शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

जगभर: २४ वर्षे मुलाचा शोध, ५ लाख किमी प्रवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 7:31 AM

आईवडील घरात आपापल्या कामात व्यस्त होते आणि त्यांचा दोन वर्षांचा लहान मुलगा अंगणात खेळत होता. बराच वेळ झाला तरी मुलगा घरात आला नाही, अंगणातही त्याचा काही आवाज आला नाही म्हणून...

१९९७ची ती सकाळ. आईवडील घरात आपापल्या कामात व्यस्त होते आणि त्यांचा दोन वर्षांचा लहान मुलगा अंगणात खेळत होता. बराच वेळ झाला तरी मुलगा घरात आला नाही, अंगणातही त्याचा काही आवाज आला नाही म्हणून त्याचे वडील गुओ गुंगतांग यांनी बाहेर येऊन पाहिलं, पण अंगणात तो कुठेच दिसेना. त्यांनी लगेच सगळीकडे शोधाशोध सुरू केली, पण तो कुठेच सापडला नाही. त्यांनी पोलिसांतही तक्रार दिली, पण काहीच उपयोग झाला नाही. मुलाचं अपहरण झालं होतं. मुलाचे आई-वडील दोघंही सैरभैर झाले. काय करावं ते त्यांना सुचेना. पण गुओ यांनी स्वत:ला सावरलं आणि मुलाचा शोध सुरू केला. त्याच थक्क करणाऱ्या आश्चर्यकारक शोधाची आणि प्रवासाची ही कहाणी.. 

चीनच्या शेडोंग प्रांतातली ही घटना. मुलाच्या आई-वडिलांनी एक-दोन दिवस वाट पाहिली. आपला मुलगा सापडला का म्हणून सकाळ, दुपार, संध्याकाळ त्यांनी पोलीस स्टेशनलाही खेटा मारल्या. पण पोलिसांनाही त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता. मुलाच्या भेटीसाठी व्याकूळ झालेल्या या बापानंच मग मुलाच्या शोधाची तयारी सुरू केली. आपल्या मोटरसायकलला त्यांनी पुढे मुलाचा फोटो लावला आणि त्याच्या शोधात ते निघाले. एक दिवस नाही, दोन दिवस नाही, आठ दिवस नाही, मुलाच्या शोधासाठी तब्बल २४ वर्षे ते मोटरसायकलवर फिरत होते. मुलगा दोन वर्षांचा असतानाचा तोच फोटो लावून. या काळात अनेकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आता इतकी वर्षे झाली, तुम्ही कसं शोधणार तुमच्या मुलाला? तो कुठे असेल, कसा दिसत असेल, असेल की नाही, याचीही काहीच कल्पना नाही. शिवाय तुमच्या समोरून तो गेला, तरी ना तुम्ही त्याला ओळखणार ना तो तुम्हाला. मग मुलाच्या शोधासाठी कशाला इतके कष्ट घेता? नशिबात असेल तर एखाद्या दिवशी तुमची त्याची भेट होईलही, पण असं वेड्यासारखं फिरण्यात काहीच अर्थ नाही. दोन वर्षांच्या मुलाचा फोटो तुम्ही लोकांना दाखवताय, पण जगभरातला एकही माणूस त्याला ओळखू शकणार नाही. कारण त्या मुलाचा चेहरा आता तरुण झालेला असणार !.. 

- पण मुलाला शोधून काढायचंच या हट्टाला पेटलेल्या वेड्या बापाला लोकांचं म्हणणं पटलं नाही. त्यांनी आपल्या मुलाचा शोध सुरूच ठेवला. त्यासाठी तब्बल वीस राज्यांत त्यांनी मोटरसायकलवर अखंड प्रवास केला. दरम्यान, त्यांच्या दहा मोटरसायकल खराब झाल्यानं त्यांना त्या बदलाव्या लागल्या. तब्बल पाच लाख किलोमीटर प्रवास केला. गावोगावच्या लोकांना आणि पोलीस ठाण्यांत तो फोटो दाखवून चकरा मारल्या.. आपल्याजवळची होती, नव्हती ती सगळी पुंजी त्यांनी संपवली, याच शोधप्रवासात त्यांचा एकदा मोठा अपघातही झाला. हाडं तुटली, मोठं ऑपरेशन झालं. एकदा हायवेवर दरोडेखोरांच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले, दरोडेखोरांच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या त्यांना चाटून गेल्या, पण त्यांचं दैव बलवत्तर होतं.. या काळात अनेकदा त्यांना कधी रस्त्यावर, तर कधी पुलाखाली झोपावं लागलं. सगळे पैसे संपल्यानं भीकही मागावी लागली, पण ते मागे हटले नाहीत. 

- त्याचं फळ त्यांना मिळालं. तब्बल २४ वर्षांनंतर त्यांचा मुलगा त्यांना परत मिळाला. आई-वडील आणि मुलाची भेट झाली तेव्हा कोणाच्याच डोळ्यांतले अश्रू थांबत नव्हते. ही घटना पाहणाऱ्यांनाही आपल्या डोळ्यांतलं पाणी आवरता आलं नाही.. 

पण २४ वर्षांनंतर या मुलाचा शोध लागला तरी कसा? वडिलांचे अथक प्रयत्न, पोलिसांची मदत आणि सरकारी धोरण. चीनमध्ये मुलांचं अपहरण आणि बाल तस्करी ही खूप मोठी समस्या आहे. दरवर्षी किमान वीस हजार मुलांचं अपहरण केलं जातं आणि त्यानंतर त्यांना देशात किंवा देशाबाहेर विकलं जातं. काहींना लहान वयातच कामाला लावलं जातं. आई-बापापासून दुरावलेली अनेक मुलं हॉटेलांत, वीटभट्टीवरही काम करतात. हरवलेली किंवा बेवारस झालेली, पोलिसांना सापडलेली मुलं पुन्हा त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोहोचावीत यासाठी गेल्या वर्षापासून चीन सरकारनं मोठ्या प्रमाणावर डीएनए टेस्ट सुरू केल्या आहेत. गुओ गुंगतांग यांनाही तब्बल २४ वर्षांनंतर आपला मुलगा परत मिळाला, तोही या डीएनए टेस्टमुळेच. या टेस्टमुळे खात्रीशीरपणे आपल्या मुलांची ओळख पटत असली तरी अनेक जण डीएनए टेस्ट करीत नाहीत, स्वत:चीही नाही आणि मुलांचीही नाही, त्यामुळे मुलं परत सापडणं ही तशी मुश्कीलच गोष्ट आहे. गुओ गुंगतांग म्हणतात, मी भाग्यशाली बाप आहे, म्हणून माझा मुलगा मला परत मिळाला!

‘जुदाई’च्या कहाणीवर चित्रपट! 

एका बापाचा आपल्या मुलाच्या शोधाचा हा थक्क करणारा प्रवास चित्रपटाद्वारेही मांडला गेला आहे. २०१५ साली हा चित्रपट प्रसिद्ध झाला, त्यावेळी गुंगतांग यांचा मुलाचा शोध संपलेला नव्हता, पण निर्माता, दिग्दर्शकाला त्यात एक हृदयद्रावक कहाणी दिसली. हाँगकाँगचा सुपरस्टार एंडी लाऊ यानं या चित्रपटात प्रमुख भूमिका केली आहे. मुलगा सापडल्याचं वृत्त कळल्यावर त्यांनीही गुंगतांग यांचं अभिनंदन केलं.

टॅग्स :chinaचीन