शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले
2
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
3
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेणार...
4
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
5
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
6
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
8
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
9
Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे
10
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
11
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
12
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
13
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
14
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

पुन्हा ‘संतोष’ जाहला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 2:20 PM

भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी पुन्हा एकदा राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हातावर बांधले

मिलिंद कुलकर्णीभुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी पुन्हा एकदा राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हातावर बांधले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चौधरी यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या निर्णयक्षमता, समयसुचकतेचा परिचय करुन देणारा आहे. पालिका निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय पटलावरुन काहीसे बाजूला पडलेले चौधरी पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत, असाच याचा अर्थ आहे. एकेकाळी भुसावळ म्हणजे संतोष चौधरी असे समीकरण होते.स्थानिक नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य, बाजार समिती, जिल्हा बँकेचे संचालकपद अशी सत्तेची सर्व पदे चौधरी यांच्या समर्थकांकडे असायची. जिल्हा नेते सुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे यांनी एकत्र येऊन चौधरी यांची पालिकेतील सद्दी संपविण्यासाठी प्रयत्न करुनही यश मिळालेले नव्हते. चौधरी हे स्वत: पक्ष आहेत. ते ज्या पक्षात जातील, त्या पक्षाची सत्ता याठिकाणांवर येत असे. नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार अशा चढत्या क्रमाने पदे पादाक्रांत करणाऱ्या चौधरी यांनी शिवसेना, राष्टÑवादी, पुन्हा शिवसेना आणि पुन्हा राष्टÑवादी काँग्रेस व्हाया जनआधार पार्टी असा प्रवास केला. पदे न मिळाल्यास नेत्यांशी संघर्ष करुन पक्षबदल करण्याचा पायंडा चौधरी यांनी पाडला. पण निसर्गनियमानुसार प्रत्येकाचा काळ असतो. ठराविक काळानंतर मावळती येतेच तसेच झाले. भाजीविक्रीचा व्यवसाय करत असताना तारुण्यात ते शिवसेनेकडे आकर्षिले गेले. सेनेतून राजकीय कारकिर्द सुरु केल्यानंतर आमदारकीसाठी पक्षाने तिकीट नाकारल्यावर बंडखोरी केली. राष्टÑवादीत असताना मंत्रिपद दिले नाही, म्हणून पक्षनेतृत्वावर टीका करीत बंड पुकारले. परंतु वैशिष्टय असे की, पक्ष बदलला तरी कार्यकर्ते चौधरी यांच्यासोबत राहिले. काहींनी दगा दिला, पण त्यांनी पर्वा केली नाही. भुसावळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यावर चौधरी यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या संजय सावकारे यांना उमेदवारी दिली आणि निवडून आणले. मंत्रिपद न मिळाल्याने पक्षाविरुध्द बंड ठोकणाºया चौधरी यांच्याच समर्थक सावकारे यांना राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने राज्यमंत्रीपद व पालकमंत्रीपद दिले. जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार होता. त्यामुळे चौधरी यांनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. सावकारे यांनीही भाजपामध्ये प्रवेश करुन आमदारकी टिकवली. एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वामुळे सावकारे यांनी पुढे पालिकेत भाजपाची सत्ता आणण्यात वाटा उचलला. चौधरी यांच्या सत्तेला सुरुंग लागला. सेनेत राहूनही त्यांनी पालिकेत जनआधार नावाच्या स्वत:च्या आघाडीमार्फत निवडणुका लढवल्या. आता राष्टÑवादीत पुन्हा प्रवेश करुन त्यांनी काय साधले, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क केले जात आहे. त्यांचे धाकटे बंधू अनिल चौधरी यापूर्वीच भाजपामध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे २०१९ मध्ये सत्ता कुणाचीही आली तरी चौधरी बंधूंपैकी एक जण सत्ताधारी पक्षासोबत राहील, हे निश्चित. 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव