शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

साम, दाम, दंड, भेद...!

By अतुल कुलकर्णी | Published: May 30, 2018 7:00 AM

हाय, कसे आहात...? हल्ली तुमचं मराठी आमच्यापेक्षा बेस्ट होतयं असं बाबा घरी म्हणत होते. अंकल, तुम्ही मराठी कुठे शिकलात; टेल मी... कारण साम, दाम, दंड, भेद ही तर आमची लँग्वेज.

डीयर देवेंद्र अंकल,हाय, कसे आहात...? हल्ली तुमचं मराठी आमच्यापेक्षा बेस्ट होतयं असं बाबा घरी म्हणत होते. अंकल, तुम्ही मराठी कुठे शिकलात; टेल मी... कारण साम, दाम, दंड, भेद ही तर आमची लँग्वेज. आमच्या डिक्शनरीत आहे ती. तुम्ही कशी काय युज करता...? परत तीच आमच्यासाठीही वापरता...!व्हॉट इज धीस काका...? मला सांगा, साम म्हणजे तुमच्या अँगलने काय, दाम, दंड आणि भेद म्हणजे काय ते पण सांगून टाका ना... बाबांनी चिडून विचारलं की आता मराठीचा क्लास तुमच्याकडे लावतो, तर तुम्हीदेखील; मी शिकवायला तयार आहे असं सांगून टाकलं हे काय मला डायजेस्ट झालं नाही. मराठीची पताका हेडवर घेऊन आम्ही सो मेनी इयर्स लढतोय. तो आमचाच राईट असताना तुम्ही कसे काय आमचे मराठीचे शब्द वापरता हे कळत नाही.युवर्स, आदित्य ऊर्फ आदूप्रिय आदू बेटा,तुझा काही तरी गैरसमज झालाय. साम, दाम, दंड, भेद हे शब्द तुमच्या शब्दकोशात नाहीत. ते मराठीच्या शब्दकोशात आहेत. त्याचे स्वामित्व तुमच्याकडे नाही. ज्यांना शुद्ध मराठी येते त्या सगळ्यांना हे शब्द माहिती आहेत. कोणत्याही युद्धात आणि प्रेमात सगळं क्षम्य असतं. आम्ही तुमच्याशीच युद्ध करत आहोत आणि तुमच्या प्रेमातही आहोत, अशा स्थितीवर ‘जब दिल आ गया गधी पे तो परी क्या चीज है’ अशी एक म्हण उत्तरेकडे आहे. आमचे एक योगी तिकडे आहेत. त्यांनी सांगितलेली आहे ही म्हण. तू उगाच तणावग्रस्त होऊ नकोस. हे कळण्याचे तुझे वय नाही. तू आपला तुझ्या वकुबानुसार राहा. तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत सगळ्यांच्या.तुझाच, देवेंद्रकाकाडीयर देवेंद्रअंकल,तुमचा मेसेज उशिरा डिलिव्हर झाला. जे विचारलं ते सोडून दुसरंच सांगण्याची तुमची स्टाईल अजून चेंज झाली नाही. शब्दकोश, स्वामित्व असले जड शब्द वापरून तुम्ही मला उल्लू बनाविंग करत असाल तर धीस इज नॉट गूड. मी काही उल्लू नाही.वन मोअर पॉर्इंट, माझी मराठी बेस्ट आहे. तेव्हा उगाच मधे मधे हिंदी वापरून त्या भय्ये लोकांची बाजू घेतल्याचा शो आॅफ करू नका, आणि तुमचा दिल गधी पे आला त्यात आमचा काय फॉल्ट? दिल देताना चेक करायला पाहिजे होता ना... नाऊ इटस् युवर फॉल्ट...युवर्स, आदू ऊर्फ आदित्यप्रिय आदू बेटा,तुझा संदेश वाचला. जे विचारले जाते ते सोडून दुसरं सांगण्याची ही सवय मी उद्धव नावाचे माझे एक उत्तम फोटोग्राफर मित्र आहेत, त्यांच्याकडून घेतली आहे. तू म्हणत असलास तर ही सवय बदलेन. पण मग मित्र बदलावा लागेल. चालेल का? आणि आमचा दिल परीवर येणार होता पण ती परी मैद्याच्या पोत्यासारखी दिसते असे तुझे आजोबा म्हणायचे. ते आठवलं म्हणून मग परीऐवजी गधीवर दिल गेला. त्याचे आता वाईट वाटून उपयोग नाही. असो.तुझाच, देवेंद्रकाकाडीयर देवेंद्रअंकल,व्हॉट इज धीस... मी साम, दाम, दंड, भेद बद्दल बोललो आणि तुम्ही थेट गधीपर्यंत गेलात. नॉट गूड अंकल. कट्टी फू...नॉट युवर्स, आदू ऊर्फ आदित्य.- अतुल कुलकर्णी

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण