शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

संघ बदलला नाहीच; ‘देश म्हणजेच सर्वसमावेशकता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 03:56 IST

शिखांचा पेहराव व जीवनपद्धती वेगळी आहे. पण ते आपले आहेत. तसेच मुसलमानही देशाचेच आहेत. हीच गांधीजींसह साऱ्या थोरामोठ्यांची शिकवण होती. तेच मत स्वामी विवेकानंदांचेही होते. धर्म ही बाब तशी सोपी नाही.

संघाने गोळवलकरांना व त्यांच्या विचारसूत्राला सोडले असे सांगितले जात असले, तरी त्याची मूळ विचारसरणी तशीच व तेवढीच कर्मठ राहिली आहे. शब्द वा वाक्ये बदलणे आणि आशय बदलणे यात अंतर आहे. मोहन भागवतांनी टरफलेच तेवढी बदलली आहेत. संघाचे माजी बौद्धिक प्रमुख मा. गो. वैद्य यांनी ‘तशीही गोळवलकरांची विचारसरणी आता कालबाह्य झाली आहे,’ असे म्हणून भागवतांना सावरण्याचा प्रयत्न केला आहे. भागवतांना ‘अल्पसंख्य’ हा शब्द मान्य नाही. मुसलमानांनी या देशावर आक्रमण केले, हा इतिहास त्यांनी घट्ट धरून ठेवला आहे. आताच्या मुसलमानांनी गोहत्या थांबवून गोमांस भक्षण बंद करावे, अशी त्यांची मागणी आहे. शिवाय येथे साºयांनी, त्यात मुसलमानही आले, स्वत:ला हिंदू म्हणावे, कारण हे हिंदू राष्ट्र आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. एखाद्या कर्मठ संस्थेने आपल्या व्यवहारात थोडा काही बदल केला की, तो बातमीचा विषय होतो. हाफपॅन्ट सोडून संघ फुलपॅन्टवर आला, त्याची अशीच चर्चा झाली. त्यामुळे भागवतांनी गोळवलकरांचे नाव न घेणे, हाही तेवढ्याच चर्चेचा विषय झाला. प्रत्यक्षात बदलले काय? खानपानावरची बंदी आग्रहाने मांडली गेली. त्यामुळे खानस्वातंत्र्याची कोंडी केली गेली. आमचा पूज्य पशू तुम्हीही पूज्य माना, असे म्हटल्याने श्रद्धास्वातंत्र्याची गळचेपी झाली. तुमचा इतिहास आम्ही विसरलो नाही, तुम्ही मात्र तो विसरला पाहिजे, असे सांगितल्याने धर्मातले वैर कायम राखले गेले. इतिहास ही विसरण्याची बाब नव्हे, शिवाय इस्लामी राज्यकर्त्यांनी भारतावर सात शतके राज्य केले. ते सारेच परदेशातून भारतात आले नाहीत. येथेच जन्मले व इथेच त्यांच्या कबरी आहेत. समाजातले अनेक वर्ग आर्यांनाही बाहेरचे मानतात. वास्तविक, आर्य येथे कधी आले आणि केव्हा इथलेच झाले, याची नोंद कुणाजवळ नाही. शक व हुणांबाबतही असेच म्हटले जाते, पण तेही इथलेच झाले. मुसलमानांचा धर्म, पेहराव व जीवनपद्धती यांच्या अंतरामुळे त्यांना येथेच पिढ्यान्पिढ्या राहूनही वेगळे मानण्याचा अट्टाहास संघाने धरला. मुसलमानांमधील एका मोठ्या वर्गाने आम्ही इथे राज्यकर्ते होतो, म्हणूनही तो जोपासला. यातला खरा मार्ग सर्वधर्मसमभावाचा व हा देश सर्वांचा आहे, असे समजण्याचा आहे. आपले नवे सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले ‘देश म्हणजेच सर्वसमावेशकता’. खरे तर गेल्या ८० वर्षांत देशाने सर्वधर्मसमभावाकडून सर्वधर्मसमभावाकडे जायचे, पण धर्माच्या व जातींच्या अहंतांनी त्याला तसे जाऊ दिले नाही. जगातल्या मानववंश शास्त्रज्ञांनी २०१७ पर्यंत जगातील ४३०० धर्मांचा शोध लावला. यातला प्रत्येक धर्म त्याच्या अनुयायांसाठीच केवळ जन्माला आला नाही, तो साºया जगाच्या कल्याणासाठी उदयाला आला. ‘वसुधैव कुटुंबकम’ याचा अर्थ याहून वेगळा नाही. या सगळ्या धर्मांची शिकवण त्यांच्या अनुयायांपुरती मर्यादित नाही. ही साºया जगाच्या कल्याणाची आहे. सर्वधर्मसमभाव किंवा सेक्युलॅरिझम हा तो विचार आहे. विविधतेत एकता आणि विचार व श्रद्धा वेगळ्या असल्या, तरी हे राष्ट्र एक आहे हा विचार ही ती बाब आहे. आज जगातील ९३ देशांनी सेक्युलॅरिझमचा स्वीकार केला आहे. हे देश धर्मांच्या पलीकडे गेलेले व कायदे करताना त्यात धर्म येणार नाही याची काळजी घेणारे आहे. या धर्मांच्या पल्याड असलेला नीतिधर्म वा मनुष्यधर्म हा यापुढचा जगाचा तारणहर्ता आहे. ज्या मूल्यांमुळे मनुष्यजातीचे सर्वोच्च नैतिक कल्याण होते, त्या मूल्यांचा धर्म म्हणजे सेक्युलॅरिझम असे जॉन होलिओ म्हणाला. आपल्या घटनेनेही याच विचाराला मान्यता दिली आहे. दु:ख याचे की संघाला ही घटनाच मान्य नाही. त्याला एका धर्माची, एका भाषेची (संस्कृत), घटना बनविता आली, तर ती हवीच आहे. त्यामुळे भागवतांचे वक्तव्य फारशा गंभीरपणे घेण्याची गरज नाही. काळ बदलतो, तशा समाजाच्या गरजा बदलतात. समाजही काळानुरूप बदलत जातो. मात्र, काळ बदलला, तरी कर्मठांचे वर्ग आपल्या जुन्या निष्ठांनाच चिकटून राहतात व तसे करताना ते कालविसंगतच नव्हे, तर कालबाह्य होतात, याची नोंद या संदर्भात घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ