- सद्गुरू जग्गी वासुदेवबरेच आध्यात्मिक उपदेश असे सांगतात की, दुसऱ्यांवर आसक्ती ठेवणे चांगले नाही, म्हणून कशावरही फार आसक्त असू नका. अशा प्रकारचे बोध आणि गैरसमजुती असण्याचे कारण म्हणजे, दुसºयाशी जोडले गेल्याने लोकांनी अनुभवलेल्या वेदना. इच्छारहित, विरक्तीच्या शिकवणी आल्या आहेत. कारण दुसºयात गुंतल्यामुळे नेहमीच वेदना आणि दु:ख माणसाच्या वाट्याला येते. म्हणून कोणीतरी हा मूर्ख उपाय शोधून काढला - अलिप्त राहा.त्यांच्यानुसार, जीवनावरील तोडगा म्हणजे जीवन टाळणे! कोणाला जर जगणे टाळायचे आहे, तर त्यांनी मृत्यू निवडावा. हे खूपच सोपे आहे. जर तुम्हाला जगायचे आहे, तर तुम्ही त्यात समरस झाले पाहिजे. म्हणून ‘जोडलं जाण्याचा’ संकोच करू नका. विरक्तीबद्धलच्या कोणत्याही शिकवणुकींचे पालन करू नका. ‘संलग्न होणे हे वाईट असते’, अशा प्रकारच्या उपदेशांमुळे, तुम्ही आत्ता समरस व्हायला संकोच करता. तुम्ही स्वत:ला विरक्त ठेवलेय, म्हणून तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. तुम्ही जेव्हा सर्वकाही आपलाच भाग म्हणून तुमच्या आत सामावून घ्याल, तेव्हाच मुक्तता अनुभवाल. तुम्ही जर सर्वकाही आपलाच एक भाग म्हणून स्वत:मध्ये सामील केलेत की, तुमची वेगळी अशी ओळख राहणार नाही, यालाच ‘योग’ म्हणतात. ‘योग’ म्हणजे जोडले जाणे. जेव्हा तुम्ही संपूर्ण अस्तित्वाशी जोडले जाता, तेव्हा तुम्ही योगात असता किंवा जेव्हा तुम्हाला ही जाणीव होते की, तुम्ही या अस्तित्वाशी किती अविभाज्यपणे एकरूप आहात, तेच तुमचे विश्वरूप-वैश्विकता. तुमच्या वात्सल्यात कुठल्याच प्रकारचा भेदभाव नको. तोच तुम्हाला परमानंद देईल.
आत्मसाक्षात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 05:32 IST