रॉनने अनुभवला ‘इन्फर्नो’चा थ्रिलर अनुभव
By Admin | Updated: October 14, 2016 05:56 IST2016-10-14T05:56:01+5:302016-10-14T05:56:01+5:30
डेन ब्राउनच्या कादंबरीवर लक्षावधी लोकांनी प्रेम केले आहे. त्यामुळे कादंबरीवर चित्रपट निर्माण करणे हे आव्हानात्मकच होते. हा चित्रपट निर्माण करताना

रॉनने अनुभवला ‘इन्फर्नो’चा थ्रिलर अनुभव
डेन ब्राउनच्या कादंबरीवर लक्षावधी लोकांनी प्रेम केले आहे. त्यामुळे कादंबरीवर चित्रपट निर्माण करणे हे आव्हानात्मकच होते. हा चित्रपट निर्माण करताना आव्हानांची मोठी साखळीच समोर उभी होती, असे दिग्दर्शक रॉन होवॉर्ड सांगतात. इन्फर्नोचा अनुभव कसा होता, या प्रश्नावर रॉन होवॉर्ड यांनी शूटिंगदरम्यानची कथाच सांगितली.
मर्यादित वेळेत ऐतिहासिक जागांवर चित्रपटाचे चित्रीकरण करायचे होते. त्यात उन्हाळ्याचे तापमान आणि अॅक्शन सीन शूट करणे म्हणजे सर्वच पातळ्यांवर कसोटी होती. डेन ब्राउनच्या कांदबरीला चित्रपटातून योग्य न्याय देण्याचा आमचा प्रयत्न होता. कादंबरीवर चित्रपट निर्माण करणे फार कष्टाचे काम असते. तुमच्यावर खूप जबाबदाऱ्या असतात, पण हा अनुभव आयुष्यभरासाठी संस्मरणीय असतो. असा चित्रपट निर्माण करणे जितके आव्हानात्मक असते, तितकेच विचारांना चालना देणारेही असते, असे रॉन म्हणाले.
होवॉर्ड आणि त्याच्या टीमने या चित्रपटाचे शूटिंग काही ऐतिहासिक स्थळांवर केले आहे. त्यात पलाझो वेचिनो आणि बोबोली गार्डन्स यांचा समावेश आहे. याचा अनुभव होवॉर्ड यांनी सांगितला. आम्ही उन्हाळ्यात चित्रपटाची शूटिंग करीत होतो. नेमके याच काळात पर्यटकसुद्धा या जागांना भेट देत होते. त्यामुळे शूटिंग पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे संपूर्ण दिवस नाही, तर काही तासच शिल्लक असायचे. हे सर्व करताना सगळ्या बाबी अगदी काटेकोरपणे सांभाळाव्या लागत होत्या. स्प्लॅश आणि अपोलो-१३ च्या शूटिंगवेळी आमच्यावर असेच दडपण होते. आम्ही एक तर अंगावर कमीत-कमी वजन ठेवत होतो किंवा पाण्याखाली शूटिंग करत होतो. त्यासाठी आम्हाला अत्यंत कमी वेळात पूर्वतयारी करावी लागत होती. अॅक्शन सिन्स करताना आम्हाला ड्रोन कॅमेऱ्याची बोबोली गार्डन्समध्ये गरज भासली. एक तर हा थ्रिलर सिनेमा असल्याने त्यात वेगळेपण दिसावे हा माझा आग्रह होता. गर्दी वाढली, तर ड्रोन कॅमेरा हाताळताना गडबड होईल, अशी भीती होती, पण आम्ही शूटिंग करण्यात आणि योग्य ते हावभाव दाखविण्यात यशस्वी ठरलो.