शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
2
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
3
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
4
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
5
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
6
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
7
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
8
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
9
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
10
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
12
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
13
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
14
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
15
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
16
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
17
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
18
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
19
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
20
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: बाईंडर पुन्हा एकदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 08:40 IST

विजय तेंडुलकरांच्या काही नाटकांनी समाजाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कदाचित आजही मिळालेली नाहीत. ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक त्यापैकीच एक आहे.

संजय घावरे  उपमुख्य उप-संपादकविजय तेंडुलकरांच्या काही नाटकांनी समाजाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कदाचित आजही मिळालेली नाहीत. ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक त्यापैकीच एक आहे. सत्तरच्या दशकात प्रचंड विरोध झालेले हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आले आहे; पण, आता काळ बदलला आहे. एका पुरुषाच्या मनोवृत्तीवर भाष्य करणाऱ्या या नाटकात तेंडुलकरांनी मानवी इच्छा, नैतिकता, वासना, स्त्रीबद्दलचा पुरुषी दृष्टिकोन, नीती-अनीती आणि नैतिक-अनैतिकता यांचा वेध घेतला आहे. तेंडुलकरांनी त्या काळी काळाच्या पुढचे नाटक लिहिले होते; पण, आजच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या काळातील समाज या नाटकाच्याही पुढे गेला आहे.   दिग्दर्शक अभिजित झुंझारराव यांनी नव्या संचात रंगभूमीवर आणलेल्या या नाटकात सयाजी शिंदे शीर्षक भूमिकेत आहेत. सुमुख चित्रनिर्मित आणि अष्टविनायक प्रकाशित हे नाटक आजच्या पिढीचे लक्ष वेधत आहे. विक्षिप्त स्वभावाच्या भणंग सखारामची ही गोष्ट आहे. रितीरिवाजानुसार लग्न न करता पतीने सोडलेल्या किंवा पतीला त्रासलेल्या स्त्रियांना हेरून घरी आणायचे आणि त्यांच्याशी पत्नीसारखे राहायचे हा याचा स्वभाव आहे. दोघांपैकी एकाला कंटाळा आला की स्त्रीने सखारामच्या घरातून निघून जायचे. घरी आणलेल्या स्त्रीला सखाराम सर्व गोष्टी देतो; पण, त्या बदल्यात तिने त्याला शरीरसुख देण्याची अट असते. सहा स्त्रियांचा उपभोग घेतल्यानंतर सातव्या स्त्रीच्या रूपात सखाराम लक्ष्मीला घेऊन येतो. पारंपरिक विचारसरणीची लक्ष्मी घरातील सर्व कामे करण्यासोबतच सखारामरूपी वासनांध राक्षसालाही झेलते. नंतर सखारामच्या जाचाला कंटाळून ती पुतण्याकडे जाते. तिच्यानंतर सखाराम दारूड्या नवरा असलेल्या चंपाला घरी आणतो. ती लक्ष्मीच्या अगदी विरुद्ध असते. तीच सखारामला कामाला लावते. त्यानंतर घडणारे नाट्य रंगमंचावर पाहायला मिळते.

हे नाटक त्या काळातील समाजमनाचे दर्शन घडविणारे आहे. यातील सखाराम जरी स्त्रियांवर अत्याचार करणारा असला तरी त्याची दुसरी बाजू म्हणजे तो टाकलेल्या स्त्रियांना आश्रय देतो. एखाद्याने आश्रय दिला म्हणजे त्याला त्या व्यक्तीसोबत काहीही करण्याचा अधिकार आहे या विचाराचे मुळीच समर्थन करता येणार नाही; पण, याकडे कलाकृती म्हणून पाहिल्यास सखारामच नव्हेतर, त्या स्त्रियांच्या व्यक्तिरेखांमधील विविध कंगोरे पाहायला मिळतात. लेखकाप्रमाणेच दिग्दर्शकानेही जे आहे ते थेट सादर केल्याने नाटक अंगावर येते.  नाटकातील व्यक्तिरेखा परस्परविरोधी स्वभावाच्या आहेत.  

निळू फुलेंनंतर सयाजी शिंदेंनी साकारलेला सखाराम या काळातील पिढीच्या मनात घर करणारा आहे. सखारामच्या स्वभावातील बारकावे सयाजी उत्तमरीत्या सादर करतात. नेहा जोशी नऊवारी साडीतील देवभोळ्या लक्ष्मीला न्याय देण्यात यशस्वी होते. अनुष्का विश्वास बिनधास्त, दारूबाज, आडदांड, फटकळ चंपाच्या भूमिकेत शोभून दिसते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Sakharam Binder Returns: A Play Reflecting Society's Evolving Morality.

Web Summary : Vijay Tendulkar's controversial play, Sakharam Binder, is revived. The play explores morality, desire, and societal views on women. Sayaji Shinde stars as Sakharam, captivating audiences with the complex character. The performances highlight the play's enduring relevance in today's world.
टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी