शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
3
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
4
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
5
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
6
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
7
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
8
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
9
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
10
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
11
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
12
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
13
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
14
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
15
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
16
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
17
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
18
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
19
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
20
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

खेळ तेलाच्या वाढत्या किमतीचा; ८0 टक्के कच्च्या तेलाची आयात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 3:36 AM

पेट्रोल आणि डिझेल दैनंदिन वापराच्या महत्त्वाच्या वस्तू आहेत. गेल्या काही महिन्यांत सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत, घसरणारा रुपया आणि आणखी अनेक कारणांची चर्चा होताना दिसते.

- श्रीराम देशपांडे(कर सल्लागार)पेट्रोल आणि डिझेल दैनंदिन वापराच्या महत्त्वाच्या वस्तू आहेत. गेल्या काही महिन्यांत सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत, घसरणारा रुपया आणि आणखी अनेक कारणांची चर्चा होताना दिसते.जगातील चौथी मोठी व सर्वात जास्त वेगाने वाढणारी भारतीय अर्थव्यवस्था आहे. औद्योगिकीकरण व वाढते शहरीकरण यामुळे आपल्या देशात पेट्रोल-डिझेलचा खपही मोठा आहे. परंतु देशांतर्गत कच्च्या तेलाचे साठे व उत्पादन मर्यादित असल्याने भारत आवश्यकतेच्या सुमारे ८0 टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. ही आयात प्रामुख्याने आखाती देशांकडून केली जाते. मात्र कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याची पुरेशी उत्पादनक्षमता भारताकडे असल्याने भारत पेट्रोलची निर्यात करणारा देश आहे. साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर भारताला त्याचा फटका बसतो. २0१५ पर्यंत केंद्र सरकार वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतीचा बहुतेक सर्व बोजा स्वत: सहन करून देशातील तेल उत्पादक कंपन्यांना आॅईल बॉण्ड विकून भरपाई करीत असे. आज मात्र कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारानुसार पेट्रोलियम पदार्थांच्या किरकोळ विक्रीच्या किमतीत बदल करण्याचे स्वातंत्र्य तेल कंपन्यांना मिळाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून रोज किमती वाढत आहेत.जगातील तेलभाववाढीमागे अमेरिका व त्याचे विद्यमान अध्यक्ष यांची ‘अमेरिका फर्स्ट’ नीती हेही महत्त्वाचे कारण आहे. अमेरिका शेल तेल (कोळश्यापासून तेल) उत्पादन करणारा सर्वात मोठा देश आहे. अमेरिकेतील औद्योगिकीकरण व रोजगार यात शेल तेल उत्पादक कंपन्यांचा मोठा वाटा आहे. परंतु शेल तेल उत्पादनाचा खर्च कच्च्या तेल उत्पादनांपेक्षा जास्त आहे. कच्च्या तेलाचा भाव ७० डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त वाढल्यास शेल तेलाचे उत्पादन परवडते. त्यामुळे देशांतर्गत आर्थिक प्रगती व रोजगारनिर्मितीसाठी अमेरिकेला कच्च्या तेलाच्या किमती या मर्यादेपेक्षा जास्त हव्या आहेत. जेणेकरून आर्थिक प्रगती व रोजगाराच्या आघाडीवर विजय प्राप्त केल्याचे दाखविता येईल. अमेरिकन अर्थव्यवस्था खूप मोठी व विस्तारित असल्याने वाढलेल्या तेलाच्या किमतीचा इतर उत्पादन व उपभोग यावर फारसा परिणाम होत नाही.भारतासाठी मात्र तेलाच्या वाढत्या किमती अनेक आव्हाने निर्माण करतात. तेलाची आयात वाढल्याने भारतीय रुपयावर दबाव येतो व त्याची किंमत कमी होते. आयात महाग झाल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारातील तूट वाढते व परकीय गंगाजळी कमी होते. तेलाची किंमत १० डॉलर प्रति बॅरल वाढली तर परकीय व्यापार तूट १० मिलीयन डॉलर म्हणजे भारतीय सकल उत्पादन जीडीपीच्या सुमारे अर्धा टक्का वाढते. यामुळे इतर आवश्यक वस्तूंची आयातही महाग होते.इंधनाच्या वाढीव किमतीमुळे मागणीत घट होईल. त्यामुळे कच्च्या तेलाची आयातही कमी होईल. केंद्र सरकारचा पेट्रोलियम सबसिडीचा खर्च वाचेल आणि वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यास त्याची मदत होईल. त्यामुळेच सरकार इंधन दरवाढीमुळे होणाऱ्या संभाव्य महागाईची जोखीम स्वीकारून इंधनावरील करात कपात करीत नाही. परंतु पुढील वर्षीच्या निवडणुका विचारात घेता सरकारचा हा निश्चय किती कायम राहतो ते बघूया.

टॅग्स :Petrolपेट्रोल