शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

समर्पण से समर्थन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:03 IST

मोटाभाई खूप भला माणूस आहे. एवढ्या मोठ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असूनदेखील जरासुद्धा गर्व नाही, की सत्तेचा अहंकार नाही. गांधीबाबांच्या साबरमती परिसरात बालपण गेल्यामुळे सत्य, अंहिसा आणि त्याग या सद्गुणांचे बाळकडू मिळाल्याने त्यांच्या उक्ती आणि कृतीत केसभरही अंतर सापडणार नाही.

- नंदकिशोर पाटील मोटाभाई खूप भला माणूस आहे. एवढ्या मोठ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असूनदेखील जरासुद्धा गर्व नाही, की सत्तेचा अहंकार नाही. गांधीबाबांच्या साबरमती परिसरात बालपण गेल्यामुळे सत्य, अंहिसा आणि त्याग या सद्गुणांचे बाळकडू मिळाल्याने त्यांच्या उक्ती आणि कृतीत केसभरही अंतर सापडणार नाही. ‘अहर्निश सेवामहे’ हे त्यांचे जीवनध्येय असल्याने सदोदित ते कार्यमग्न असतात. अध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर घेतल्यापासून साधी दाढी करायलाही उसंत मिळालेली नाही. पायाला भिंगरी लावल्यागत ते देशभर संचार करत असतात. मोटाभार्इंचा पायगुण असा की, ते अध्यक्ष झाल्याबरोबर कधीकाळी बहुरंगी असलेला भारताचा नकाशा एकदम भगवा झाला! ‘भारतमातेची सगळी लेकरं समान आहेत’ असं गांधीबाबा म्हणायचे. हे ऐकल्यापासून भार्इंनी सगळ्यांना भगवं करण्याचा जणू चंगच बांधला आहे. भार्इंची आणि त्याच्या पक्षाची अशी दिग्विजयी वाटचाल सुरू असताना मध्येच एखादा कानडी अडथळा येतो. पण म्हणून भार्इंनी हार मानलेली नाही. २०२४ हे त्याचं अंतिम लक्ष्य आहे. (या लक्ष्यात २०१९ अनुस्यूत आहेच) यावरून पुराणातील एक कथा आठवली. श्रावण सोमवारचे अनुष्ठान केलेल्या एका उपवर कन्येस भगवान शंकर प्रसन्न होतात आणि एक वर मागण्यास सांगतात. ती कन्या म्हणते, ‘माझी एकच इच्छा आहे.’ भोलेबाबा विचारतात, ‘कसली इच्छा आहे ते तरी सांग. मी पूर्ण करतो’ त्यावर ती कन्या म्हणते, ‘माझ्या नातवांनी मला कैलासयात्रेला न्यावं!’ याला म्हणतात दूरदृष्टी! असो. उगीच विषयांतर नको. सांगायचा मुद्दा असा की, सध्याच्या काळात मोटाभार्इंसारखा दार्शनिक शोधून सापडणार नाही. इतर पक्षांचे अध्यक्ष साखरझोपेत असताना भार्इंनी आपले संपर्क अभियान सुरू केले आहे. परवा ते मुंबईतही येऊन गेले. भेटले कुणाला तर, गानसम्राज्ञी लतादीदी, अभिनयसम्राज्ञी माधुरीताई आणि उद्योगसम्राट रतन टाटा यांना! (दीदींचा आवाज बसल्यामुळे ती भेट टळली.) या तिघांचे समर्थन मिळाले, तर इतरांची गरजच काय? पण काही नतद्रष्ट मंडळींना हे पाहावलं नाही. ते म्हणतात, मोटाभार्इंनी धारावी अथवा बेहरामपाड्याला का नाही भेट दिली? किमान मुंबईतील लोकलप्रवासी किंवा डब्बेवाल्यांना तरी भेटायचं...!’ आम्हाला वाटतं मराठी माणूस अशा शुद्र विचारांमुळेच मागे पडतो. कधी, कुणाला आणि कुठे भेटायचं, हे गुजराती माणसांकडून शिकलं पाहिजे. रतन टाटांची गोष्ट सोडा, पण माधुरीताई मुंबईत राहात असताना आपण तिला साधं हळदी-कुुंकवाला बोलावत नाही. बिचारी अमेरिका सोडून मुंबईला परत आली तरी तिचंं कौतुक नाही. शेवटी तिला आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ‘बकेट लिस्ट’ सिनेमा काढावा लागला. अमितभाई घरी येणार म्हणून तिनं खम्मन ढोकळा, फाफडा, जिलेबी असा खास गुजराती मेनू बनवला होता. पण मोटाभार्इंनी कशाला हात लावला नाही.त्यावर डॉ. नेनेंनी विचारलं, ‘डायटिंग का?’ भार्इंनी लागलीच पोटावरून हात फिरवत खुलासा केला. ‘नही जी. मीडियावाले पिछे पडे रहते है, इसलिए मैने बाहर का खानाही छोड दिया है’ अमितभार्इंनी हे वाक्य उच्चारताच शेजारी बसलेल्या रावसाहेबांनी तोंडापर्यंत नेलेला ढोकळा पुन्हा प्लेटमध्ये ठेऊन दिला. गाडीत बसताना भाई एवढंच म्हणाले, ‘समर्थन के लिए समर्पण चाहिये!’(nandu.patil@lokmat.com)

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाPoliticsराजकारण