है” आता प्रत्येकाने आठवावे. किती स्वावलंबी असतो आपण ? दरवेळी आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलू पाहतो. त्यातही आपलं वैयक्तिक काही नसेल सामूहिक असेल तर जरा जास्तच जोशात येतो. पण ते जबाबदारी ढकलण्यासाठी, घेण्यासाठी नाही.त्यामुळेच मग काही प्रश्न पडतात. भगतसिंगांच्या पोस्ट व्हायरल करणारे, राजगुरु-सुखदेव यांची आठवण काढणारे अनेक व्हायरल वीर अन्याय-अत्याचाराच्या प्रकरणात मात्र कुठे तरी गायब असतात. व्हायरल तर सोडाच पण साधी एक पोस्ट करून नापसंती व्यक्त करतानाही दिसत नाहीत. क्रांती म्हणजे काही फक्त हिंसाचार नसतोच. तो तर एक विचारपूर्वक केलेला प्रस्थापित व्यवस्थेतील बदलाचा सक्रिय प्रयत्न असतो. अन्याय-अत्याचाराविरोधातील हुंकार असतो. मात्र महिलांवर...अगदी चिमुरड्यांवर नराधम अत्याचार करतानाही हे व्हायरलवीर अगदी लढताना दिसत नाहीत. किमान मैदानात नको, शक्य नसतं. मात्र सायबर विश्वात तरी. तेथेही नसतात. शेतकरी आत्महत्या करतात. शेतकरी संप होतो. शेतकरी मोर्चा काढतात. कुठेच दिसत नाहीत हे व्हायरल वीर, नाव घेतात भगतसिंगांचं!काय कारण असेल? शिवाजी महाराज दुसऱ्याच्याच घरी जन्माला आले पाहिजे, तसेच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या क्रांतिकारकांच्या बाबतीतही. समजू शकतो. भगतसिंगांचं एक विधान खूप महत्त्वाचं. “सर्वसाधारणपणे लोक प्रस्थापित व्यवस्थेला, गोष्टींना सरावतात. ते बदलाच्या कल्पनेनेच थरथरू लागतात. निष्क्रियतेच्या या भावनेलाच क्रांतिकारी भावनेने बदलण्याची आवश्यकता आहे,” आजही ते लागू आहे.

टॅग्स :Shaheed Diwasशहीद दिवस