शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Lok Sabha Election 2019 : रावेरविषयी राष्टÑवादीचा हटवादीपणा की हतबलता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 15:59 IST

मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित होणाऱ्या घटना नुकत्याच घडल्या. काँग्रेस पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या ...

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित होणाऱ्या घटना नुकत्याच घडल्या. काँग्रेस पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. केंद्रातील सरकारशी त्यांनी जुळवून घेतल्याचे दिसून आले. राष्टÑीय लोकशाही आघाडी सरकरच्या काळात आपत्ती व्यवस्थापनविषयक समितीचे अध्यक्षपद त्यांनी स्विकारले होते. सोनीया गांधी यांच्या परकीयत्वाचा मुद्दा घेऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या पवारांनी नंतर महाराष्टÑात आणि नंतर केंद्रातही काँग्रेससोबत सत्तेत भागीदारी पत्करली. महाराष्टÑात तर काँग्रेससोबत अक्षरश: दादागिरी केली गेली. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना पवारांचे ‘धोरणलकवा’ हे विधान गाजले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी सुरुवातीला शंका घेणारे आणि मोदींचे कौतुक करणारे पवार आता २०१९ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांचे कौतुक तर मोदींवर टीका करीत आहेत. मात्र महाराष्टÑात काँग्रेसच्या अडचणीत वाढ करण्याचे प्रयत्नदेखील राष्टÑवादीकडून सुरु आहेत.नगरच्या जागेविषयी घेतलेल्य आग्रही भूमिकेवरुन बरेच वादळ उठले. काँग्रेसच्या घरात वादंग झाले आणि विखे कुटुंबाचा वारसदार भाजपाच्या गोटात जाऊन मिळाला. आता अशीच भूमिका खान्देशातील रावेरविषयी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने स्विकारलेली आहे. या मतदारसंघातून राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कधीही निवडून आलेला नाही. हा मतदारसंघ गेल्या ४० वर्षांत एकदा अपवाद वगळता भाजपाकडे राहिलेला आहे. तत्कालीन खासदार वाय.जी.महाजन यांना संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये पकडल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द झाले आणि २००७ मध्ये पोटनिवडणूक झाली असताना भाजपाचेच हरिभाऊ जावळे निवडून आले होते. याउलट जळगाव जिल्ह्यातीलच चाळीसगाव मतदारसंघात भाजपा उमेदवार डॉ.बी.एस.पाटील पराभूत झाले होते. त्यामुळे भाजपाचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख असताना दोन्ही काँग्रेसने या मतदारसंघात धरसोडीची भूमिका घेतलेली दिसून येते. दोघांपैकी एकाही पक्षाने एखाद्या उमेदवारावर पाच वर्षे मेहनत घेतली, असे दिसून येत नाही. काँग्रेसच्या डॉ.उल्हास पाटील यांना कॉंग्रेसने संधी दिली आणि त्यांनी ती सार्थ ठरवली. परंतु, १९९९ मध्ये राष्टÑवादीची स्थापना झाली आणि मतविभाजन झाले आणि डॉ.पाटील यांना पुन्हा दिल्ली गाठणे शक्य झाले नाही. २००४ मध्ये दोन्ही काँग्रेसतर्फे ते पुन्हा मैदानात उभे राहिले, परंतु अवघ्या २० हजार मतांनी ते पराभूत झाले. काँग्रेसचा उमेदवार दोनदा पराभूत झाल्याने राष्टÑवादी काँग्रेसने हा मतदारसंघ मागीतला. हा निकष त्या काळातील पदाधिकाऱ्यांनी मान्य केला. डॉ.अर्जुन भंगाळे, अ‍ॅड.रवींद्र पाटील आणि मनीष जैन या तीन उमेदवारांचा सलग तीन निवडणुकांमध्ये पराभव झाला. जुना निकष लावून या मतदारसंघावर गेल्यावेळीच म्हणजे २०१४ मध्ये काँग्रेसने दावा करायला हवा होता. यंदाही हा दावा मजबूतपणे केला गेला नाही. हुकुमी नेतृत्वाचा अभाव दिसून आला. त्यासोबतच मैदानात जिंकणारी काँग्रेस तहात हरते, हे पुन्हा दिसून आले. डॉ.उल्हास पाटील यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला राष्टÑवादीकडून तिकीट देण्याची आॅफर दिली जाते, मग त्यांच्या मूळ पक्षाला जागा द्यायला काय हरकत आहे? असा प्रश्न पक्षश्रेष्ठींनी विचारण्याची गरज आहे.आतापर्यंत राष्टÑवादीपुढे अ‍ॅड.रवींद्र पाटील, संतोष चौधरी आणि अरुणभाई गुजराथी या नावांची चर्चा होती. अ‍ॅड.पाटील हे यापूर्वी निवडणूक लढलेले आहेत. संतोष चौधरी यांनी नकार दिल्याची चर्चा आहे तर अरुणभाई गुजराथी स्वत: अनुत्सुक आहेत. अशी स्थिती असताना माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी श्रीराम पाटील यांचे नाव अचानक पुढे केले. गेल्यावेळी असेच मनीष जैन यांचे नाव आले होते. त्याची पुनरावृत्ती करण्याचा तर राष्टÑवादीचा विचार नाही ना? सक्षम उमेदवार नसताना राष्टÑवादी काँग्रेसचा जागेचा आग्रह धरण्याचा हटवादीपणा दिसतो. तशीच अधिसूचनेच्या दोन दिवस आधीपर्यंत उमेदवाराचा शोध सुरु ठेवावा लागण्याची हतबलता देखील दिसून येत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव