शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बलाढ्य डिजिटल कंपन्यांना वेसण घालण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 09:45 IST

Business Market: डिजिटल कंपन्यांचा आपल्या आयुष्यातला शिरकाव मोठ्या प्रमाणावर महसूल कमावून देतो. या महाप्रचंड बाजारपेठेच्या नियमनासाठी नवा कायदा.

- डॉ. दीपक शिकारपूर(संगणक साक्षरता प्रसारक)

एकविसाव्या शतकापासून संगणक व माहिती तंत्रज्ञान सर्वमान्य झाले. साहजिकच ई-कॉमर्स, ऑनलाइन व्यापार, डिजिटल मार्केटिंग ह्या सर्व  बाबी तळागाळात पोहोचल्या. डिजिटल अर्थव्यवस्थेने जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये क्रांती घडवून आणली आहे आणि स्पर्धेवर लक्षणीय परिणाम केला आहे. भौगोलिक सीमा नसल्याने, ग्राहकाशी थेट संवाद होत असल्याने जगभरातील व्यवसायांसाठी नवीन बाजारपेठा आणि संधी उघडल्या.  पण हे झाले वरवरचे  चित्र. 

प्रत्यक्षात काय घडते आहे? काही मोठ्या कंपन्यांनी डिजिटल बाजारपेठेमध्ये वर्चस्व गाजवले आहे. (उदा. गुगल, फेसबुक, ॲपल)  या कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात डेटा आणि संसाधने आहेत आणि त्याचा प्रभावी वापर करून ते अधिकाधिक ग्राहक मिळवतात व छोट्या उद्योगांना  बाजारपेठेतून बाहेर टाकू शकतात. उदा. फेसबुकची माहिती व्हाॅट्सॲपला पुरवणे. यावर प्रगत देशात अनेक विचारमंथन झाले व युरोपने प्रथम कायदे केले. युरोपियन युनियनने २०२० मध्ये डिजिटल मार्केट्स ॲक्ट  आणि डिजिटल सर्व्हिसेस ॲक्ट हे दोन महत्त्वाचे कायदे मंजूर केले. 

डिजिटल मार्केट्स ॲक्ट : १. डिजिटल गेटकीपर्सना प्रतिबंध : प्रतिस्पर्ध्यांना  बाजारपेठेतून बाहेर टाकणे, स्वतःच्या सेवांना प्राधान्य देणे, डेटा गोळा करणे आणि वापरणे यासारख्या गोष्टींना हा कायदा प्रतिबंध करतो. २. संयुक्त उपक्रम आणि अधिग्रहणांवर कडक नियंत्रण : अतिप्रचंड डेटा आणि बाजारपेठेचा वाटा असलेल्या कंपन्यांचे  संयुक्त उपक्रम आणि अधिग्रहणांवर कडक नियंत्रण ठेवतो.३. व्यवसायांसाठी अधिक पारदर्शकता :  अल्गोरिदम आणि डेटा गोळा करण्याच्या पद्धतींबद्दल अधिक पारदर्शकता आणण्यास भाग पाडतो. ४. स्पर्धा आयोगाला अधिक शक्ती : कायदा युरोपियन कमिशनला (EC) डिजिटल बाजारपेठेमध्ये चौकशी आणि अंमलबजावणी करण्यासाठी अधिक शक्ती देतो.

डिजिटल सर्व्हिसेस ॲक्ट :१. ऑनलाइन सेवांसाठी नवीन नियम: हा कायदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ऑनलाइन मार्केट प्लेस आणि इतर ऑनलाइन सेवांसाठी नवीन नियम. गैरवापर आणि चुकीची माहिती पसरवणे टाळणे समाविष्ट.२. वापरकर्त्यांचे हक्क संरक्षण :  वापरकर्त्यांना त्यांच्या डेटावर अधिक नियंत्रण देतो आणि त्यांना त्यांच्या डेटा गोपनीयतेचे संरक्षण करण्यास मदत करतो.आपल्या देशातही ह्या विषयावर विचार सुरू झाला. भारत सरकारनेही नवीन डिजिटल स्पर्धा कायदा प्रस्तावित केला आहे. डिजिटल स्पर्धा विधेयक, २०२४ नावाच्या मसुद्याच्या प्रस्तावित कायद्यात स्पर्धा-विरोधी प्रथा प्रत्यक्षात येण्याआधीच त्यावर अंकुश ठेवण्यासाठीच्या तरतुदी आहेत आणि उल्लंघनासाठी जबरदस्त दंड प्रस्तावित केला आहे.  प्रस्तावित कायद्यात डिजिटल सेवांमध्ये निष्पक्षता, स्पर्धाक्षमता आणि पारदर्शकता, नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी आणि भारतातील वापरकर्त्यांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी सिस्टमली सिग्निफिकंट डिजिटल एंटरप्रायझेस (SSDEs) चे नियमन करण्याचे उद्दिष्ट आहे. मुख्य डिजिटल सेवांमध्ये लक्षणीय उपस्थिती असलेल्या ज्या उद्योगांची  भारतातील उलाढाल चार हजार कोटी किंवा त्याहून जास्त आणि किमान एक कोटी अंतिम वापरकर्ते आहेत, अशांवर अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा प्रस्तावित आहे. व्यवसाय नीतीमत्ता, मूल्यावर आधारित असावेत की वाट्टेल त्या मार्गाने लाभ हेच ध्येय असावे, हा यातला मूळ प्रश्न आणि निकषही. तो आता डिजिटल व्यवसायांना लावला जावा, यासाठी जगभरातले अनेक देश आग्रही होऊ लागले आहेत. deepak@deepakshikarpur.com

टॅग्स :digitalडिजिटलbusinessव्यवसाय