शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Sadhugram Nashik: वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी, तपोवनाचा वाद का वाढला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 11:31 IST

'प्रसंगी जीव देऊ, पण एकही झाड तोडू देणार नाही, कुंभमेळा झाला नाही तरी चालेल, पण झाडे तोडू देणार नाही....' 'आता तपोवनातील झाडांना स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर त्यांनी भाजपत प्रवेश केला पाहिजे...' असे काही गंभीर, काही विनोदी मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत वृक्षतोड नको म्हणून सुरू असलेले आंदोलन आणि सोशल मीडियात त्याची चर्चा यामुळे अचानक तपोवनात भेटी देणाऱ्यांची संख्या आणि तपो'वन पर्यटन' ही अचानक वाढले आहे. राज्यभरात नाशिकच्या कुंभमेळ्याची आणि तपोवनाची चर्चा सुरू झाली....

- संजय पाठक (वरिष्ठ वृत्तसंपादक, नाशिक)दर बारा वर्षानी नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो. यंदा तो पुढील वर्षी होईल. सिंहस्थ कुंभमेळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर असा दोन ठिकाणी विभागून होतो. त्र्यंबकेश्वरला १० शैव आखाडे सहभागी होतात. या आखाड्यांकडे बऱ्यापैकी स्वमालकीची जागा आहे. नाशिक शहरात तीन वैष्णव आखाडे व त्यांचे सातशे आठशे खालसे राहतात. त्यांच्यासाठी तात्पुरते साधुग्राम उभारले जाते. त्यासाठी तपोवनातील अडीचशे एकर जागा आरक्षित आहे. 

महापालिकेची ९१ एकर जागा ताब्यात आहे, त्यात ५४ एकर पडीक क्षेत्रावर झाडे उभी राहिली आहेत. साधू-महंतांच्या निवासव्यवस्थेसाठी ही झाडे तोडावी लागतील, असे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन सांगत आहेत. प्रदूषित हवा असलेल्या देशातील टॉप २५ शहरांत नाशिकचा समावेश आहे. म्हणजेच या वृक्षतोडीचा पर्यावरणीय परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सजग नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून विरोध स्वाभाविक आहे.

अर्थात, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींच्या टोकाच्या विरोधाला आणि संतापाला अनेक कंगोरे आहेत. तीन वर्षापासून महापालिकेता प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे नागरी समस्या सोडवण्याला कोणीच वाली नाही, अशी भावना आहे. व्यक्तिगत जागेतील अत्यंत अडचण म्हणून झाड तोडायचे असेल तर महापालिकेचे प्रशासन इतके जेरीस आणते की भविष्यात कुणी झाडंच लावायला तयार होणार नाही. असे असताना स्वतः महापालिका १८०० झाडे तोडणार म्हटल्यानंतर संताप वाढला आहे.

सध्याची झाडे अतिक्रमण टाळण्यासाठी महापालिकेनेच लावली होती, हे खरे आहे. परंतु आता गरजेनुसार त्यातील काही तोडावी लागणार आहेत. त्यासाठी महापालिकेने १,८३४ झाडांवर खुणा केल्या; परंतु महापालिकेने पर्यावरणप्रेमींचा विरोध बघितल्यानंतर यातील काही झाडे वाचवता येतील काय, याची चाचपणी सुरू केली आहे. साधुग्रामसाठी झाडे तोडावीच लागणार आहेत हे खरे आहे. मात्र, त्यातील किती वाचवता येतील, याचा विचार महत्त्वाचा आहे. त्यासाठी पर्यावरणप्रेमींना विश्वासात घेऊन सर्वमान्य तोडगा काढावा लागणार आहे.

१० वर्षे खासगी ठेकेदाराला अन् दोन वर्षे कुंभमेळ्याला

कुंभमेळा जवळ येऊन ठेपला असताना एकही काम सुरू झाले नाही. २५ हजार कोटींच्या कामांपेक्षा त्याच्या टेंडरची आणि त्यातील टक्केवारीचीच चर्चा अधिक होत आहे.

साधूंच्या निवाऱ्यासाठीच ही झाडे तोडायची सांगितले जात असले तरी झाडे तोडण्यामागे आणखी एक कारण पुढे आले आहे, ते म्हणजे ही जागा भारत मंडपम प्रकल्पासाठी एका खासगी ठेकेदाराला भाड्याने देण्यात येणार असून, त्यात बीओटी तत्त्वावर प्रदर्शनी केंद्र बांधण्यात येणार आहे.

दहा वर्षे ही जागा संबंधित ठेकेदार व्यावसायिक कारणांसाठी वापरून नंतर दोन वर्षे कुंभमेळ्यासाठी महापालिकेला देणार आहे. म्हणजे या साधुग्रामच्या जागेवर भूखंडावर अतिक्रमण तर होणार नाहीच, उलट उत्पन्न मिळेल, असा तर्क दिला जात आहे. थोडक्यात, साधुग्राम वसवण्याच्या नावाखाली एका ठेकेदार कंपनीला ही जागा देण्यासाठी वृक्षतोड करण्यात येणार असल्यानेही पर्यावरणप्रेमींचा रोष वाढला आहे.

पुढचा कुंभ कुठे भरवणार?

खरी गंभीर स्थिती पुढच्या कुंभमेळ्यात होण्याची शक्यता आहे. कारण या सर्व वादाच्या मुळाशी साधुग्रामची अपुरी पडत असलेली जागा हेच आहे.

सध्या असलेले तपोवनातील साधुग्रामच्या नियोजित जागेवर 'ना विकास क्षेत्रा'चे आरक्षण असून, त्याची मुदत २०२७ मध्ये संपणार आहे.

ही जागा ताब्यात आली नाही तर साधुग्रामसाठी जागाच शिल्लक राहणार नाही. मग पुढचा कुंभ कुठे भरवणार ? प्रश्न अनेक आहेत आणि आधीच तोडगा काढण्यात पुरेसा उशीर झालेला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik Sadhugram Tree Felling: For Saints or Self-Serving Interests?

Web Summary : Nashik's Kumbh Mela faces controversy over tree felling in Tapovan for Sadhugram. Environmental concerns clash with devotee accommodation needs. Allegations arise of prioritizing a private contractor for commercial use over pilgrims, jeopardizing future Kumbh space.
टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाNashikनाशिकPlantsइनडोअर प्लाण्ट्सReligious programmeधार्मिक कार्यक्रम